प्रमुख संज्ञा

अनुप्रयोग डेटा कॅशे

अनुप्रयोग डेटा कॅशे हे डिव्हाइसवरील डेटा भांडार आहे. हे, उदाहरणार्थ, कोणत्याही इंटरनेट कनेक्शन शिवाय चालण्यासाठी वेब अनुप्रयोग सक्षम करू शकते आणि सामग्रीचे जलद लोड करणे सक्षम करून अनुप्रयोगाच्या कार्यप्रदर्शनात सुधारणा करू शकते.

अल्गोरिदम

समस्या सोडवण्याच्या कार्यात कार्यरत असलेल्या कॉंप्युटर बरोबर प्रक्रिया किंवा नियमांचा संच

कुकी

कुकी ही वर्णांची स्ट्रिंग असलेली एक लहान फाइल असते जी तुम्ही वेबसाइटला भेट देता तेव्हा तुमच्या कॉंप्युटरवर पाठवली जाते. तुम्ही पुन्हा साइटला भेट देता तेव्‍हा, कुकी त्या साइटला तुमचा ब्राउझर ओळखण्‍याची अनुमती देते. कुकी वापरकर्ता प्राधान्ये आणि इतर माहिती संचयित करू शकतात. तुम्ही सर्व कुकी नाकारण्‍यासाठी किंवा कुकी कधी पाठवली जाते ते सूचित करण्‍यासाठी तुमचा ब्राउझर कॉन्फिगर करू शकता. तथापि, काही वेबसाइट वैशिष्‍ट्ये किंवा सेवा कुकी शिवाय कदाचित योग्यरित्या कार्य करू शकत नाही. तुम्ही आमच्या भागीदाराच्या साइट किंवा अ‍ॅप्स वापरता तेव्हा कुकीसह Google कुकीचा वापर कसा करते Google डेटा कसा वापरते याविषयी अधिक जाणून घ्‍या.

डिव्हाइस

डिव्हाइस म्हणजे असा कॉंप्युटर जो Google सेवा अ‍ॅक्सेस करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, डेस्कटॉप कॉंप्युटर, टॅबलेट, स्मार्ट स्पीकर आणि स्मार्टफोन या सर्वांना डिव्हाइस मानले जाते.

पिक्सेल टॅग

एक पिक्सेल टॅग हा एखाद्या वेबसाइटवर किंवा वेबसाइटचे व्ह्यू किंवा ईमेल कधी उघडले गेले यासारख्या काही क्रियाकलापांचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने ईमेलच्या मुख्य भागात ठेवलेल्या तंत्रज्ञानाचा प्रकार आहे. पिक्सेल टॅग बहुधा कुकी एकत्रित करून वापरले जातात.

ब्राउझर वेब संचयन

ब्राउझर वेब संचयन डिव्हाइसवरील ब्राउझरमध्ये डेटा संचयित करण्यासाठी वेबसाइटना सक्षम करते. जेव्हा "स्थानिक संंचय" मोड मध्ये वापरले जाते, तेव्हा ते संपूर्ण सेशनमध्ये डेटा संचयित करणे सुरू करते. ब्राउझर बंद केल्यावर आणि पुन्हा उघल्यावर हे डेटा पुनर्प्राप्त करण्यायोग्य बनवते. वेब संचयन सुलभ करते असे एक तंत्रज्ञान म्हणजे HTML ५.

युनिक आयडेंटिफायर

युनिक आयडेंटिफायर म्हणजे वर्णांची स्ट्रिंग जी ब्राउझर, अ‍ॅप किंवा डिव्हाइस अद्वितीयपणे ओळखण्यासाठी वापरली जाऊ शकते. वेगवेगळे डिव्हाइस ओळखकर्ते ते किती कायम आहेत, वापरकर्त्यांद्वारे ते रीसेट केले जाऊ शकतात किंवा नाही आणि ते कसे अ‍ॅक्सेस केले जाऊ शकतात यानुसार बदलू शकतात.

युनिक आयडेंटिफायर विविध उद्देशांसाठी वापरले जाऊ शकतात, ज्यात सुरक्षा आणि फसवणूक शोधणे, तुमच्या ईमेल इनबॉक्स सारख्या सेवा सिंक करणे, तुमची प्राधान्ये लक्षात ठेवणे आणि पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती देणे यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, कुकीमध्ये संंग्रहित युनिक आयडेंटिफायर तुमच्या ब्राउझरमधील आशय तुमच्या प्राधान्यकृत भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात मदत करतात. तुम्ही सर्व कुकी नाकारण्‍यासाठी किंवा कुकी कधी पाठवली जाते ते सूचित करण्‍यासाठी तुमचा ब्राउझर कॉन्फिगर करू शकता. Google कुकी कशा वापरते विषयी अधिक जाणून घ्या.

ब्राउझर व्यतिरिक्त अन्य प्लॅटफॉर्मवर, विशिष्ट डिव्हाइस किंवा त्या डिव्हाइसवरील अ‍ॅप ओळखण्यासाठी युनिक आयडेंटिफायर वापरले जातात. उदाहरणार्थ, Android डिव्हाइसवर संबंधित जाहिरात देण्यासाठी जाहिरात आयडी सारखा युनिक आयडेंटिफायर वापरला जाईल आणि तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये व्यवस्थापित केले जाऊ शकते. युनिक आयडेंटिफायर डिव्हाइसमध्ये त्याच्या निर्मात्याद्वारे (काहीवेळा वैश्विक युनिक आयडी किंवा UUID म्हटले जाते) समाविष्ट केले जाऊ शकतात, जसे की IMEI-मोबाईल फोनचा नंबर. उदाहरणार्थ, डिव्हाइसचा युनिक आयडेंटिफायर तुमच्या डिव्हाइस आमच्या सेवा कस्टमाइझ करण्यासाठी किंवा आमच्या सेवांशी संबंधित डिव्हाइस समस्यांंचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

रेफरर URL

रेफरर URL (युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर) ही वेब ब्राउझरद्वारे, गंतव्‍य वेबपेजवर विशेषत: तुम्ही त्‍या पेजच्या लिंकवर क्‍लिक करता तेव्‍हा प्रसारित केलेली माहिती आहे. या रेफरल URL मध्‍ये ब्राउझरने भेट दिलेल्‍या शेवटच्या वेबपेजची URL असते.

वैयक्तिक माहिती

तुम्ही आम्‍हाला प्रदान करता ते आपले नाव, ईमेल ॲड्रैस किंवा बिलिंग माहिती किंवा इतर डेटा यासारखी तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखणारी ही माहिती आहे जी Google द्वारे योग्यप्रकारे अशा माहितीशी लिंक केली जाते, जसे की आपल्‍या Google खात्याशी आम्‍ही संबद्ध करतो ती माहिती.

वैयक्तिकरित्‍या ओळखण्‍यायोग्‍य-नसलेली माहिती

ही माहिती अशी आहे जी वापरकर्त्यांबाबत रेकॉर्ड केली जाते जेणेकरुन त्यातून वैयक्तिकरित्या ओळखता येणारा वापरकर्ता यापुढे दर्शवला जाणार नाही किंवा त्याचा संदर्भ घेत नाही.

संबद्ध

अनुषंगिक कंपनी असी इकाई असते जी Google गट कंपन्यांच्या मालकीची असते, ज्यात EU मध्ये ग्राहक सेवा पुरवणाऱ्या पुढील कंपन्यांचा समावेश असते: Google Ireland Limited, Google Commerce Ltd, Google Payment Corp, आणि Google Dialer Inc. EU मध्ये सेवा पुरवणाऱ्या कंपन्या यांच्याविषयी अधिक जाणून घ्या.

संवेदनशील वैयक्तिक माहिती

ही गोपनीय वैद्यकीय तथ्‍ये, वांशिक किंवा जातीचा उद्भव, राजकीय किंवा धार्मिक श्रद्धा किंवा लैंगिकता यांच्याशी संबंधित विषयांची वैयक्तिक माहितीची विशिष्‍ट वर्गवारी आहे.

सर्व्हर लॉग

बर्‍याच वेबसाइटप्रमाणे, आपण आमच्‍या साइटना भेट देताना केलेल्‍या पृष्‍ठ विनंत्‍या आमचे सव्‍हर स्‍वयंचलितपणे रेकॉर्ड करतात. या “सर्व्हर लॉग” मध्‍ये सामान्यत: आपल्या वेब विनंत्या, इंटरनेट प्रोटोकॉल पत्ते, ब्राऊझरचा प्रकार, ब्राऊझर भाषा, आपल्या विनंतीची तारीख आणि वेळ आणि आपला ब्राऊझर अद्वितीय रुपात ओळखणार्‍या एक किंवा त्यापेक्षा जास्त कुकीज यांचा समावेश होतो.

"कार" साठी सामान्य लॉग प्रविष्टी अशी दिसते:

123.45.67.89 - 25/Mar/2003 10:15:32 -
http://www.google.com/search?q=cars -
Chrome 112; OS X 10.15.7 -
740674ce2123e969
  • 123.45.67.89 हा इंटरनेट प्रोटोकॉल पत्ता वापरकर्त्‍याला वापरकर्त्‍याच्‍या ISP द्वारे नियुक्‍त करण्‍यात आला आहे; वापरकर्त्‍याच्‍या सेवेनुसार, प्रत्‍येक वेळी ते इंटरनेटला कनेक्‍ट करताना त्‍यांच्‍या सेवा प्रदात्‍याद्वारे वापरकर्त्यासाठी एक भिन्न पत्ता कदाचित नियुक्त केला जाऊ शकतो.
  • 25/Mar/2003 10:15:32 ही क्वेरीची तारीख आणि वेळ आहे का.
  • http://www.google.com/search?q=cars ही शोध क्वेरीसह, विनंती केलेली URL आहे.
  • Chrome 112; OS X 10.15.7 ब्राउझर आणि ऑपरेटिंग सिस्टम वापरली जात आहे का.
  • 740674ce2123a969 त्याने पहिल्यांदा Google ला भेट दिल्यावर हा युनिक कुकी आयडी या विशिष्ट कॉंप्युटरला नेमून दिला आहे. (वापरकर्ते कुकी हटवू शकतात. वापरकर्त्‍याने कॉंप्युटरमधून Google ला मागच्या वेळी भेट दिल्‍यानंतर कुकी हटवली असल्‍यास, नंतर पुढील वेळी त्‍या विशिष्‍ट कॉंप्युटरवरून त्यांनी Google ला भेट देताना वापरकर्त्‍याला नेमून दिला जाणारा कुकी ID हा युनिक असेल).

Google खाते

Google खाते साठी साइन अप करून आणि आम्हाला काही वैयक्तिक माहिती (विशेषतः तुमचे नाव, ईमेल अ‍ॅड्रेस आणि पासवर्ड) देऊन तुम्ही आमच्या काही सेवा अ‍ॅक्सेस करू शकता. तुम्ही Google सेवा अ‍ॅक्सेस करताना आणि तुमच्या खात्याला इतर अनधिकृत अ‍ॅक्सेसपासून संरक्षित करत असताना ऑथेंटिकेट करण्यासाठी ही खाते माहिती वापरली जाते. तुमच्या Google खाते सेटिंग्जद्वारे तुम्ही तुमचे खाते संपादित करू किंवा हटवू शकता.

IP पत्ता

इंटरनेटशी कनेक्‍ट केलेल्या प्रत्येक डिव्‍हाइसला इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) अ‍ॅड्रेस म्हणून ओळखला जाणारा एक क्रमांक असाइन केला जातो. हे क्रमांक सहसा भौगोलिक खंडांमध्ये असाइन केले जातात. डिव्‍हाइस ज्या स्‍थानावरून इंटरनेटशी कनेक्‍ट केले जात आहे ते ओळखण्यासाठी अनेकदा आयपी अ‍ॅड्रेस वापरला जाऊ शकतो. आम्ही स्थान माहिती कशी वापरतो याविषयी अधिक जाणून घ्या.

Google Apps
मुख्य मेनू