Google कुकीज कसे वापरते

हे पेज Google ने वापरलेल्या कुकी आणि त्यांसारख्या तंत्रज्ञानांच्या प्रकारांचे वर्णन करते. Google आणि आमचे भागीदार जाहिरातीमध्ये कुकी वापरणे हे कसे करावे याचेदेखील ते वर्णन करतात.

कुकी म्‍हणजे तुम्ही भेट दिलेल्‍या वेबसाइटने तुमच्या ब्राउझरला पाठवलेले मजकुराचे लहानसे भाग. त्या वेबसाइटला तुमच्या भेटीबद्दलची माहिती लक्षात ठेवण्यात कुकी मदत करतात, जेणेकरून साइटला पुन्हा भेट देणे आणि साइट तुमच्यासाठी अधिक उपयुक्त करणे हे दोन्हीही सोपे होऊ शकते. अ‍ॅप किंवा डिव्हाइस, पिक्सेल टॅग आणि स्थानिक स्टोरेज ओळखण्यासाठी वापरल्या जाणार्‍या युनिक आयडेंटिफायरसह त्यासारखी तंत्रज्ञाने समान काम करू शकतात. या संपूर्ण पेजवर वर्णन केल्यानुसार कुकी आणि त्यासारखी तंत्रज्ञाने खाली वर्णन केलेल्या उद्देशांसाठी वापरली जाऊ शकतात.

आमच्या कुकी आणि इतर माहितीच्या वापरामध्ये आम्ही तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण कसे करतो हे जाणून घेण्यासाठी गोपनीयता धोरण पहा.

Google ने वापरलेल्या कुकी आणि त्यांसारख्या तंत्रज्ञानांचे प्रकार

खाली वर्णन केलेल्या काही किंवा सर्व कुकी अथवा त्यांसारखी तंत्रज्ञाने तुमचे ब्राउझर, अ‍ॅप अथवा डिव्हाइसमध्ये स्टोअर केली जाऊ शकतात. ठरावीक कुकीचा वापर नाकारण्यासह, कुकी कशा वापरल्या जातात हे व्यवस्थापित करण्यासाठी, तुम्ही g.co/privacytools ला भेट देऊ शकता. तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये कुकी व्यवस्थापित करणे हेदेखील करू शकता (मात्र मोबाइल डिव्हाइससाठी ब्राउझर ही दृश्यमानता कदाचित देऊ शकत नाहीत). यापैकी काही तंत्रज्ञाने तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जमध्ये किंवा अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये व्यवस्थापित केली जाऊ शकतात.

कार्यक्षमता

कार्यक्षमतेसाठी वापरल्या जाणार्‍या कुकी आणि त्यासारखी तंत्रज्ञाने तुम्हाला त्या सेवेशी संबंधित मूलभूत वैशिष्ट्ये अ‍ॅक्सेस करण्याची अनुमती देतात. सेवेसाठी मूलभूत मानल्या जाणार्‍या गोष्टींमध्ये तुमच्या भाषेची निवड यांसारख्या निवडी आणि प्राधान्ये लक्षात ठेवणे समाविष्ट आहे; तुमच्या सेशनशी संबंधित माहिती स्टोअर करणे, जसे की शॉपिंग कार्टचा आशय, वैशिष्ट्ये सुरू करणे किंवा तुम्ही विनंती केलेली कामे करणे आणि उत्पादन ऑप्टिमायझेशन जे ती सेवा राखण्यात व सुधारणा करण्यात मदत करतात.

काही कुकी आणि त्यासारखी तंत्रज्ञाने तुमची प्राधान्ये कायम ठेवण्यासाठी वापरली जातात. उदाहरणार्थ, Google सेवा वापरणाऱ्या बहुतांश लोकांच्या ब्राउझरमध्ये, त्यांच्या कुकीसंबंधी निवडींनुसार ‘NID’ किंवा ‘_Secure-ENID’ नावाची कुकी असते. या कुकी तुमची प्राधान्ये आणि इतर माहिती लक्षात ठेवण्यासाठी वापरल्या जातात, जसे की तुम्ही प्राधान्य देत असलेली भाषा, शोध परिणाम पेजवर तुम्हाला किती परिणाम दाखवले जाण्यास हवे आहेत (उदाहरणार्थ, १० किंवा २०) आणि तुम्हाला Google चे सुरक्षितशोध फिल्टर सुरू केलेले हवे आहे का. प्रत्येक ‘NID’ कुकी वापरकर्त्याच्या शेवटच्या वापरापासून ६ महिन्यांनी एक्स्पायर होते, तर ‘_Secure-ENID’ कुकी १३ महिने उपलब्ध असते. ‘VISITOR_INFO1_LIVE’ आणि ‘__Secure-YEC’ या नावाच्या कुकी YouTube साठी याच प्रकारचे काम करतात आणि त्या सेवेशी संबंधित समस्या डिटेक्ट करण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठीदेखील वापरल्या जातात. या कुकी अनुक्रमे ६ महिने आणि १३ महिने उपलब्ध असतात.

इतर कुकी आणि त्यासारखी तंत्रज्ञाने विशिष्ट सेशनदरम्यान तुमचा अनुभव कायम ठेवण्यासाठी व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वापरल्या जातात. उदाहरणार्थ, YouTube हे सुस्पष्ट ऑटोप्ले निवडी, आशय शफल करणे आणि प्लेअरचा आकार यांसारखी तुमची प्राधान्य दिलेली पेज काँफिगरेशन व प्लेबॅक प्राधान्यांसारखी माहिती स्टोअर करण्यासाठी ‘PREF’ कुकी वापरते. YouTube Music साठी, या प्राधान्यांमध्ये व्हॉल्यूम, रिपीट मोड आणि ऑटोप्ले यांचा समावेश आहे. ही कुकी वापरकर्त्याच्या शेवटच्या वापरापासून ८ महिन्यांनी एक्स्पायर होते. ‘pm_sess’ ही कुकीदेखील तुमचे ब्राउझर सेशन कायम ठेवण्यात मदत करते आणि ती ३० मिनिटे उपलब्ध असते.

कुकी आणि त्यासारखी तंत्रज्ञाने Google सेवांच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्यासाठीदेखील वापरली जाऊ शकतात. उदाहरणार्थ, ‘CGIC’ ही वापरकर्त्याच्या सुरुवातीच्या इनपुटच्या आधारे शोध क्वेरी ऑटोकंप्लीट करून शोध परिणामांच्या डिलिव्हरीमध्ये सुधारणा करते. ही कुकी ६ महिन्यांसाठी उपलब्ध असते.

Google हे ‘SOCS’ कुकी वापरते, जी १३ महिन्यांसाठी उपलब्ध असते आणि ती वापरकर्त्याच्या कुकीच्या निवडीशी संबंधित त्यांची स्थिती स्टोअर करण्यासाठी वापरली जाते.

सुरक्षितता

सुरक्षेसाठी वापरल्या जाणार्‍या कुकी आणि त्यांसारखी तंत्रज्ञाने वापरकर्त्यांना ऑथेंटिकेट करण्यात, घोटाळा टाळण्यात व तुम्ही सेवेशी संवाद साधताना तुमचे संरक्षण करण्यात मदत करतात.

वापरकर्त्यांना ऑथेंटिकेट करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कुकी आणि त्यांसारखी तंत्रज्ञाने हे सुनिश्चित करण्यात मदत करतात, की फक्त खात्याचा वास्तविक मालकच ते खाते अ‍ॅक्सेस करू शकेल. उदाहरणार्थ, ‘SID’ आणि ‘HSID’ म्हटल्या जाणार्‍या कुकीमध्ये वापरकर्त्याचा Google खाते आयडी व सर्वात अलीकडील साइन-इन केलेल्या वेळेची डिजिटली स्वाक्षरी केलेले आणि एंक्रिप्ट केलेले रेकॉर्ड असतात. या दोन कुकीच्या संयोगामुळे Google ला Google सेवांमध्ये सबमिट केलेल्या फॉर्ममधील आशय चोरण्याचा प्रयत्न करणे यांसारखे अनेक प्रकारचे हल्ले ब्लॉक करता येतात.

काही कुकी आणि त्यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर स्पॅम, फसवणूक आणि गैरवापर शोधण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ, ‘pm_sess’ आणि ‘YSC’ या कुकी ब्राउझिंग सेशनमध्ये केलेली विनंती ही वापरकर्त्याने केली असून ती इतर साइटने केलेली नाही याची खात्री करतात. या कुकी दुर्भावनापूर्ण साइटना वापरकर्त्याच्या वतीने त्या वापरकर्त्याच्या नकळत कृती करण्यापासून रोखतात. 'pm_sess' कुकी ३० मिनिटांसाठी उपलब्ध असते, तर 'YSC' कुकी वापरकर्त्याच्या ब्राउझिंग सेशनच्या कालावधीसाठी उपलब्ध असते. कपटपूर्ण किंवा अन्यथा अवैध इंप्रेशन अथवा जाहिरातींसोबतचे संवाद यांसाठी जाहिरातदारांना चुकीच्या पद्धतीने शुल्क आकारले जात नसल्याची आणि YouTube भागीदार उपक्रम यामधील YouTube निर्माणकर्त्यांना सुयोग्य पद्धतीने मोबदला मिळत असल्याची खात्री करण्यात मदत करण्यासाठी, स्पॅम, घोटाळा आणि गैरवर्तन डिटेक्ट करण्याकरिता ‘__Secure-YEC’ व ‘AEC’ या कुकी वापरल्या जातात. 'AEC' कुकी ६ मिनिटे उपलब्ध असते तर '__Secure-YEC' कुकी १३ मिनिटे उपलब्ध असते.

विश्लेषणे

विश्लेषणासाठी वापरल्या जाणाऱ्या कुकी आणि त्यासारखी तंत्रज्ञाने असा डेटा गोळा करण्यात मदत करतात, ज्यामुळे एखाद्या विशिष्ट सेवेशी तुम्ही कसा संवाद साधता ते सेवांना समजून घेता येईल . या इनसाइट सेवांना आशयामध्ये सुधारणा करणे आणि तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा करणारी अधिक चांगली वैशिष्ट्ये तयार करणे हे दोन्ही करण्यास अनुमती देतात.

काही कुकी आणि त्यासारखी तंत्रज्ञाने साइट व अ‍ॅप्सना त्यांचे अतिथी त्यांच्या सेवा कशा वापरतात हे समजून घेण्यात मदत करतात. उदाहरणार्थ,Google Analytics हे Google Analytics सेवा वापरणाऱ्या व्यवसायांच्या वतीने माहिती गोळा करण्यासाठी कुकीचा सेट वापरते आणि त्यांना प्रत्येक अतिथींना वैयक्तिकरीत्या न ओळखता वापर आकडेवारीचा अहवाल देते. Google Analytics वापरत असलेल्या ‘_ga’ या मुख्य कुकीमुळे सेवेला एका अतिथीपासून दुसर्‍या अतिथीमधला फरक जाणून घेता येतो आणि ती २ वर्ष उपलब्ध असते. Google सेवांसह, Google Analytics लागू करणारी कोणतीही सेवा ‘_ga’ कुकी वापरते. विशिष्ट मालमत्तेसाठी प्रत्येक ‘_ga’ कुकी युनिक असते, ज्यामुळे ती संबंधित नसलेल्या सर्व वेबसाइटवर ठरावीक वापरकर्ता किंवा ब्राउझर ट्रॅक करण्यासाठी वापरली जाऊ शकत नाही.

त्याचप्रमाणे विश्लेषणांसाठी, Google सेवा या Google Search वर ‘NID’ आणि ‘_Secure-ENID’ कुकी वापरतात व YouTube वर ‘VISITOR_INFO1_LIVE’ आणि ‘__Secure-YEC’ कुकी वापरतात. Google मोबाइल अ‍ॅप्स विश्लेषणासाठी 'Google वापर आयडी' सारखे युनिक आयडेंटिफायरदेखील वापरू शकतात.

जाहिरात करणे

Google हे (तुमच्या myadcenter.google.com आणि adssettings.google.com/partnerads वरील सेटिंग्ज यानुसार) जाहिराती दाखवणे आणि जाहिराती रेंडर करणे, जाहिराती पर्सनलाइझ करणे, एखाद्या वापरकर्त्याला एखादी जाहिरात किती वेळा दाखवली जाते त्यावर मर्यादा घालणे, तुम्ही न पाहण्याचे निवडलेल्या जाहिराती म्यूट करणे आणि जाहिरातींच्या प्रभावीपणाचे मूल्यांकन करणे यासाठी कुकी वापरते.

‘NID’ ही कुकी साइन-आउट केलेल्या वापरकर्त्यांना Google सेवांवर Google जाहिराती दाखवण्यासाठी वापरली जाते, तर ‘ANID’, ‘IDE’ आणि ‘id’ ही कुकी Google च्या नसलेल्या साइटवर Google जाहिराती दाखवण्यासाठी वापरली जाते. मोबाइल जाहिरात आयडी, जसे की Android च्या जाहिरात आयडी (AdID), तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जवर अवलंबून, मोबाइल अ‍ॅप्सवर समान हेतूसाठी वापरले जातात. तुम्ही पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती सुरू केल्या असल्यास, 'ANID' आणि 'IDE' कुकी तुम्ही पाहता त्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी वापरल्या जातात. तुम्ही पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती बंद केल्या असल्‍यास, 'ANID' आणि 'id' कुकी या प्राधान्य लक्षात ठेवण्‍यासाठी वापरल्या जातात, जेणेकरून तुम्‍हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दिसणार नाहीत. 'NID' ही कुकी वापरकर्त्याने शेवटचे वापरल्यावर ६ महिन्यांनी एक्स्पायर होते. युरोपियन इकॉनॉमिक एरिया (EEA), स्वित्झर्लंड आणि युनायटेड किंगडम (UK) मध्ये 'ANID', 'IDE' आणि 'id' कुकी १३ महिने आणि इतरत्र २४ महिने उपलब्ध असतात.

तुमच्या जाहिरात सेटिंग्जनुसार, YouTube यांसारख्या इतर Google सेवादेखील जाहिरातींसाठी या आणि ‘VISITOR_INFO1_LIVE’ यासारखी इतर कुकी व तंत्रज्ञाने वापरू शकतात.

जाहिरातींसाठी वापरलेल्या काही कुकी आणि त्यासारखी तंत्रज्ञाने अशा वापरकर्त्यांसाठी असतात, जे Google सेवा वापरण्याकरिता साइन इन करतात. उदाहरणार्थ, 'DSID' कुकीचा वापर Google नसलेल्या साइटवर साइन इन केलेला वापरकर्ता ओळखण्यासाठी केला जातो, जेणेकरून वापरकर्त्याच्या जाहिराती पर्सनलायझेशन सेटिंगचा त्यानुसार आदर केला जाईल. 'DSID' कुकी २ आठवडे उपलब्ध असते.

Google च्या जाहिरात प्लॅटफॉर्मद्वारे, व्यवसाय हे Google सेवांमध्ये तसेच Google च्या नसलेल्या साइटवर जाहिरात करू शकतात. काही कुकी या Google ला तृतीय पक्ष साइटवर जाहिराती दाखवण्यास सपोर्ट करतात आणि तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइटच्या डोमेनमध्ये सेट केल्या जातात. उदाहरणार्थ, ‘_gads’ ही कुकी Google जाहिराती दाखवण्यासाठी साइटना सपोर्ट करते. ‘_gac_’ ने सुरू होणाऱ्या कुकी या Google Analytics वरून मिळतात आणि वापरकर्त्याची अ‍ॅक्टिव्हिटी व त्यांच्या जाहिरात मोहिमांच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जातात. ‘_gads’ कुकी या १३ महिन्यांसाठी आणि ‘_gac_’ कुकी या ९० दिवसांसाठी उपलब्ध असतात.

तुम्ही भेट दिलेल्या साइटवरील जाहिरात आणि मोहिमेचा परफॉर्मन्स व रूपांतर दर मोजण्यासाठी काही कुकी व त्यासारखी तंत्रज्ञाने वापरली जातात. उदाहरणार्थ, ‘_gcl_’ ने सुरू होणाऱ्या कुकी जाहिरातदारांच्या जाहिरातीवर क्लिक करणारे वापरकर्ते हे त्यांच्या साइटवर खरेदी करणे यासारखी कृती किती वेळा करतात ते निर्धारित करण्यात त्यांची मदत करण्यासाठी प्रामुख्याने वापरल्या जातात. रूपांतर दर मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुकी या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी वापरल्या जात नाहीत. ‘_gcl_’ कुकी या ९० दिवसांसाठी उपलब्ध असतात. त्यासारखी तंत्रज्ञाने, जसे की Android डिव्हाइसवरील जाहिरात आयडी देखील जाहिरात आणि परफॉर्मन्स मोजण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या Android डिव्हाइसवर तुमची जाहिरात आयडी सेटिंग्ज व्यवस्थापित करणे हे करू शकता.

जाहिरातींसाठी वापरल्या जाणाऱ्या कुकीबद्दल अधिक माहिती येथे पहा.

पर्सनलायझेशन

पर्सनलायझेशनसाठी वापरल्या जाणार्‍या कुकी आणि इतर तंत्रज्ञाने g.co/privacytools वरील तुमच्या सेटिंग्जनुसार किंवा तुमच्या अ‍ॅप व डिव्हाइसच्या सेटिंग्जनुसार पर्सनलाइझ केलेला आशय आणि वैशिष्ट्ये प्रदान करून तुमचा अनुभव वर्धित करतात.

पर्सनलाइझ केलेला आशय आणि वैशिष्ट्यांमध्ये आणखी उपयुक्त परिणाम व शिफारशी, कस्टमाइझ केलेले YouTube होमपेज व तुमच्या स्वारस्यांनुसार तयार केलेल्या जाहिराती या गोष्टींचा समावेश आहे. उदाहरणार्थ, ‘VISITOR_INFO1_LIVE’ कुकी YouTube वरील मागील व्ह्यू आणि शोधांनुसार पर्सनलाइझ केलेल्या शिफारशी सुरू करू शकते. आणि ‘NID’ ही कुकी तुम्ही शोध संज्ञा टाइप करण्यास सुरुवात केल्यावर Search यामध्ये पर्सनलाइझ केलेली ऑटोकंप्लीट वैशिष्ट्ये सुरू करते. या कुकी वापरकर्त्याने शेवटचे वापरल्यावर ६ महिन्यांनी एक्स्पायर होतात.

दुसरी कुकी, ‘UULE’, तुमच्या ब्राउझरवरून Google सर्व्हरना अचूक स्थानाची माहिती पाठवते, जेणेकरून Google तुमच्या स्थानाशी संबंधित परिणाम तुम्हाला दाखवू शकेल. या कुकीचा वापर तुमच्या ब्राउझर सेटिंग्जवर आणि तुम्ही तुमच्या ब्राउझरसाठी स्थान सुरू करणे निवडले आहे की नाही यावर अवलंबून असते. ‘UULE’ ही कुकी ६ तासांसाठी उपलब्ध असते.

तुम्ही पर्सनलायझेशनसाठी वापरल्या जाणार्‍या कुकी आणि त्यासारखी तंत्रज्ञाने यांना नकार दिला तरीही, तुम्‍हाला दिसत असलेला पर्सनलाइझ न केलेला आशय आणि वैशिष्‍ट्ये तुमच्‍या स्‍थान, भाषा, डिव्‍हाइस प्रकार किंवा तुम्‍ही सध्‍या पहात असलेला आशय यासारख्या संदर्भातील घटकांद्वारे प्रभावित होऊ शकतात.

आपल्या ब्राउझरमधील कुकीज व्यवस्थापित करा

बहुतांश ब्राउझर तुम्हाला तुम्ही ब्राउझ करत असताना कुकी कशा सेट केल्या जाव्यात आणि वापरल्या जाव्यात ते व्यवस्थापित करण्याची व कुकी आणि ब्राउझिंग डेटा साफ करण्याची अनुमती देतात. तसेच, तुमच्या ब्राउझरमध्ये तुम्हाला साइटनुसार कुकी व्यवस्थापित करू देणारी सेटिंग्ज असू शकतात. उदाहरणार्थ, chrome://settings/cookies येथील Google Chrome ची सेटिंग्ज तुम्हाला सध्याच्या कुकी हटवण्याची, सर्व कुकीना अनुमती देण्याची किंवा त्या ब्लॉक करण्याची आणि वेबसाइटसाठी कुकीसंबंधी प्राधान्ये सेट करण्याची अनुमती देतात. Google Chrome मध्ये गुप्त मोडदेखील आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व गुप्त विंडो बंद केल्यानंतर तुमच्या डिव्हाइसवरील तुमचा गुप्त विंडोमधील ब्राउझिंग इतिहास हटवला जातो आणि कुकी साफ केल्या जातात.

तुमची अ‍ॅप्स आणि डिव्हाइस यामध्ये त्यासारखी तंत्रज्ञाने व्यवस्थापित करणे

बहुतांश मोबाइल डिव्हाइस आणि अ‍ॅप्लिकेशन तुम्हाला अ‍ॅप किंवा डिव्हाइस ओळखण्यासाठी वापरल्या जाणार्‍या युनिक आयडेंटिफायरसारखी तंत्रज्ञाने कशी सेट केली व वापरली जावीत हे व्यवस्थापित करण्याची अनुमती देतात. उदाहरणार्थ, Android डिव्हाइसवरील जाहिरात आयडी किंवा Apple चा जाहिरात आयडेंटिफायर तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये व्यवस्थापित केला जाऊ शकतो, तर विशिष्ट अ‍ॅपसाठी असलेले आयडेंटिफायर सामान्यपणे अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये व्यवस्थापित केले जाऊ शकतात.

Google Apps
मुख्य मेनू