परिचय

जगाची माहिती व्यवस्थापित करणे आणि ती वैश्विक पातळीवर अ‍ॅक्सेस करण्यायोग्य व उपयुक्त बनवणे हे Google चे ध्येय आहे. त्या ध्येयामध्ये स्थान माहिती महत्त्वाची भूमिका बजावते. ड्रायव्हिंग दिशानिर्देशांपासून, तुमच्या शोध परिणामांमध्ये तुमच्या जवळच्या गोष्टी आहेत याची खात्री करणे आणि एखादे रेस्टॉरंट विशेषतः कधी व्यस्त असते ते तुम्हाला दाखवण्यापर्यंत, स्थान माहिती तुमचे Google वरील अनुभव आणखी सुसंगत आणि उपयुक्त बनवू शकते.

स्थान माहिती काही मूलभूत उत्पादन कार्यक्षमतेबाबतदेखील मदत करते, जसे की योग्य त्या भाषेत वेबसाइट पुरवणे किंवा Google च्या सेवा संरक्षित ठेवण्यात मदत करणे.

तुम्ही Google ची उत्पादने आणि सेवा वापरता, तेव्हा Google हे डेटा, तसेच स्थान माहिती कसे वापरते याचे वर्णन Google गोपनीयता धोरण यामध्ये केले आहे. Google वापरत असलेली स्थान माहिती आणि ती कशी वापरली जाऊ शकते हे तुम्ही कसे नियंत्रित करू शकता याबद्दल अतिरिक्त तपशील या पेजवर दिले आहेत. १८ वर्षे वयाखालील वापरकर्त्यांसाठी काही डेटाविषयक कार्यपद्धती वेगळ्या असू शकतात. Google ची लहान मुलांसाठी Family Link वापरून व्यवस्थापित केली जाणारी Google खाती आणि प्रोफाइल यांसाठी गोपनीयतेची सूचनाGoogle चे किशोरांसाठी गोपनीयता मार्गदर्शक यामध्ये अधिक जाणून घ्या.

Google हे स्थानासंबंधी माहिती कशी वापरते?

वापरली जाणारी सेवा किंवा वैशिष्ट्य आणि लोकांचे डिव्हाइस व खाते सेटिंग्ज यांनुसार Google हे स्थानासंबंधी माहिती कशी वापरते त्यामध्ये बदल होतो. Google हे स्थानासंबंधी माहिती कशी वापरू शकते त्याचे काही महत्त्वाचे मार्ग येथे दिले आहेत.

अनुभव उपयुक्त बनवण्यासाठी

लोक Google च्या उत्पादनांशी संवाद साधतात, तेव्हा Google हे लोकांना उपयुक्त सेवा देण्यासाठी स्थान माहिती वापरू किंवा सेव्ह करू शकते, जसे की स्थानिकरीत्या संबंधित आणि अधिक जलद शोध परिणाम, लोकांच्या रोजच्या प्रवासासाठी रहदारीचे पूर्वानुमान व एखाद्या व्यक्तीचा संदर्भ लक्षात घेऊन दिलेल्या सूचना. उदाहरणार्थ, चित्रपटाच्या वेळा शोधणारी एखादी व्यक्ती त्यांच्या जवळपासच्या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्याची शक्यता आहे, दुसरा शहरात नाही. Google Maps मध्ये, स्थान माहिती ही लोकांना नकाशावर त्यांचे ठिकाण शोधण्यात आणि त्यांना भेट द्यायच्या असलेल्या ठिकाणांवर नेव्हिगेट करण्यात मदत करते.

लोकांनी भेट दिलेली ठिकाणे लक्षात ठेवण्यात त्यांना मदत करणे

लोकांनी त्यांचे डिव्हाइस जवळ ठेवून भेट दिलेली ठिकाणे लक्षात ठेवण्यासाठी, ते टाइमलाइन वापरण्याचे निवडू शकतात. टाइमलाइन वापरण्यासाठी, लोक स्थान इतिहास सुरू करू शकतात, हे Google खाते चे सेटिंग आहे जे लोकांनी भेट दिलेल्या ठिकाणांचा आणि वापरलेल्या मार्गांचा वैयक्तिक नकाशा तयार करते. तुम्ही स्थान इतिहास वापरण्याचे निवडल्यास, तुमच्या डिव्हाइसची अचूक स्थाने वैयक्तिक नकाशावर सेव्ह केली जातात, तुम्ही Google अ‍ॅप्स उघडलेली नसली तरीही. ही माहिती टाइमलाइन मध्ये पाहता आणि हटवता येते.

लोकांना गोष्टी आणखी जलद शोधण्यात आणि आणखी उपयुक्त परिणाम मिळवण्यात मदत करणे

उदाहरणार्थ, वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी हे Google खाते सेटिंग आहे, जे लोकांना त्यांचा स्थानासारखा ॲक्टिव्हिटी डेटा आणि संबंधित माहिती सेव्ह करू देते, जेणेकरून त्यांनी Google सेवांवर साइन इन केलेले असताना, त्यांना त्यांचा अनुभव अधिक पर्सनलाइझ करता येईल. उदाहरणार्थ, शोध हा तुम्ही यापूर्वी शोधलेल्या सर्वसाधारण भागाशी संबंधित परिणाम दाखवू शकतो.

अधिक सुसंगत जाहिराती दाखवण्यासाठी

तुमची स्थान माहिती ही तुम्हाला अधिक सुसंगत जाहिराती दाखवण्यात Google ला मदत करू शकते. तुम्ही “माझ्या जवळची शूची दुकाने” यासारखी एखादी गोष्ट शोधता, तेव्हा तुम्हाला तुमच्या जवळच्या शूच्या दुकानांच्या जाहिराती दाखवण्यासाठी स्थानासंबंधी माहिती वापरली जाऊ शकते. किंवा, समजा तुम्ही पाळीव प्राण्यांसाठी विमा शोधात असल्यास, जाहिरातदार वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे फायदे दाखवू शकतात. जाहिराती दाखवण्यासाठी स्थानासंबंधी माहिती कशी वापरली जाते त्याबद्दल अधिक जाणून घ्या.

अनुभव आणखी सुरक्षित करणे

नेहमीपेक्षा वेगळी ॲक्टिव्हिटी शोधून तुमचे खाते सुरक्षित ठेवणे किंवा नवीन शहरामधून साइन इन करणे यासारख्या काही मूलभूत सेवा पुरवण्यासाठी Google तुमच्या स्थानाविषयीची माहिती वापरते.

निनावी समुदाय ट्रेंड, अंदाज दाखवण्यासाठी आणि संशोधनासाठी

Google हे संशोधनासाठी आणि समुदाय ट्रेंड दाखवण्यासाठी एकत्रित केलेली निनावी स्थान माहितीदेखील वापरते.

स्थानासंबंधी माहिती वापरण्याचे आणखी मार्ग पाहण्यासाठी, Google गोपनीयता धोरण ला भेट द्या.

माझे Android डिव्हाइस आणि ॲप्स यांवर स्थान कसे काम करते?

तुम्ही स्थानिक शोध परिणाम, प्रवासासंबंधी पूर्वानुमाने मिळवू शकतात आणि तुमच्या डिव्हाइसच्या स्थानामधून जवळपासची रेस्टॉरंट शोधू शकता. तुमच्या मोबाइल फोन किंवा टॅबलेटसाठीची Android डिव्हाइस सेटिंग्ज ही तुमच्या डिव्हाइसवरील स्थान सेवा तुम्हाला स्थानाचा अंदाज करू देतात का, तसेच तुमच्या डिव्हाइसवरील विशिष्ट ॲप्स आणि सेवा त्या डिव्हाइसचे स्थान वापरू शकतात का हे नियंत्रित करू देतात.

अ‍ॅप्सनी डिव्हाइसचे स्थान वापरणे तुम्ही कसे नियंत्रित करू शकता

कोणती ॲप्स तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरू शकतात हे तुम्ही तुमच्या Android डिव्हाइस सेटिंग्जमध्ये नियंत्रित करू शकता. सेटिंग्जमध्ये, एखादे ॲप नेमके किंवा अंदाजे स्थान ॲक्सेस करू शकते का ते निवडण्याचे तुमच्याकडे नियंत्रण असते. एखादे ॲप डिव्हाइसचे स्थान कधीही ॲक्सेस करू शकते, फक्त ॲप वापरात असताना करू शकते किंवा ॲपला प्रत्येक वेळी विचारावे लागेल का अथवा कधीही नाही हे तुम्हाला ठरवू देणारी नियंत्रणे आम्ही जोडली आहेत. तुमचे डिव्हाइस कोणत्या Android आवृत्तीवर रन होत आहे यावर या सेटिंग्जची आणि नियंत्रणांची उपलब्धता अवलंबून असते. अधिक जाणून घ्या.

डिव्हाइसचे स्थान कसे काम करते

तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जनुसार, Android डिव्हाइस ही GPS, सेन्सर (जसे की ॲक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर आणि बॅरोमीटर), मोबाइल नेटवर्क सिग्नल व वाय-फाय सिग्नल यांसह वेगवेगळे इनपुट वापरून स्थानाचा अंदाज करतात. हे इनपुट स्थानाचा शक्य तितका सर्वात अचूक अंदाज करण्यासाठी वापरले जाऊ शकतात, जे आवश्यक त्या परवानग्या असलेल्या डिव्हाइसवरील ॲप्स आणि सेवांना पुरवले जाते. तुमचा Android डिव्हाइसच्या स्थान सेटिंग्जबद्दल अधिक जाणून घ्या.

विशेषतः जेथे GPS सिग्नल उपलब्ध किंवा अचूक नाहीत अशा घनदाट शहरी भागांमध्ये अथवा इनडोअर असताना, मोबाइल आणि वाय-फाय नेटवर्क सिग्नल हे डिव्हाइसच्या स्थानाचा अंदाज करण्यात Android ला मदत करू शकतात. Google स्थान अचूकता (GLA, जे Google स्थान सेवा म्हणूनदेखील ओळखले जाते) ही Google सेवा आहे, जी डिव्हाइसच्या स्थानाच्या अंदाजामध्ये सुधारणा करण्यासाठी हे सिग्नल वापरते.

हे अधिक अचूक स्थान पुरवण्यासाठी, सुरू केले असताना, GLA हे कोणत्याही विशिष्ट व्यक्तीशी संबंधित नसलेला तात्पुरता फिरता डिव्हाइस आयडेंटिफायर वापरून अधूनमधून तुमच्या Android डिव्हाइसमधून स्थानासंबंधी माहिती गोळा करते—ज्यामध्ये GPS आणि वाय-फाय ॲक्सेस पॉइंट, मोबाइल नेटवर्क व डिव्हाइस सेन्सर यांचा समावेश असतो. GLA ही माहिती स्थान अचूकतेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि स्थान आधारित सेवा पुरवण्यासाठी वापरते, ज्यांमध्ये वाय-फाय ॲक्सेस पॉइंट व मोबाइल नेटवर्क टॉवर यांचे क्राउडसोर्स केलेले नकाशे तयार करण्याचा समावेश आहे.

तुमच्या Android डिव्हाइसच्या स्थान सेटिंग्जमध्ये तुम्ही कधीही GLA बंद करू शकता. GLA बंद केल्यावरही तुमच्या Android डिव्हाइसचे स्थान काम करत राहील आणि डिव्हाइस हे डिव्हाइसच्या स्थानाचा अंदाज करण्यासाठी फक्त GPS आणि डिव्हाइस सेन्सर यांवर अवलंबून राहील.

Google ला माझे स्थान कसे समजते?

तुम्ही वापरत असलेली उत्पादने आणि तुम्ही निवडलेली सेटिंग्ज यांनुसार, तुम्ही वापरत असलेल्या काही सेवा आणि उत्पादने अधिक उपयुक्त बनवण्यासाठी Google हे वेगवेगळ्या प्रकारची स्थानासंबंधी माहिती वापरू शकते.

ही स्थानासंबंधी माहिती तुमचा आयपी ॲड्रेस किंवा डिव्हाइस यांसारख्या रीअल-टाइम सिग्नलवरून, तसेच Google Sites व सेवांवरील तुमच्या सेव्ह केलेल्या ॲक्टिव्हिटीवरूनदेखील येऊ शकते. Google तुमच्या स्थानाबद्दलची माहिती कशी मिळवू शकते त्याचे प्रमुख मार्ग येथे दिले आहेत.

तुमच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून

आयपी अ‍ॅड्रेस, ज्याला इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्रेसदेखील म्हटले जाते, हा असा नंबर आहे जो तुमचा इंटरनेट सेवा पुरवठादार तुमच्या कॉंप्युटर किंवा डिव्हाइसला असाइन करतो. तुमची डिव्हाइस आणि तुम्ही वापरत असलेल्या वेबसाइट व सेवांमध्ये कनेक्शन तयार करण्यासाठी आयपी अ‍ॅड्रेस वापरले जातात.

इतर अनेक इंटरनेट सेवांप्रमाणे, तुम्ही ज्यामध्ये आहात त्या सर्वसाधारण भागाबद्दलची माहिती काही मूलभूत सेवा पुरवण्यासाठी Google वापरू शकते—सुसंगत परिणाम, जसे की एखाद्या व्यक्तीने किती वाजले आहेत हे विचारून शोधणे किंवा नवीन शहरामधून साइन इन करण्यासारखी नेहमीची नसलेली ॲक्टिव्हिटी डिटेक्ट करून तुमचे खाते सुरक्षित ठेवणे.

लक्षात ठेवा: इंटरनेट ट्रॅफिक पाठवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी डिव्हाइसना आयपी ॲड्रेसची आवश्यकता असते. आयपी ॲड्रेस साधारणतः भौगोलिक स्थानांवर आधारित असतात. याचा अर्थ असा, की google.com सह, तुम्ही वापरत असलेली कोणतीही ॲप्स, सेवा किंवा वेबसाइट तुमच्या आयपी ॲड्रेसवरून तुमच्या सर्वसाधारण भागाबद्दलच्या काही माहितीचे अनुमान करू शकेल आणि ती वापरू शकेल.

तुमच्या सेव्ह केलेल्या अ‍ॅक्टिव्हिटीवरून

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेले असल्यास व वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केली असल्यास, Google साइट, अ‍ॅप्स आणि सेवांवरील तुमचा अ‍ॅक्टिव्हिटी डेटा हा तुमच्या खात्याच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी यामध्ये सेव्ह केला जाऊ शकतो. काही अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये तुम्ही Google सेवा वापरत असताना ज्या सर्वसाधारण भागात होता त्या भागाबद्दल माहिती समाविष्ट असू शकते. तुम्ही सर्वसाधारण भाग वापरून एखादी गोष्ट शोधता, तेव्हा तुमचा शोध किमान ३ चौ. किमी. भाग वापरतो किंवा भागामध्ये किमान १,००० लोक दिसेपर्यंत विस्तार करतो. यामुळे तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यात मदत होते.

काही बाबतीत, तुम्ही याआधी शोधलेले भाग तुमच्या शोधासाठी संबंधित स्थानाचा अंदाज लावण्यासाठी वापरले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही चेल्सी येथे असताना कॉफी शॉप शोधले असल्यास, Google हे आगामी शोधांमध्ये चेल्सी या स्थानासाठी परिणाम दाखवू शकते.

तुम्ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी येथे तुमची वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी पाहू व नियंत्रित करू शकता.

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केलेले नसल्यास, अधिक सुसंगत परिणाम आणि शिफारशी पुरवण्यात मदत करण्यासाठी, तुम्ही वापरत असलेल्या डिव्हाइसवरील मागील शोधांची स्थानाशी संबंधित काही माहिती Google स्टोअर करू शकते. तुम्ही शोध कस्टमायझेशन बंद केल्यास, तुमच्या स्थानाचा अंदाज करण्यासाठी Google मागील शोध ॲक्टिव्हिटी वापरणार नाही. खाजगीरीत्या कसे शोधावे आणि ब्राउझ करावे याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही सेव्ह केलेल्या घराच्या किंवा ऑफिसच्या पत्त्यावरून

तुमचे घर किंवा तुमचे ऑफिस यांसारखी तुमच्यासाठी महत्त्वाची असलेली ठिकाणे तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करण्याचे निवडू शकता. तुम्ही तुमच्या घराचे किंवा ऑफिसचे पत्ते सेट केलेले असल्यास, ते तुम्हाला गोष्टी आणखी सुलभपणे करण्यात मदत व्हावी, यासाठी वापरले जाऊ शकतात, जसे की दिशानिर्देश मिळवणे अथवा तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या जवळपासचे परिणाम शोधणे आणि आणखी तुम्हाला अधिक उपयुक्त जाहिराती दाखवणे.

तुमच्या Google खाते मध्ये तुम्ही कधीही तुमच्या घराचा किंवा ऑफिसचा पत्ता संपादित करू अथवा हटवू शकता.

तुमच्या डिव्हाइसवरून

Google अ‍ॅप्स तुमच्या डिव्हाइसवरून स्थान कसे वापरतात

तुमचे नेमके स्थान हे Search आणि Maps यांसारख्या Google च्या ॲप्ससह, ॲप्सना उपलब्ध आहे का हे नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला वापरता येणारी सेटिंग्ज किंवा परवानग्या डिव्हाइसमध्ये असतात. दिशानिर्देश देण्यासाठी किंवा तुमच्या जवळपासचे उपयुक्त शोध परिणाम मिळवण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, Google Maps सारख्या ॲप्समध्ये या प्रकारचे अचूक स्थान उपयुक्त असते. उदाहरणार्थ, अचूक स्थान सेटिंग्ज किंवा परवानग्या सुरू असताना, स्थानिक ठिकाणे आणि हवामानासंबंधी माहिती यांसारख्या गोष्टींसाठी तुम्हाला अधिक सुसंगत परिणाम मिळतील.

iOS आणि Android या दोन्हींमध्ये ॲपच्या स्थान परवानग्यांसाठी सेटिंग्ज आहेत, जी तुम्ही सुरू किंवा बंद करू शकता. स्थानावर आधारित वैशिष्ट्ये आणि सेवा देण्यासाठी तुम्ही ॲप्सना तुमचे स्थान वापरू देऊ शकता. लक्षात ठेवा, की काहीवेळा ॲप्ससाठी तुमचे अचूक स्थान तात्पुरते स्टोअर करणे आवश्यक असते, जेणेकरून ती तुम्हाला झटपट उपयुक्त परिणाम देऊ शकतील किंवा स्थान अपडेट करत राहण्याची गरज टाळून बॅटरीची बचत करू शकतील.

काही अ‍ॅप्सना व्यवस्थित काम करण्यासाठी बॅकग्राउंडमध्ये तुमच्या डिव्हाइसचे स्थान अ‍ॅक्सेस करण्याची आवश्यकता असते, जसे की Find My Device किंवा तुम्हाला स्थान शेअरिंग यांसारखी ठराविक वैशिष्ट्ये वापरायची असल्यास.

तुमच्या Android डिव्हाइसवर स्थान कसे काम करते याबाबत अधिक माहितीसाठी, येथे पहा.

माझ्या Google खाते मध्ये स्थान इतिहास व वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी कशी सेव्ह केली जाते?

येत्या काही महिन्यांमध्ये आणि २०२४ मध्ये, स्थान इतिहास सेटिंग बदलेल. या बदलामुळे त्यांच्या खात्यावर परिणाम झाल्यावर सद्य स्थान इतिहास वापरकर्त्यांना सूचित केले जाते आणि त्यांना सूचित केल्यानंतर, त्यांना त्यांच्या खाते आणि ॲप सेटिंग्जमध्ये नाव टाइमलाइन दिसू लागेल. टाइमलाइन वापरणाऱ्यांसाठी, ज्यांनी थेट टाइमलाइन सुरू केली आहे अशा वापरकर्त्यांसह, स्थान इतिहासातील स्थान डेटाबद्दल या पेजवर पुरवलेली माहिती त्यांच्या टाइमलाइनच्या वापरावर लागू होते. अधिक जाणून घ्या.

स्थान इतिहास व वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी

स्थान इतिहास व वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी ही स्थान वापरणारी खाते Google खाते सेटिंग्ज आहेत. येथे प्रत्येकाचे अवलोकन दिले आहे. लक्षात ठेवा, की इतर वैशिष्ट्ये किंवा उत्पादनेदेखील स्थानासंबंधी माहिती गोळा अथवा स्टोअर करू शकतात.

स्थान इतिहास

तुम्ही स्थान इतिहास सुरू केल्यास, तो टाइमलाइन तयार करेल, हा वैयक्तिक नकाशा आहे जो तुम्ही भेट दिलेली ठिकाणे आणि तुम्ही वापरलेले मार्ग व तुमचे प्रवास लक्षात ठेवण्यात तुम्हाला मदत करतो.

स्थान इतिहास बाय डीफॉल्ट बंद केलेला असतो. तुम्ही स्थान इतिहास सुरू केल्यास, स्थान अहवाल सेटिंग सुरू केलेल्या प्रत्येक पात्र मोबाइल डिव्हाइससाठी, तुमच्या डिव्हाइसचे अचूक स्थान नियमितपणे सेव्ह केले जाते. तुमची Google ॲप्स वापरली जात नसतानादेखील, ही डिव्हाइसची स्थाने तुमची टाइमलाइन तयार करण्यासाठी वापरली जातात.

प्रत्येकासाठी Google अनुभव अधिक उपयुक्त बनवण्याकरिता, पुढील गोष्टी करण्यासाठी स्थान इतिहास वापरला जाऊ शकतो

  • ॲनोनिमाइझ केलेल्या स्थानासंबंधी माहितीच्या आधारे लोकप्रिय वेळा आणि पर्यावरणाशी संबंधित इनसाइट यांसारखी माहिती दाखवणे
  • घोटाळा आणि गैरवापर डिटेक्ट करणे व रोखणे
  • Google सेवा, तसेच जाहिरातीची उत्पादने यांमध्ये सुधारणा करणे आणि ती डेव्हलप करणे

जाहिरातीमुळे लोक त्यांच्या स्टोअरना भेट देतात या संभाव्यतेचा अंदाज लावण्यातदेखील स्थान इतिहास व्यवसायांना मदत करणे हे करू शकतो.

तुमच्या टाइमलाइन मध्ये काय सेव्ह केले आहे त्याचे तुम्ही कधीही पुनरावलोकन करू शकता, ते संपादित करू शकता आणि हटवू शकता. तुम्ही स्थान इतिहास सुरू केला आहे का ते पाहण्यासाठी, तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल ला भेट द्या. तेथे, तुम्ही स्थान इतिहास सेटिंग आणि कोणती डिव्हाइस त्यांच्या स्थानाचा अहवाल देत आहेत हे नियंत्रित करू शकता.

स्थान इतिहास सेटिंगचा भाग म्हणून तुमचे अचूक स्थान किती वेळा गोळा केले जाते हे बदलत असते. उदाहरणार्थ, तुम्ही Google Maps मध्ये नेव्हिगेशन वापरत असल्यास, ते दर मिनिटाला एकाहून अधिक वेळा गोळा केले जाऊ शकते. पण तुम्ही तुमचा फोन सक्रियपणे वापरत नसल्यास, ते दर काही तासांनी एकदा गोळा केले जाऊ शकते.

स्थान इतिहास डेटा किती दिवस सेव्ह केला जातो हे तुमच्या सेटिंग्जवर अवलंबून आहे—तुम्ही हा डेटा ३, १८ किंवा ३६ महिने जुना झाल्यानंतर आपोआप हटवणे निवडू शकता किंवा तुम्ही तो हटवत नाही, तोपर्यंत ठेवू शकता.

लक्षात ठेवा

तुम्ही स्थान इतिहास बंद केल्यास

  • तुम्ही सेव्ह केलेला कोणताही मागील स्थान इतिहास डेटा तुम्ही हटवत नाही, तोपर्यंत Google तो स्टोअर करणे पुढे सुरू ठेवेल किंवा तुमच्या ऑटो-डिलीट सेटिंग्जचा भाग म्हणून तुम्ही निवडलेल्या कालावधीनंतर तो हटवला जाईल.
  • स्थान इतिहास बंद केल्यामुळे स्थान माहिती कशी सेव्ह केली जाते किंवा वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी अथवा इतर Google उत्पादने कशी वापरली जातात यावर परिणाम होत नाही, उदा., तुमच्या आयपी अ‍ॅड्रेसवर आधारित. तुमच्याकडे अजूनही स्थान माहिती सेव्ह करणारी इतर सेटिंग्ज असू शकतात.

तुम्ही स्थान इतिहास सुरू केला आहे का ते पाहण्यासाठी, तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल ला भेट द्या. अधिक जाणून घ्या.

वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी

Maps, Search व इतर Google सेवा यांमध्ये तुमचा अनुभव आणखी पर्सनलाइझ करण्यासाठी, तुमचा वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी डेटा वापरला जातो. तुमच्‍या जाहिराती सेटिंग्‍जवर आधारित तुम्‍हाला आणखी उपयुक्त जाहिराती दाखवण्‍यासाठीदेखील याचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये साइन इन केलेल्या सर्व डिव्हाइसवर वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी काम करेल.

वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू केलेली असते, तेव्हा Google तुम्ही सर्व Google सेवांवर करत असलेल्या गोष्टींबद्दलचा डेटा तुमच्या खात्याच्या वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी मध्ये सेव्ह करेल. तुम्ही जेथे Google सेवा वापरली तो सर्वसाधारण भाग यासारखी संबंधित माहिती यामध्ये समाविष्ट आहे.

उदाहरणार्थ, तुम्ही हवामानासंबंधी माहिती शोधल्यास आणि तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवरून पाठवलेल्या स्थानासाठी परिणाम मिळाल्यास, तुम्ही शोधले तेव्हा तुमचे डिव्हाइस ज्या सर्वसाधारण भागामध्ये होते त्यासह, ही ॲक्टिव्हिटी तुमच्या वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी मध्ये सेव्ह केली जाते. तुमच्या डिव्हाइसने पाठवलेले अचूक स्थान स्टोअर केले जात नाही, फक्त स्थानाचा सर्वसाधारण भाग स्टोअर केला जातो. भविष्यातील शोधामध्ये अधिक सुसंगत स्थान निर्धारित करण्यात Google ला मदत करण्यासाठी वापरले जाऊ शकणारे सेव्ह केलेले स्थान हे आयपी ॲड्रेसवरून किंवा तुमच्या डिव्हाइसवरून येऊ शकते. हे सेव्ह केलेले स्थान ३० दिवसांनंतर तुमच्या वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी मधून आपोआप हटवले जाते.

वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी डेटा Google ला तुमच्यासाठी उपयुक्त असलेले सर्वसाधारण भाग समजून घेण्यात मदत करतो आणि तुम्ही Google वर एखादी गोष्ट शोधता, तेव्हा त्या भागांसाठी परिणाम समाविष्ट केले जातात.

तुमच्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल येथे भेट देऊन तुम्ही तुमच्या वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी मध्ये सेव्ह केलेल्या स्थानाचे आणि इतर माहितीचे तुम्ही पुनरावलोकन करू शकता, ती हटवू शकता किंवा बंद करू शकता. वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी बंद केल्याने तुमचा भविष्यातील ॲक्टिव्हिटी डेटा सेव्ह केला जाणे थांबेल.

लक्षात ठेवा

तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद केल्यास

  • तुमच्याकडे अजूनही सेव्ह केलेली अ‍ॅक्टिव्हिटी असू शकते, जी तुम्ही हटवेपर्यंत वापरली जाऊ शकते. तुम्ही ही कधीही हटवू शकता. तुम्ही सेव्ह केलेली स्थान माहिती अजूनही ३० दिवसांनंतर आपोआप हटवली जाते.
  • वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद केल्यामुळे स्थान माहिती कशी सेव्ह केली जाते किंवा स्थान इतिहास यांसारख्या इतर सेटिंग्जद्वारे कशी वापरली जाते यावर परिणाम होत नाही. तुमच्याकडे अजूनही इतर सेटिंग्जचा भाग म्हणून इतर प्रकारची स्थान माहिती सेव्ह केलेली असू शकते, ज्यामध्ये आयपी अ‍ॅड्रेस समाविष्ट आहे.

तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केली आहे का ते पाहण्यासाठी, तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल ला भेट द्या. अधिक जाणून घ्या

स्यूडोनिमस किंवा निनावी असलेली स्थानासंबंधी माहिती Google कशी वापरते?

Google हे ॲनोनिमाइझ केलेली किंवा स्यूडोनिमाइझ केलेली स्थानासंबंधी माहिती लोकांची गोपनीयता वर्धित करण्यात मदत करण्यासाठी वापरते. ॲनोनिमाइझ केलेली माहिती ही सर्वसाधारणपणे कोणत्याही व्यक्तीशी संबंधित असू शकत नाही. स्यूडोनिमाइझ केलेली माहिती ही एखाद्या व्यक्तीचे खाते, नाव किंवा ईमेल ॲड्रेस यांसारख्या अधिक वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य माहितीपेक्षा संख्यांच्या स्ट्रिंगसारख्या युनिक आयडेंटिफायरशी संबद्ध केली जाऊ शकते. अशा जाहिराती किंवा ट्रेंड यांसारख्या उद्देशांसाठी Google त्याच्या उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये ॲनोनिमाइझ केलेली अथवा स्यूडोनिमाइझ केलेली स्थानासंबंधी माहिती वापरू शकते.

वापरकर्ते हे स्थान माहितीशी लिंक केलेले ठरावीक स्यूडोनिमस आयडेंटिफायर रीसेट करू शकतात. उदाहरणार्थ, लोक त्यांच्या Android डिव्हाइसवर जाहिरात आयडी रीसेट करून ठरावीक स्यूडोनिमस आयडेंटिफायर रीसेट करू शकतात. याव्यतिरिक्त, Google हे वापरकर्त्याची गोपनीयता वर्धित करण्यासाठी ठरावीक स्यूडोनिमस आयडेंटिफायर आपोआप रीसेट करते, यामध्ये GLA समाविष्ट आहे, असे डिव्हाइस सेटिंग जे वापरकर्ते त्यांच्या डिव्हाइसवरील स्थान आधारित सेवा आणि अचूकता यांमध्ये सुधारणा करण्यासाठी नियंत्रित करू शकतात.

स्वतंत्रपणे, Google हे ॲनोनिमाइझ केलेली स्थानासंबंधी माहिती वापरू शकते. उदाहरणार्थ, लोक Google Maps मध्ये रेस्टॉरंट किंवा उद्यान यांसारख्या ठिकाणांवर टॅप करू शकतात आणि एखाद्या भागातील त्या ठिकाणांवरील ट्रेंड पाहू शकतात. लोकप्रिय वेळा यासारखे ट्रेंड तयार करण्यासाठी वापरली जाणारी स्थानासंबंधी माहिती ही एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी वापरली जाऊ शकत नाही. Google कडे वर्दळीच्या प्रमाणाची अचूक आणि निनावी माहिती पुरवण्यासाठी पुरेशी माहिती नसल्यास, ती Google वर दिसत नाही.

Google हे साइन-आउट केलेल्या लोकांना त्यांच्या ब्राउझर किंवा डिव्हाइसशी संबंधित माहिती व्यवस्थापित करण्याचे इतर मार्गदेखील ऑफर करते, यामध्ये Search कस्टमायझेशन सेटिंग, YouTube सेटिंग्ज आणि जाहिरात सेटिंग्ज समाविष्ट आहेत. अधिक जाणून घ्या

Google गोपनीयता धोरण यामध्ये Google चा स्थान माहितीचा वापर याबद्दल अधिक जाणून घ्या. Google हे गोळा केलेला डेटा कसा स्टोअर करते आणि Google हे डेटा कसा अ‍ॅनोनिमाइझ करते याबद्दल अधिक जाणून घ्या.

Google हे स्थानासंबंधी माहिती किती काळ राखून ठेवते?

Google गोपनीयता धोरण यामध्ये वापरकर्त्याचा डेटा, तसेच Google गोळा करत असलेली स्थान माहिती यांसाठी आमच्या स्टोरेज पद्धतींचे वर्णन केले आहे. स्थान माहिती कोणती आहे, ती कशी वापरली जाते आणि लोक त्यांची सेटिंग्ज कशी कॉंफिगर करतात यानुसार स्थान माहिती ही वेगवेगळ्या कालावधींसाठी गोळा केली जाते.

स्थानासंबंधी काही माहिती तुमच्या Google खाते मध्ये तुम्ही ती हटवेपर्यंत सेव्ह केली जाते

  • डेटा स्टोरेज नियंत्रित करणे आणि हटवणे: स्थान इतिहास व वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी या दोन्हींसाठी ऑटो-डिलीटचा पर्याय उपलब्ध आहे, जो वापरून तुम्ही ३, १८ किंवा ३६ महिन्यांनंतर डेटा आपोआप हटवू शकता. तुम्ही टाइमलाइन आणि माझी अ‍ॅक्टिव्हिटी ला भेट देऊनही हा डेटा पाहू शकता व तुमच्या प्राधान्यानुसार विशिष्ट अ‍ॅक्टिव्हिटी किंवा बल्क-डेटा हटवू शकता. तुम्ही या सेटिंग्जमध्ये कधीही फेरबदल करू शकता किंवा तुमचा ऑटो-डिलीटचा पर्याय बदलू शकता.
  • स्थानासंबंधी माहिती सेव्ह करणे: Google उत्पादन किंवा सेवा यांनुसार, स्थानासंबंधी माहिती तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही Photos मध्ये स्थाने टॅग करू शकता किंवा Maps मध्ये घराचा अथवा ऑफिसचा पत्ता जोडू शकता. ही स्थानासंबंधी माहिती तुम्ही हटवू शकता.

तुम्ही डेटा हटवता, तेव्हा तो डेटा तुमच्या खात्यातून सुरक्षितपणे आणि पूर्णपणे काढून टाकण्यासाठी Google हे धोरणाचे पालन करते, जेणेकरून डेटा रिकव्हर करणे यापुढे शक्य होणार नाही. सर्वप्रथम, तुम्ही हटवलेली अ‍ॅक्टिव्हिटी व्ह्यूमधून काढून टाकली जाते आणि यापुढे तुमचा Google अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी ती वापरली जात नाही. त्यानंतर, Google हे Google स्टोरेज सिस्टीमवरून डेटा सुरक्षितपणे आणि पूर्णपणे हटवण्यासाठी तयार केलेली प्रक्रिया सुरू करते. Google हे गोळा केलेला डेटा कसा स्टोअर करते याबद्दल अधिक जाणून घ्या.

ठरावीक कालावधीनंतर एक्स्पायर होणारी माहिती

स्थानासंबंधी इतर माहितीसाठी, Google हे डेटा कसा राखून ठेवते यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे, मॅन्युअली हटवला जाण्याऐवजी, काही वेळा Google हे डेटा हटवण्यापूर्वी तो सेट केलेल्या काळासाठी स्टोअर करते. तो सुरक्षितपणे आणि पूर्णपणे हटवण्यासाठी लागणारा वेळ डेटाच्या प्रकारावर अवलंबून असतो, उदाहरणार्थ:

  • Google हे ९ महिन्यांनंतर आयपी ॲड्रेसचा भाग आणि १८ महिन्यांनंतर कुकीसंबंधी माहिती काढून टाकून सर्व्हर लॉगमधील जाहिरात डेटा ॲनोनिमाइझ करणे हे करते.
  • Google हे ३० दिवसांनंतर आयपी वर आधारित स्थान आणि डिव्हाइसचे स्थान तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी मधून हटवते.

मर्यादित उद्देशांकरिता दीर्घ कालावधीसाठी राखून ठेवलेली माहिती

Google गोपनीयता धोरण यामध्ये वर्णन केल्यानुसार, “वैध व्यवसायासाठी किंवा कायदेशीर उद्देशांसाठी आवश्यक असताना, सुरक्षा, घोटाळा अथवा गैरवापर रोखणे किंवा आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड ठेवणे यांसारख्या उद्देशांसाठी, काही डेटा आम्ही अधिक दीर्घ कालावधीसाठी राखून ठेवतो.” राखून ठेवण्याच्या पद्धतींबद्दल अधिक जाणून घ्या

स्थानासंबंधी माहिती जाहिरातींसाठी कशी वापरली जाते?

तुम्हाला अधिक सुसंगत जाहिराती दाखवण्यात मदत करण्यासाठी

तुम्हाला दिसणाऱ्या जाहिराती तुमच्या स्थान माहितीवर अवलंबून असू शकतात. सर्वसाधारणपणे, Google वरील जाहिराती आणि त्या जिथे दिसतात ती उत्पादने स्थान माहिती सारखेच प्रकार वापरतात. उदाहरणार्थ, तुमच्या सेटिंग्जनुसार, Search आणि इतर Google सर्फेसवरील जाहिराती या तुमच्या डिव्हाइसच्या स्थानावर, तुमच्या आयपी अ‍ॅड्रेसवर, पूर्वीच्या अ‍ॅक्टिव्हिटीवर किंवा तुमच्या Google खाते मधील तुमच्या घराच्या व ऑफिसच्या पत्त्यांवर आधारित असू शकतात. याव्यतिरिक्त, मेटाडेटा (उदा. ब्राउझरचा टाइमझोन, डोमेन, पेजवरील आशय, ब्राउझरचा प्रकार, पेजची भाषा) हा तुमच्या देशाचा किंवा तुम्हाला स्वारस्य असलेल्या सर्वसाधारण भागाचा अंदाज लावण्यासाठी वापरला जाऊ शकतो. तुमचा आयपी अ‍ॅड्रेस, VPN, प्रॉक्सी सेवा किंवा इतर नेटवर्क माहितीवरून आम्हाला मिळणाऱ्या स्थान सिग्नलच्या व्यतिरिक्त आम्ही या मेटाडेटावर अवलंबून राहू शकतो.

स्थान माहिती वापरल्यामुळे तुम्हाला दिसत असलेल्या जाहिराती तुम्ही ज्या भागात आहात त्या भागासाठी किंवा तुमच्याशी संबंधित असलेल्या भागांसाठी अधिक उपयुक्त बनवण्यात मदत होते. उदाहरणार्थ, तुमच्या डिव्हाइसचे स्थान सेटिंग सुरू असल्यास आणि तुम्ही Google वर तुमच्या जवळपासची रेस्टॉरंट शोधत असल्यास, तुमच्या जवळपासच्या रेस्टॉरंटसाठी तुम्हाला जाहिराती दाखवण्याकरिता तुमच्या डिव्हाइसचे सध्याचे स्थान वापरले जाऊ शकते. Google वरील जाहिरातींचा भाग म्हणून, तुम्हाला जवळपासच्या व्यवसायांचे अंतर दाखवण्यासाठीदेखील तुमचे स्थान वापरले जाऊ शकते.

तुम्हाला अधिक सुसंगत जाहिराती दाखवण्यासाठी, Google हे तुमची मागील ब्राउझिंग किंवा ॲप ॲक्टिव्हिटी (जसे की तुमचे शोध, वेबसाइटना दिलेल्या भेटी अथवा तुम्ही YouTube वर पाहिलेले व्हिडिओ) तसेच वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सेटिंगचा भाग म्हणून सेव्ह केलेले सर्वसाधारण भागदेखील वापरू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही जवळपास दूध कुठे खरेदी करायचे हे Google वर शोधल्यास, बस किंवा ट्रेनची प्रतीक्षा करत असताना तुम्ही जेथे वारंवार Google Search ब्राउझ करता त्या सर्वसाधारण भागामधील किराणा दुकानांच्या जाहिराती दिसू शकतात.

जाहिरातदार फक्त देश, शहरे किंवा त्यांच्या व्यवसायाच्या आजूबाजूचे प्रदेश यांसारख्या सर्वसाधारण भागांसाठी जाहिराती लक्ष्यित करू शकतात.

आमच्या Display Network बद्दल अतिरिक्त माहितीसाठी, मदत केंद्र ला भेट द्या.

परफॉर्मन्स मोजण्यात जाहिरातदारांना मदत करण्यासाठी

Google सेवा कशा वापरल्या जातात हे समजून घेण्यासाठी, Google हे विश्लेषण आणि मापन यासाठीदेखील स्थान माहिती वापरू शकते. ​उदाहरणार्थ, तुम्ही स्थान इतिहास सुरू करण्याचे निवडले असल्यास, लोक ऑनलाइन जाहिरातींमुळे त्यांच्या स्टोअरना भेट देण्याची शक्यता असल्यास, जाहिरातदारांना अंदाज लावण्यात मदत करणे हे करण्यासाठी Google हा डेटा वापरू शकते. जाहिरातदारांसोबत फक्त निनावी अंदाज शेअर केले जातात, वैयक्तिक माहिती नाही. हे करण्यासाठी, Google हे तुमचा ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटी डेटा कनेक्ट करते, जसे की जाहिरातदारांच्या स्टोअरशी संबंधित स्थान इतिहास डेटा असलेल्या जाहिरात क्लिक. तुमचा स्थान इतिहास जाहिरातदारांसोबत शेअर केला जात नाही.

Google ची उत्पादने आणि सेवा यांमध्ये सुधारणा करण्यासाठी

Google हे त्याची जाहिरात उत्पादने सुधारण्यासाठीदेखील स्थान माहिती वापरते. उदाहरणार्थ, तुम्ही संवाद साधलेल्या जाहिरातींबद्दल डेटा, ज्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केलेल्या संबंधित अ‍ॅक्टिव्हिटीसाठी सर्वसाधारण भाग समाविष्ट आहे, जी एकत्रित केली जाऊ शकते आणि स्मार्ट बोली टूलमध्ये सुधारणा करणाऱ्या मशीन लर्निंग मॉडेलमध्ये वापरली जाऊ शकते. तुमच्या खात्याशी संबंधित डेटा जाहिरातदारांसोबत शेअर केला जात नाही.

जाहिराती दाखवण्यासाठी माझी स्थानासंबंधी माहिती कशी वापरली जाते ते मी कसे नियंत्रित करावे?

माझे Ad केंद्र मधील तुम्ही Google वापरले होते ते भाग हे नियंत्रण ॲक्सेस करून तुम्ही ज्या सर्वसाधारण भागांमध्ये यापूर्वी Google साइट आणि ॲप्स वापरले होते ते तुम्हाला दिसत असलेल्या जाहिरातींवर परिणाम करण्यासाठी कसे वापरले जाऊ शकतात हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

तुम्ही जेथे Google वापरले आहे ते भाग सुरू असताना

जाहिरात पर्सनलायझेशन आणि तुम्ही ज्या भागांमध्ये Google वापरले ते भाग हे सुरू केलेले असल्यास, Google हे तुमच्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी, तुम्ही ज्या सर्वसाधारण भागांमध्ये Google साइट व अ‍ॅप्स वापरली आहेत त्या भागांशी संबंधित वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सह सेव्ह केलेला डेटा वापरेल.

तुम्ही जेथे Google वापरले आहे ते भाग बंद असताना

जाहिरात पर्सनलायझेशन किंवा तुम्ही जेथे Google वापरले आहे ते भाग हे बंद केलेले असल्यास, तुमच्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी, Google हे तुम्ही ज्या सर्वसाधारण भागांमध्ये Google साइट व ॲप्स वापरली आहेत त्या भागांशी संबंधित वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी मध्ये सेव्ह केलेला डेटा वापरत नाही. तुम्ही जेथे Google वापरले आहे ते भाग बंद केलेले असतानादेखील, तुम्हाला तरीही तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये तुमचे घर किंवा ऑफिस म्हणून सेट केलेल्या तुमच्या सध्याच्या स्थानावर आणि ठिकाणांवर आधारित जाहिराती दिसू शकतात.

त्याव्यतिरिक्त, तुम्ही साइन आउट केलेले असल्यास, तुमचे डिव्हाइस आणि ॲप सेटिंग्ज यांनुसार तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी Google तरीही तुमचा आयपी ॲड्रेस किंवा तुमचे डिव्हाइस यांमधील तुमचे सध्याचे स्थान वापरू शकते.

तुम्ही साइन आउट केलेले असताना पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती सुरू किंवा बंद कशा कराव्यात याबाबत अतिरिक्त माहितीसाठी, येथे पहा.

Google Apps
मुख्य मेनू