Google नमुना ओळख कसे वापरते

प्रतिमा अर्थपूर्ण बनविण्यासाठी Google नमुना ओळख कसे वापरते

लोक पाहतात तशाच प्रकारे काँप्युटर फोटो आणि व्हिडिओ “पाहत” नाही. तुम्ही एखादा फोटो पाहिल्यावर, तुम्हाला कदाचित तुमची जिवलग मैत्रीण तिच्या घरासमोर उभी असलेली दिसेल. काँप्युटरच्या दृष्टीतून, तीच इमेज म्हणजे फक्त डेटाचा एक गुच्छ आहे ज्याचा अर्थ तो आकार आणि रंग मूल्यांची माहिती असा लावू शकतो. तुम्ही तो फोटो पाहिल्यावर द्याल त्याप्रमाणे काँप्युटर प्रतिक्रिया देत नसला तरी, काँप्युटरला रंग आणि आकारांचे ठराविक पॅटर्न ओळखण्यासाठी प्रशिक्षित केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, समुद्रकिनाऱ्यासारखे लॅंडस्केप किंवा कारसारख्या वस्तूची डिजिटल इमेज तयार करणारे आकार आणि रंगांचे सामान्य पॅटर्न ओळखण्यासाठी काँप्युटरला प्रशिक्षित केले जाऊ शकते. हे तंत्रज्ञान Google फोटो ला तुमचे फोटो व्यवस्थापित करण्यात मदत करते आणि वापरकर्त्यांना साध्या शोधाने कोणताही फोटो शोधू देते.

चेहऱ्याची डिजिटल इमेज तयार करणारे आकार आणि रंगांचे सामान्य पॅटर्न ओळखण्यासाठीदेखील काँप्युटरला प्रशिक्षित केले जाऊ शकते. या प्रक्रियेला चेहरा ओळख म्हटले जाते आणि काँप्युटर मार्ग दृश्य कार ज्या रस्त्यावरून गेली त्यावर उभ्या असलेल्या कोणत्याही लोकांचे चेहरे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर ते धूसर करतात अशा मार्ग दृश्य सारख्या सेवांवर तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यात Google ला मदत करणारे हे तंत्रज्ञान आहे.

तुम्ही थोडे आणखी प्रगत झाल्यास, चेहरा ओळखला समर्थन देणारे तेच पॅटर्न ओळख तंत्रज्ञान काँप्युटरला त्याने शोधलेल्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये समजण्यात मदत करू शकते. उदाहरणार्थ, काही पॅटर्न असे असू शकतात जे चेहरा हसरा आहे किंवा त्याचे डोळे मिटले आहेत असे सुचवतात. यासारखी माहिती Google फोटो च्या तुमच्या फोटो किंवा व्हिडिओवरून तयार केलेल्या चित्रपट किंवा इतर इफेक्टच्या सूचनांसारख्या वैशिष्ट्यांबाबत मदत होण्यासाठी वापरली जाऊ शकते.

यासारखे तंत्रज्ञान ठराविक देशांत Google फोटो मध्ये उपलब्ध असलेल्या फेस ग्रुपिंग वैशिष्ट्यालादेखील समर्थित करते, ज्यामुळे काँप्युटरला सारखे चेहरे शोधण्यात आणि ते एकत्र ग्रुप करण्यात मदत होते आणि हे वापरकर्त्यांसाठी त्यांचे फोटो शोधणे आणि व्यवस्थापित करणे आणखी सोपे बनवते. Google फोटो मदत केंद्रात फेस ग्रुपिंग बद्दल आणखी वाचा.

व्हॉइस शोध कसे कार्य करते

व्हॉइस शोध तुम्हाला व्हॉइस क्वेरी टाइप करण्याऐवजी ती डिव्हाइसवरील Google शोध क्लायंट ॲप्लिकेशनवर पुरवू देतो. ते बोललेल्या शब्दांचे लेखी मजकुरात प्रतिलेखन करण्यासाठी पॅटर्न ओळख वापरते. तुम्ही काय बोलला होता ते ओळखण्यासाठी आम्ही Google सर्व्हरना उच्चारणे पाठवतो.

व्हॉइस शोध साठी बनवलेल्या प्रत्येक व्हॉइस क्वेरीसाठी, आम्ही भाषा, देश आणि काय बोलले गेले होते याबद्दलचा आमच्या सिस्टमचा अंदाज स्टोअर करतो. तुम्ही अशा डेटा वापराला तुमची संमती दिली असल्यास, योग्य शोध क्वेरी अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आमच्या सिस्टमला प्रशिक्षित करण्यासह, आमच्या सेवा सुधारण्यासाठी आम्ही उच्चारणे राखून ठेवतो. तुम्ही तुमचा व्हॉइस शोध कार्य (उदाहरणार्थ, त्वरित शोध बारमध्ये किंवा व्हर्च्युअल कीबोर्डवर मायक्रोफोन आयकन दाबणे किंवा त्वरित शोध बारने व्हॉइस शोध कार्य उपलब्ध असल्याचे सूचित केल्यावर “Google” म्हणणे) वापरण्याचा हेतू आहे असे सूचित केले नसल्यास आम्ही Google ला कोणतीही उच्चारणे पाठवत नाही.

Google Apps
मुख्य मेनू