जनरेटिव्ह AI च्या प्रतिबंधित वापरासंबंधित धोरण

शेवटचे फेरबदल केले: १४ मार्च, २०२३

जनरेटिव्ह AI मॉडेल तुम्हाला नवीन विषय एक्सप्लोर करण्यात, तुमच्या सर्जनशीलतेला प्रेरणा देण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यात मदत करू शकतात. मात्र, तुम्‍ही त्‍यांचा वापर जबाबदारीने, कायदेशीर पद्धतीने कराल अशी आम्‍ही अपेक्षा करतो. यासाठी, तुम्ही Google सेवांचा वापर येथे देण्यात आलेल्या त्या गोष्टींसाठी करू नये ज्यांच्यावर हे धोरण लागू होते:

  1. पुढील गोष्टींच्या समावेशासह धोकादायक, बेकायदेशीर किंवा दुर्भावनापूर्ण अ‍ॅक्टिव्हिटी करणे अथवा त्यासाठी मदत करणे
    1. बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटीसाठी मदत करणे किंवा त्यांचे प्रमोशन करणे अथवा कायद्याचे उल्लंघन करणे, जसे की
      1. बाल लैंगिक अत्याचार किंवा शोषणाशी संबंधित आशय प्रमोट करणे अथवा तो तयार करणे
      2. बेकायदेशीर पदार्थ, वस्तू किंवा सेवांची विक्री प्रमोट करणे अथवा त्यासाठी सुविधा देणे किंवा त्या गोष्टी तयार अथवा अ‍ॅक्सेस करण्याकरिता सूचना देणे
      3. कोणत्याही प्रकारचे गुन्हे करण्यासाठी वापरकर्त्यांना मदत करणे किंवा प्रोत्साहित करणे
      4. हिंसक अतिरेक किंवा दहशतवादासंबंधित आशय प्रमोट करणे अथवा तो तयार करणे
    2. सेवांचा गैरवापर करणे, त्यांना हानी पोहोचवणे, त्यांमध्ये अडथळे किंवा व्यत्यय आणणे (अथवा इतरांना तसे करण्यास प्रवृत्त करणे), जसे की
      1. स्पॅमची निर्मिती किंवा वितरण प्रमोट करणे अथवा त्यासाठी मदत करणे
      2. फसव्या किंवा कपटपूर्ण अ‍ॅक्टिव्हिटी, घोटाळे, फिशिंग अथवा मालवेअरसाठी आशय तयार करणे.
    3. सुरक्षितता फिल्टर ओव्हरराइड करण्याचा किंवा टाळण्याचा प्रयत्न करणे अथवा आमच्या धोरणांचे उल्लंघन होईल अशा प्रकारे काम करण्यासाठी मॉडेलचा हेतुपुरस्सर वापर करणे
    4. व्यक्ती किंवा गटाला हानी पोहोचवणारा अथवा प्रमोट करणारा आशय तयार करणे, जसे की
      1. द्वेषाला उत्तेजन देणारा किंवा त्याला प्रोत्साहन देणारा आशय तयार करणे
      2. इतरांना धमकावणे, त्यांच्याशी गैरवर्तन करणे किंवा त्यांचा अपमान करणे यासाठी छळ अथवा गुंडगिरी करण्याच्या पद्धतींसंबंधित मदत करणे
      3. हिंसा करण्यात मदत करणारा, ती प्रमोट करणारा किंवा त्याला चिथावणी देणारा आशय तयार करणे
      4. स्वतःला हानी पोहोचवण्यात मदत करणारा, ते प्रमोट करणारा किंवा त्यासाठी प्रोत्साहन देणारा आशय तयार करणे
      5. वितरण करण्यासाठी किंवा इतर प्रकारच्या हानी पोहोचवण्यासाठी वैयक्तिकरीत्या ओळखण्याची माहिती तयार करणे
      6. लोकांच्या संमतीशिवाय त्यांचा माग घेणे किंवा त्यांचे निरीक्षण करणे
      7. लोकांवर अन्यायकारक किंवा विपरीत परिणाम करणारा आशय तयार करणे, विशेषतः असा आशय जो संवेदनशील किंवा संरक्षित गटांसंबंधित वैशिष्ट्यांवर परिणाम करतो
  2. पुढील गोष्टींच्या समावेशासह चुकीची माहिती देणे, दिशाभूल करणे किंवा दिशाभूल करण्याच्या हेतूने आशय तयार करणे आणि तो वितरित करणे
    1. आशय हा माणसाने तयार केला आहे असा दावा करून किंवा फसवणूक करण्यासाठी, तयार केलेला आशय हा मूळ आशय असल्याचे प्रतिनिधित्व करून, तयार केलेल्या आशयाच्या स्रोतासंबंधित दिशाभूल करणे
    2. फसवणूक करण्याच्या उद्देशाने, सुस्पष्ट डिस्क्लोजरशिवाय एखाद्या व्यक्तीची (जिवंत किंवा मृत) तोतयेगिरी करणारा आशय तयार करणे
    3. विशेषत: संवेदनशील विभागांमध्ये (उदा. आरोग्य, आर्थिक, सरकारी सेवा किंवा कायदेशीर) कौशल्य अथवा क्षमतेचे दिशाभूल करणारे दावे
    4. आशय किंवा वैयक्तिक हक्क अथवा संतुलन (उदा. आर्थिक, कायदेशीर, रोजगार, आरोग्य सेवा, गृहनिर्माण, विमा आणि समाज कल्याण) यांवर परिणाम होईल असे डोमेनमध्ये ऑटोमेटेड निर्णय घेणे
  3. पोर्नोग्राफी किंवा लैंगिक आनंद देण्यासाठी (उदा. लैंगिक चॅटबॉट) तयार केलेल्या आशयासह लैंगिकदृष्ट्या भडक आशय तयार करणे. लक्षात घ्या, की यामध्ये वैज्ञानिक, शैक्षणिक, माहितीपट किंवा कलात्मक हेतूंसाठी तयार केलेल्या आशयाचा समावेश नाही.
Google Apps
मुख्य मेनू