Google सेवा अटी

प्रभावी ५ जानेवारी, २०२२ | संग्रहित आवृत्त्या | पीडीएफ डाउनलोड करा

देशानुसार आवृत्ती: युनायटेड स्टेट्स

या अटींमध्ये कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत

आम्हाला माहीत आहे की, या सेवा अटी वगळण्याचा मोह होऊ शकतो पण तुम्ही Google सेवावापरत असताना आम्ही तुम्हाला काय सेवा देऊ शकतो आणि आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतो हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

या सेवा अटी Google चा व्यवसाय कसा चालतो, आमच्या कंपनीला लागू असलेले कायदे आणि आम्ही नेहमी विश्वास ठेवत असलेल्या काही गोष्टी याचे वर्णन करतात. परिणामी, या सेवा अटी तुम्ही आमच्या सेवांशी संवाद साधता तेव्हा तुमच्याशी Google चे संबंध परिभाषित करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ, या अटींमध्ये खालील विषय शीर्षकांचा समावेश आहे:

या अटी समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण आमच्या सेवा वापरून तुम्ही या अटींना सहमती दर्शवत आहात.

या अटींव्यतिरिक्त आम्ही गोपनीयता धोरण देखील प्रकाशित करतो. तुम्ही तुमची माहिती कशी अपडेट, व्यवस्थापित, एक्सपोर्ट आणि हटवू शकता हे आणखी चांगल्याप्रकारे समजण्यासाठी तुम्ही हे वाचावे अशी आम्ही आवर्जून शिफारस करतो.

अटी

सेवा पुरवठादार

Google सेवा यांच्याद्वारे पुरवल्या जातात आणि तुम्ही यांच्यासोबत करार करत आहात:

Google LLC
डेलावेअर राज्य, यूएसएच्या कायद्यांतर्गत संघटित आणि यूएसएच्या कायद्यांतर्गत काम करत असलेले

1600 ॲम्फिथिएटर पार्कवे
माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया, 94043
यूएसए

वयाची आवश्यकता

तुमचे स्वतःचे Google खाते व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेल्या वयाहून तुम्ही लहान असल्यास, Google खाते वापरण्यासाठी तुमच्याकडे पालक किंवा कायदेशीर संरक्षकाची परवानगी असणे आवश्यक आहे. कृपया तुमच्या पालक किंवा कायदेशीर संरक्षकांना तुमच्याबरोबर या अटी वाचण्यास सांगा.

तुम्ही पालक किंवा कायदेशीर संरक्षक असल्यास आणि तुम्ही तुमच्या लहान मुलाला सेवा वापरण्याची अनुमती दिली असल्यास, या अटी तुम्हाला लागू होतात आणि तुम्ही या सेवांवरील तुमच्या लहान मुलाच्या ॲक्टिव्हिटीसाठी जबाबदार आहात.

काही Google सेवांना त्यांच्या सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी आणि धोरण यांमध्ये वर्णन केल्यानुसार वयाच्या अतिरिक्त आवश्यकता असतात.

तुमचे Google शी असलेले संबंध

या अटी तुमचे आणि Google मधील संबंध परिभाषित करण्यास मदत करतात. सविस्तरपणे सांगायचे तर, Google चा व्यवसाय कसा चालतो आणि आम्ही पैसे कसे कमवतो याचे वर्णन करणाऱ्या या अटींचे पालन करण्यास तुम्ही सहमती दिल्यास आम्ही आमच्या सेवा वापरण्यास परवानगी देतो. जेव्हा आम्ही “Google,” “आम्ही,” “आम्हाला" आणि “आमचे” असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ Google LLC आणि त्याच्या अनुषंगिक असा असतो.

तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करू शकता

उपयुक्त सेवांची विस्तृत रेंज पुरवणे

आम्ही या अटींच्या अधीन असलेल्या विविध प्रकारच्या सेवा देतो ज्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
  • ॲप्स आणि साइट (जसे की, Search व Maps)
  • प्लॅटफॉर्म (जसे की, Google Shopping)
  • इंटिग्रेट केलेल्या सेवा (जसे की, इतर कंपनीच्या ॲप्स किंवा साइटमध्ये एम्बेड केलेले Maps)
  • डिव्हाइस (जसे की, Google Nest)

तुम्ही स्ट्रीम करू शकता किंवा संवाद साधू शकता अशा आशयाचादेखील यांपैकी अनेक सेवांमध्ये समावेश आहे.

आमच्या सेवा एकत्र काम करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला एका ॲक्टिव्हिटीमधून दुसर्‍यामध्ये जाणे आणखी सोपे होते. उदाहरणार्थ, तुमच्या Calendar इव्हेंटमध्ये पत्त्याचा समावेश असल्यास, तुम्ही त्यावर क्लिक करू शकता आणि तेथे कसे जावे हे Maps तुम्हाला दाखवू शकते.

Google सेवा विकसित करणे, त्यांमध्ये सुधारणा करणे आणि त्या अपडेट करणे

आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही सातत्याने नवीन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये विकसित करत असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला एकाचवेळी भाषांतरे देण्यासाठी आणि स्पॅम व मालवेअर आणखी चांगल्या प्रकारे डिटेक्ट आणि ब्लॉक करण्यासाठी आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग वापरतो. सातत्याने करत असलेल्या या सुधारणेचा भाग म्हणून आम्ही कधीकधी वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता जोडतो किंवा काढून टाकतो, आमच्या सेवांच्या मर्यादा वाढवतो अथवा कमी करतो व नवीन सेवा देण्यास सुरुवात करतो किंवा जुन्या सेवा देणे बंद करतो. एखाद्या सेवेसाठी डाउनलोड करण्यायोग्य सॉफ्टवेअर आवश्यक असते किंवा त्याचा त्या सेवेमध्ये समावेश असतो तेव्हा, नवीन आवृत्ती अथवा वैशिष्ट्य उपलब्ध झाल्यावर ते सॉफ्टवेअर तुमच्या डिव्हाइसवर कधीकधी आपोआप अपडेट होते. काही सेवा तुम्हाला तुमची ऑटोमॅटिक अपडेट सेटिंग्ज ॲडजस्ट करण्याची अनुमती देतात.

आमच्या सेवांच्या तुम्ही करत असलेल्या वापरावर नकारात्मक परिणाम होईल असे महत्त्वाचे बदल आम्ही करणार असल्यास किंवा आम्ही एखादी सेवा पुरवणे बंद करणार असल्यास, आम्ही तुम्हाला वाजवी आगाऊ सूचना देऊ. गैरवापर रोखणे, कायदेशीर आवश्यकतांना प्रतिसाद देणे अथवा सुरक्षा आणि कार्यक्षमतेशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे यांसारख्या तातडीच्या परिस्थिती याला अपवाद असतील. लागू असलेला कायदा आणि धोरणांच्या अधीन राहून, आम्ही तुम्हाला Google Takeout वापरून तुमच्या Google खाते मधील तुमचा आशय एक्स्पोर्ट करण्याची संधीदेखील देऊ.

आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करतो

या अटी आणि सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी फॉलो करा

आमच्या सेवा वापरण्यासाठी आम्ही तुम्हाला दिलेली परवानगी ही तुम्ही पुढील गोष्टींचे पालन करत असेपर्यंत सुरू राहील:

आमचे गोपनीयता धोरण आमच्या सेवांच्या तुमच्या वापरला लागू होते हे तुम्ही मान्य करता. याव्यतिरिक्त, आम्ही सामान्य प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि आमच्या सेवा वापरण्याबद्दल अपेक्षा सेट करण्यासाठी आमच्या धोरण साइट वरून कॉपीराइट मदत केंद्र, सुरक्षितता केंद्र, आणि आमच्या तंत्रज्ञानाचे वर्णन यासारखी संसाधने प्रदान करतो.

आम्ही तुम्हाला आमच्या सेवा वापरण्याची परवानगी दिली असली तरीही आमच्याकडे सेवांमध्ये असलेले कोणतेही बौद्धिक संपदा अधिकार आम्ही राखून ठेवतो.

इतरांचा आदर करा

आम्हाला प्रत्येकासाठी आदरयुक्त वातावरण ठेवायचे आहे याचा अर्थ असा, की तुम्ही वर्तनाविषयीच्या या मूलभूत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे:
  • निर्यातीवरील नियंत्रण, मंजुरी आणि मानवी तस्करी या कायद्यांच्या समावेशासह लागू असलेल्या कायद्यांचे पालन करा
  • गोपनीयता आणि बौद्धिक संपदा अधिकार या गोष्टींच्या समावेशासह इतरांच्या अधिकारांचा आदर करा
  • इतरांना किंवा स्वतःला हानी पोहचवू नका अथवा कोणाशीही गैरवर्तन करू नका (किंवा अशा गैरवर्तनाची अथवा हानीची धमकी देऊ नका किंवा त्याला प्रोत्साहित करू नका) — उदाहरणार्थ, इतरांची दिशाभूल करणे, फसवणूक करणे, बेकायदेशीररीत्या तोतयेगिरी करणे, बदनामी करणे, गुंडगिरी करणे, छळ करणे किंवा पाठलाग करणे
  • सेवांचा गैरवापर करू नका, त्यांना हानी पोहचवू नका, त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू नका अथवा व्यत्यय आणू नका — उदाहरणार्थ, त्या सेवा कपटपूर्ण किंवा फसव्या मार्गांनी अ‍ॅक्सेस करणे अथवा वापरणे, मालवेअरचा समावेश करणे किंवा आमच्या सिस्टीम अथवा संरक्षक उपायांना स्पॅम करणे, हॅक करणे किंवा बायपास करणे. तुम्हाला शोध परिणाम दाखवण्यासाठी आम्ही वेब अनुक्रमित करतो तेव्हा, वेबसाइट मालकांनी त्यांच्या वेबसाइटच्या कोडमध्ये नमूद केलेल्या साधारण वापराशी संबंधित बंधनांचा आम्ही आदर करतो, त्यामुळे इतर लोक आमच्या सेवा वापरतात तेव्हा आम्हीदेखील तेच अपेक्षित करतो

आमच्या सेवेशी संबंधित अतिरिक्त अटी आणि धोरणे ही योग्य वर्तनाविषयी अतिरिक्त तपशील पुरवतात ज्याचे पालन त्या सेवा वापरणाऱ्या प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. इतर लोक या नियमांचे पालन करत नसल्याचे तुम्हाला आढळल्यास, आमच्या अनेक सेवा तुम्हाला गैरवर्तनाची तक्रार करणे हे करू देतात. आम्ही गैरवर्तनाच्या तक्रारीवर कारवाई केली असेल, तर समस्या असल्यास कारवाई करणे या विभागामध्ये वर्णन केल्यानुसार आम्ही त्याच्याशी संबंधित प्रक्रियादेखील पुरवतो.

तुमचा आशय वापरण्यासाठी परवानगी

आमच्या काही सेवा तुम्हाला तुमचा आशय अपलोड करण्यासाठी, सबमिट करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी, पाठवण्यासाठी, मिळवण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी तयार केल्या आहेत. आमच्या सेवांमध्ये कोणताही आशय पुरवण्याचे तुमचे कोणतेही कर्तव्य नाही आणि तुम्हाला कोणता आशय पुरवायचा आहे याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुम्ही आशय अपलोड करणे किंवा शेअर करणे निवडले असल्यास, कृपया तसे करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक अधिकार आहेत आणि आशय कायदेशीर आहे याची खात्री करा.

परवाना

तुमचा आशय तुमचाच राहतो याचा अर्थ असा की, तुमच्या आशयामध्ये असलेले कोणतेही बौद्धिक संपदा अधिकार तुम्ही राखून ठेवता. उदाहरणार्थ, तुम्ही तयार केलेल्या सर्जनशील आशयामध्ये तुमच्याकडे बौद्धिक संपदा अधिकार आहेत जसे की, तुम्ही लिहिलेली परीक्षणे. किंवा एखाद्याने तुम्हाला त्यांची परवानगी दिल्यास, तुम्हाला कदाचित इतर कोणाचातरी सर्जनशील आशय शेअर करण्याचा अधिकार असू शकतो.

तुमच्या बौद्धिक संपदा अधिकारांनी आमच्या तुमच्या आशयावरील वापरावर बंधने घातल्यास, आम्हाला तुमच्या परवानगीची आवश्यकता आहे. तुम्ही या परवान्याद्वारे Google ला परवानगी देता.

यामध्ये कशाचा समावेश आहे

तो आशय बौद्धिक संपदा अधिकारांनी संरक्षित केलेला असल्यास, या परवान्यामध्ये तुमचा आशय याचा समावेश आहे.

यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश नाही

  • या परवान्यामुळे तुमच्या गोपनीयता अधिकारांवर कोणताही परिणाम होत नाही — तो फक्त तुमच्या बौद्धिक संपदा अधिकारांबद्दल आहे
  • या परवान्यात या प्रकारच्या आशयाचा समावेश नाही:
    • तुम्ही पुरवता ती सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेली वास्तविक माहिती जसे की, एखाद्या स्थानिक व्यवसायाच्या पत्त्यामध्ये सुधारणा करणे. या माहितीसाठी परवान्याची आवश्यकता नाही कारण ती प्रत्येकाच्या वापरासाठी सामान्य ज्ञान म्हणून मानली जाते.
    • आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही देता तो फीडबॅक यासारख्या सूचना. फीडबॅक खाली असलेल्या सेवा संबंधित संभाषणे मध्ये नमूद केला आहे.

व्याप्ती

हा परवाना:
  • जगात सगळीकडे स्वीकारला जातो याचा अर्थ असा, की हा जगभरात कुठेही वैध आहे
  • अनन्य नाही याचा अर्थ असा, की तुम्ही तुमच्या आशयाचा परवाना इतरांना देऊ शकता
  • विनामानधन पुरवला जातो याचा अर्थ असा, की या परवान्यासाठी पैशांच्या स्वरूपातील कोणतीही शुल्क नाहीत

अधिकार

हा परवाना Google ला पुढील गोष्टी करण्याची अनुमती देतो:

  • तुमचा आशय होस्ट करणे, पुन्हा तयार करणे, वितरित करणे, संवाद साधणे आणि वापरणे — उदाहरणार्थ, तुमचा आशय आमच्या सिस्टमवर सेव्ह करण्यासाठी आणि तुम्ही जेथे जाता तिथे तो ॲक्सेस करण्यायोग्य तयार करू शकता
  • तुम्ही इतरांसाठी तो दृश्यमान केला असल्यास, तुमचा आशय प्रकाशित करणे, सार्वजनिकरीत्या सादर करणे किंवा सार्वजनिकपणे दाखवणे
  • तुमच्या आशयावर आधारित साधित कार्यामध्ये सुधारणा करणे आणि तयार करणे जसे की, पुन्हा फॉरमॅट करणे किंवा त्याचे भाषांतर करणे
  • या अधिकारांचा उप परवाना यांना द्या:
    • डिझाइन केल्याप्रमाणे सेवांनी कार्य करण्यासाठी इतर वापरकर्त्यांना, जसे की, तुम्ही निवडलेल्या लोकांसह तुम्हाला फोटो शेअर करू देणे
    • आमचे कंत्राटदार, ज्यांनी खालील उद्देश विभागामध्ये वर्णन केल्याप्रमाणे फक्त मर्यादित उद्देशांसाठी आमच्यासह करारनाम्यांवर स्वाक्षरी केली आहे

उद्देश

हा परवाना या मर्यादित उद्देशासाठी आहे:

  • सेवा चालवणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे याचा अर्थ डिझाईन केल्यानुसार सेवांना काम करू देणे आणि नवीन वैशिष्ट्ये व कार्यक्षमता तयार करणे. यामध्ये तुमच्या आशयाचे विश्लेषण करण्यासाठी ऑटोमेटेड सिस्टम आणि अल्गोरिदम वापरण्याचा समावेश आहे:
    • स्पॅम, मालवेअर आणि बेकायदेशीर आशयासाठी
    • डेटामधील पॅटर्न ओळखण्यासाठी जसे की, संबंधित फोटो एकत्र ठेवण्यासाठी Google Photos मध्ये एखादा नवीन अल्बम कधी सुचवावा हे निश्चित करणे
    • तुमच्यासाठी आमच्या सेवा कस्टमाइझ करण्यासाठी जसे की, शिफारशी आणि पर्सनलाइझ केलेले शोध परिणाम, आशय आणि जाहिराती पुरवण्यासाठी (जे तुम्ही जाहिरात सेटिंग्जमध्ये बदलू किंवा बंद करू शकता)
    हे विश्लेषण सामग्री पाठविल्यावर, प्राप्त केल्यावर आणि ती संचयित केल्यावर केले जाते.
  • सेवांचा प्रचार करण्यासाठी तुम्ही सार्वजनिकरीत्या शेअर केलेला आशय वापरणे. उदाहरणार्थ, एखाद्या Google ॲपचा प्रचार करण्यासाठी, आम्ही कदाचित तुम्ही लिहिलेले एखादे परीक्षण दाखवू. किंवा Google Play चा प्रचार करण्यासाठी, आम्ही कदाचित तुम्ही Play स्टोअरमध्ये देत असलेल्या ॲपचा एखादा स्क्रीनशॉट दाखवू.
  • या अटींनुसार Google साठी नवीन तंत्रज्ञान आणि सेवा विकसित करणे

कालावधी

तुमचा आशय बौद्धिक संपदा अधिकारांनी संरक्षित केला जातो तोपर्यंत हा परवाना सुरू असतो.

या परवान्यामध्ये समाविष्ट असलेला कोणताही आशय तुम्ही आमच्या सेवांमधून काढून टाकल्यास, शक्य तितक्या लवकर आमच्या सिस्टम तो आशय सार्वजनिकरीत्या उपलब्ध करणे थांबवतील. याला दोन अपवाद आहेत:

  • तो काढून टाकण्यापूर्वी तुम्ही तुमचा आशय इतरांशी आधीपासून शेअर केला असल्यास. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या मित्रमैत्रिणीशी फोटो शेअर केल्यास आणि त्यांनी त्याची प्रत तयार केल्यास किंवा तो पुन्हा शेअर केल्यास, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीचे Google खाते काढून टाकले तरीही तो फोटो त्यांच्या Google खाते मध्ये दिसत राहील.
  • तुम्ही तुमचा आशय इतर कंपन्यांच्या सेवांद्वारे उपलब्ध करून दिल्यास, Google Search सह शोध इंजिन त्यांच्या शोध परिणामांच्या भागाच्या रूपात तुमचा आशय शोधणे आणि प्रदर्शित करणे सुरू ठेवतील.

Google सेवा वापरणे

तुमचे Google खाते

तुम्ही वयाच्या या आवश्यकता पूर्ण केल्यास, तुम्ही तुमच्या सोयीसाठी Google खाते तयार करू शकता. काही सेवा काम करण्यासाठी तुमच्याकडे Google खाते असणे आवश्यक आहे — उदाहरणार्थ, Gmail वापरण्यासाठी तुमच्याकडे एक Google खाते असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला ईमेल पाठवण्यास आणि मिळवण्यास सोपे होईल.

तुमचे Google खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही कोणती महत्त्वाची पावले उचलता याच्या समावेशासह तुम्ही तुमच्या Google खाते सह काय करता याला जबाबदार आहात आणि तुम्ही नियमितपणे सुरक्षा तपासणी वापरावी, अशी आम्ही आवर्जून शिफारस करतो.

एखाद्या संस्थेच्या किंवा व्यवसायाच्यावतीने Google सेवा वापरणे

व्यवसाय, ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्था आणि शाळा यांसारख्या बऱ्याच संस्था आमच्या सेवा यांचा लाभ घेतात. एखाद्या संस्थेच्यावतीने आमच्या सेवा वापरण्यासाठी:
  • त्या संस्थेच्या एखाद्या अधिकृत प्रतिनिधीने या अटींशी सहमत असणे आवश्यक आहे
  • तुमच्या संस्थेचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर कदाचित तुम्हाला एखादे Google खाते असाइन करू शकतो. तो अ‍ॅडमिनिस्ट्रेटर तुम्हाला अतिरिक्त नियमांचे पालन करण्याची विनंती करू शकतो आणि तो तुमचे Google खाते कदाचित ॲक्सेस किंवा बंद करू शकतो.

सेवेशी संबंधित संभाषणे

तुम्हाला आमच्या सेवा पुरवण्यासाठी आम्ही काहीवेळा तुम्हाला सेवा घोषणा आणि इतर माहिती पाठवतो. आम्ही तुमच्याशी कसा संवाद साधतो याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी Google चे गोपनीयता धोरण पाहा.

तुम्ही आम्हाला अभिप्राय देणे निवडल्यास, जसे की, आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही कदाचित तुमच्या अभिप्रायावर बंधने न घालता कारवाई करू.

Google सेवांमधील आशय

तुमचा आशय

आमच्या काही सेवा तुम्हाला तुमचा आशय सार्वजनिकपणे उपलब्ध करून देण्याची संधी देतात - उदाहरणार्थ, तुम्ही लिहिलेले एखादे उत्पादन किंवा रेस्टॉरंट पुनरावलोकन पोस्ट करू शकता किंवा तुम्ही तयार केलेली ब्लॉग पोस्ट अपलोड करू शकता.

कोणीतरी तुमच्या बौद्धिक संपदा अधिकार यांचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला उल्लंघनाची सूचना पाठवू शकता आणि आम्ही योग्य ती कारवाई करू. उदाहरणार्थ, आम्ही आमच्या कॉपीराइट मदत केंद्र मध्ये वर्णन केल्यानुसार पुनरावृत्ती कॉपीराइट उल्लंघनकर्त्यांची Google खाती निलंबित किंवा बंद केली आहेत.

Google आशय

आमच्या काही सेवा यांमध्ये Google शी संबंधित असलेल्या आशयाचा समावेश आहे — उदाहरणार्थ, तुम्ही Google Maps मध्ये पाहता ते अनेक चित्रमय सादरीकरणांचे व्हिज्युअल. या अटी आणि कोणत्याही सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी यांनी अनुमती दिल्याप्रमाणे तुम्ही कदाचित Google चा आशय वापरू शकता पण आमच्या आशयामध्ये असलेले कोणतेही बौद्धिक संपदा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आमचे कोणतेही ब्रँडिंग, लोगो किंवा कायदेशीर नोटिस काढून टाकू नका, अस्पष्ट करू नका किंवा बदलू नका. तुम्हाला आमचे ब्रँडिंग किंवा लोगो वापरायचे असल्यास, कृपया Google Brand परवानग्या पेज पाहा.

इतर आशय

शेवटी आमच्या काही सेवा तुम्हाला इतर लोकांच्या किंवा संस्था यांच्या आशयाचा ॲक्सेस देतात — उदाहरणार्थ एखाद्या स्टोअर मालकाच्या स्वतःच्या व्यवसायाचे वर्णन किंवा Google News मध्ये दाखवलेला एखाद्या वर्तमानपत्रामधील लेख. तुम्ही कदाचित त्या व्यक्ती किंवा संस्थेच्या परवानगीशिवाय किंवा कायद्याने याव्यतिरिक्त अनुमती दिल्याशिवाय हा आशय वापरू शकणार नाही. इतर लोक किंवा संस्थांच्या आशयामध्ये व्यक्त केलेली मतं ही त्यांची आहेत आणि Google ची नाहीत.

Google सेवांमधील सॉफ्टवेअर

आमच्या काही सेवांमध्ये डाउनलोड करता येण्यायोग्य सॉफ्टवेअरचा समावेश आहे. सेवांचा भाग म्हणून आम्ही तुम्हाला ते सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी देतो.

आम्ही तुम्हाला देतो तो परवाना:
  • जगात सगळीकडे स्वीकारला जातो याचा अर्थ असा, की हा जगभरात कुठेही वैध आहे
  • अनन्य नाही याचा अर्थ असा, की आम्ही सॉफ्टवेअरचा परवाना इतरांना देऊ शकतो
  • विनामानधन पुरवला जातो याचा अर्थ असा, की या परवान्यासाठी पैशांच्या स्वरूपातील कोणतीही शुल्क नाहीत
  • वैयक्तिक आहे याचा अर्थ असा, की तो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत शेअर केला जाऊ शकत नाही
  • सुपूर्त करण्यायोग्य नाही याचा अर्थ असा, की तुम्ही परवाना हा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे सुपूर्त करू शकत नाही

आमच्या काही सेवांमध्ये मुक्त स्रोत परवाना अटींनुसार आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असलेल्या सॉफ्टवेअरचा समावेश आहे. कधीकधी मुक्त स्रोत परवान्यामध्ये अशा तरतुदी असतात की, या अटींच्या भागांचे स्पष्टपणे उल्लंघन करतात, म्हणून कृपया ते परवाने नक्की वाचा.

तुम्ही आमच्या सेवेचा किंवा सॉफ्टवेअरचा कोणताही भाग कॉपी करू शकत नाही, त्यामध्ये फेरबदल करू शकत नाही, त्याचे वितरण करू शकत नाही, तो विकू शकत नाही अथवा भाड्याने देऊ शकत नाही.

समस्या किंवा मतभेद असल्यास

हमीशी संबंधित डिस्क्लेमर

आम्ही Google Search आणि Maps यांसारख्या उपयुक्त, विश्वसनीय सेवा पुरवून आमची ओळख निर्माण केली आहे व तुमच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी आम्ही आमच्या सेवांमध्ये सतत सुधारणा करत आहोत. तथापि, कायदेशीर कारणांसाठी, आमच्या सेवेशी संबंधित अतिरिक्त अटी यांमध्ये स्पष्ट नमूद केले नसल्यास, आम्ही आमच्या सेवा या हमी यांच्याशिवाय देतो. कायद्यानुसार आम्ही विशिष्ट कायदेशीर भाषेत समजावणे आणि ते तुमच्या लक्षात यावे याची खात्री करण्यात मदत करण्यासाठी पुढीलप्रमाणे स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे:

लागू असलेल्या कायद्याद्वारे अनुमत मर्यादेपर्यंत, आम्ही आमच्या सेवा या विक्रीयोग्यता, विशिष्ट उद्देशासाठी योग्यता आणि ना-उल्लंघन यांच्या अभिप्रेत हमींच्या समावेशासह कोणत्याही स्पष्ट किंवा अभिप्रेत हमींशिवाय “जशा आहेत तशा” पुरवतो. उदाहरणार्थ, आम्ही सेवांची अचूकता, विश्वसनीयता, उपलब्धता अथवा तुमच्या आवश्यकता पूर्ण करण्याची त्यांची क्षमता या गोष्टींच्या समावेशासह त्यांमधील आशयाची किंवा वैशिष्ट्यांची हमी देत नाही.

दायित्वे

सर्व वापरकर्त्यांसाठी

अडचणी आल्यास, तुम्ही किंवा Google एकमेकांकडून कोणत्या गोष्टींचा दावा करू शकता यामध्ये कायदा आणि या अटी या दोन्ही गोष्टी समतोल राखतात. म्हणूनच, या अटींच्या अंतर्गत, कायदा आम्हाला ठरावीक दायित्वे मर्यादित करण्याची अनुमती देतो, पण इतर दायित्वे मर्यादित करू देत नाही.

फक्त लागू असलेल्या कायद्याने दिलेल्या अनुमतीनुसार या अटी आमच्या जबाबदाऱ्या मर्यादित करतात. घोर निष्काळजीपणा किंवा हेतुपुरस्सर गैरवर्तनासाठी या अटी दायित्व मर्यादित करत नाहीत.

लागू असलेल्या कायद्याद्वारे अनुमत मर्यादेपर्यंत:
  • Google हे फक्त या अटी किंवा लागू असलेल्या सेवेशी संबंधित अतिरिक्त अटी भंग केल्यास जबाबदार असेल
  • Google हे पुढील गोष्टींसाठी जबाबदार नसेल:
    • नफा, कमाई, व्यवसायाच्या संधी, नावलौकिक अथवा अपेक्षित बचत यांचे नुकसान
    • अप्रत्यक्ष किंवा परिणामस्वरूपी नुकसान
    • दंडात्मक नुकसान
  • या अटींमुळे उद्भवणारे अथवा त्यांच्याशी संबंधित Google चे एकूण दायित्व हे (१) $२०० किंवा (२) संबंधित सेवा वापरण्यासाठी विवादापूर्वी १२ महिने भरलेली शुल्क यांपैकी जे जास्त असेल त्यापुरते मर्यादित आहे

फक्त व्यवसाय वापरकर्ते आणि संस्थांसाठी

तुम्ही व्यवसाय वापरकर्ता किंवा संस्था असल्यास:

  • लागू असलेल्या कायद्याद्वारे अनुमत मर्यादेपर्यंत, तुम्ही सेवा यांच्या केलेल्या बेकायदेशीर वापरामुळे किंवा त्यांच्या बेकायदेशीर वापराशी संबंधित अथवा या अटींच्या किंवा सेवेशी संबंधित अतिरिक्त अटी यांच्या उल्लंघनामुळे उद्भवलेल्या कोणत्याही तृतीय पक्षाच्या कायदेशीर कारवाईसाठी (शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवायांच्या समावेशासह) तुम्ही Google आणि त्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांना नुकसान भरपाई द्याल. या नुकसान भरपाईमध्ये दावे, नुकसान, हानी, निर्णय, दंड, खटल्याशी संबंधित शुल्क आणि कायदेशीर शुल्कामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही दायित्वाचा किंवा खर्चाचा समावेश आहे
  • तुम्हाला नुकसान भरपाई करणे याच्या समावेशासह काही जबाबदार्‍यांपासून कायदेशीररीत्या सवलत असल्यास, या अटींअंतर्गत त्या जबाबदाऱ्या तुमच्यावर लागू होत नाहीत. उदाहरणार्थ, संयुक्त राष्ट्रांकडे कायदेशीर दायित्वांचे उल्लंघन करण्याचे काही विशेष अधिकार आहेत आणि या अटी त्या अधिकारांचे उल्लंघन करत नाहीत.

समस्या असल्यास कारवाई करणे

खाली वर्णन केल्याप्रमाणे कारवाई करण्यापूर्वी, आम्ही वाजवीरीत्या शक्य असेल तेव्हा तुम्हाला आगाऊ सूचना देऊ, आमच्या कारवाईमागील कारणाचे वर्णन करू आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला संधी देऊ जोपर्यंत तसे केल्याने पुढील गोष्टी घडत नाहीत:

  • वापरकर्ता, तृतीय पक्ष किंवा Google ला हानी अथवा दायित्व देणे
  • कायद्याचे उल्लंघन किंवा कायदेशीर अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे आदेश
  • तपासणीमध्ये तडजोड करणे
  • आमच्या सेवा यांमधील कामाशी तडजोड करणे, एकात्मकीकरण किंवा सुरक्षितता

तुमचा आशय काढून टाकणे

तुमचा आशय याने (१) या अटी, सेवेशी संबंधित अतिरिक्त अटी किंवा धोरणे भंग केल्यास, (२) लागू असलेल्या कायद्याचे उल्लंघन केल्यास अथवा तो (३) आमच्या वापरकर्त्यांना, तृतीय पक्षांना किंवा Google ला हानी पोहचवू शकत असल्यास, आम्ही लागू असलेल्या कायद्यानुसार आशयामधील काही भाग अथवा संपूर्ण आशय काढून टाकण्याचा हक्क राखून ठेवतो. उदाहरणांमध्ये लहान मुलांची पोर्नोग्राफी, मानवी तस्करी किंवा छळ या गोष्टी सुलभ करणारा आशय, दहशतवादासंबंधित आशय आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे बौद्धिक संपदा अधिकार यांचे उल्लंघन करणाऱ्या आशयाचा समावेश आहे.

तुमचा Google सेवांचा ऑटोमेटिक ॲक्सेस निलंबित किंवा समाप्त करणे

यापैकी काही घडल्यास, या सेवांचा तुमचा ॲक्सेस निलंबित किंवा रद्द करण्याचा अथवा तुमचे Google खाते हटवण्याचा अधिकार Google राखून ठेवते:

  • तुम्ही या अटींचे किंवा सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी किंवा धोरणे यांचे भौतिक किंवा वारंवार उल्लंघन करता
  • आम्हाला कायदेशीर आवश्यकता किंवा न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यासाठी असे करणे आवश्यक आहे
  • तुमचे वर्तन हे हॅकिंग, फिशिंग, छळ, स्‍पॅमिंग करणे, इतरांची दिशाभूल करणे किंवा तुमच्या मालकीचा नसलेला आशय स्क्रॅप करणे यांसारख्या गोष्टींद्वारे एखाद्या वापरकर्त्याला, तृतीय पक्षाला किंवा Google ला हानी पोहोचवते अथवा दायित्व स्वीकारणे यासाठी कारणीभूत ठरते

आम्ही खाती का बंद करतो आणि तसे केल्यावर काय होते याविषयी अधिक माहितीसाठी हे मदत केंद्र पेज पहा. तुमचे Google खाते चुकून निलंबित किंवा समाप्त केले गेले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आवाहन करू शकता.

अर्थातच तुम्ही आमच्या सेवा वापरणे कधीही थांबवू शकता. तुम्ही आमची एखादी सेवा वापरणे थांबवले असल्यास, तुम्ही ते का केले हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल जेणेकरून आम्ही आमच्या सेवांमध्ये सुधारणा करणे पुढे सुरू ठेवू शकतो.

विवादांचे निराकरण करणे, शासकीय कायदा आणि न्यायालये

Google शी संपर्क कसा साधावा याबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या संपर्क पृष्ठला भेट द्या.

कॅलिफोर्निया कायदा या अटींपासून सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी किंवा कोणत्याही संबंधित सेवा यांमुळे किंवा त्यासंबंधित सर्व विवादांचे शासन करेल. हे वाद सांता क्लारा काउंटी, कॅलिफोर्निया, यूएसएच्या फेडरल किंवा राज्य न्यायालयात पूर्णपणे सोडवले जातील आणि तुम्ही व Google त्या न्यायालयांमधील वैयक्तिक अधिकार क्षेत्राला संमती देता.

या अटींबद्दल

कायद्यानुसार, तुम्हाला असे काही अधिकार आहेत जे या सेवा अटींद्वारे कराराद्वारे मर्यादित केले जाऊ शकत नाहीत. या अटींचा कोणत्याही प्रकारे त्या अधिकारांवर प्रतिबंध घालण्याचा हेतू नाही.

या अटी तुमच्या आणि Google यांच्यातील संबंधांचे वर्णन करतात. या अटींअंतर्गत इतरांना त्या संबंधाचा लाभ होत असला तरीही इतर लोक किंवा संस्था यांच्यासाठी ते कोणतेही कायदेशीर अधिकार तयार करत नाही.

आम्हाला या अटी समजण्यासाठी सोप्या बनवायच्या आहेत त्यामुळे आम्ही आमच्या सेवा यांमधील उदाहरणे वापरली आहेत. पण उल्लेख केलेल्या सर्व सेवा कदाचित तुमच्या देशात उपलब्ध असणार नाहीत.

या अटी सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी यांच्यासह विवादित असल्यास, अतिरिक्त अटी त्या सेवेचे नियमन करतील.

एखादी अट अंमलबजावणी करण्यायोग्य किंवा योग्य नसल्याची आढळून आल्यास, यामुळे इतर कोणत्याही अटींवर परिणाम होणार नाही.

तुम्ही या अटींचे किंवा सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी यांचे पालन न केल्यास आणि लगेच कृती न केल्यास, याचा अर्थ असा नाही की, कदाचित आमच्याकडे असलेले कोणतेही अधिकार आम्ही देत आहोत जसे की, भविष्यात कारवाई करणे.

आम्ही कदाचित या अटी आणि सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी अपडेट करू शकतो (1) आमच्या सेवांमध्ये बदल दिसण्यासाठी किंवा आम्ही व्यवसाय कसा करतो हे समजण्यासाठी — उदाहरणार्थ आम्ही नवीन सेवा, वैशिष्ट्ये, तंत्रज्ञान, किमती किंवा फायदे जोडतो (किंवा जुने काढून टाकतो) तेव्हा (2) कायदेशीर, नियामक किंवा सुरक्षिततेच्या कारणांसाठी किंवा (3) गैरवर्तन किंवा हानी टाळण्यासाठी.

आम्ही या अटींमध्ये किंवा सेवा-विशिष्ट अतिरिक्त अटी यामध्ये महत्त्वाचे बदल केल्यास आम्ही तुम्हाला त्या बदलांची वाजवी आगाऊ सूचना देऊ आणि बदलांचे पुनरावलोकन करण्याची संधी देऊ, पण (1) जेव्हा आम्ही नवीन सेवा किंवा वैशिष्ट्य लॉंच करतो किंवा (2) सुरू असलेले गैरवर्तन थांबवणे किंवा कायदेशीर आवश्यकतांची पूर्तता करणे यांसारख्या अतीमहत्त्वाच्या परिस्थितींमध्ये आम्ही असे करणार नाहीत. तुम्ही नवीन अटींशी सहमत नसल्यास, तुम्ही तुमचा आशय काढून टाकला पाहिजे आणि सेवा वापरणे थांबवले पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमचे Google खाते बंद करून आमच्याशी असलेले तुमचे संबंध कधीही संपवू शकता.

परिभाषा

अनुषंगिक

Google कंपनीच्या समूहातील संस्था म्हणजेच, ईयूमध्ये ग्राहक सेवा पुरवणाऱ्या पुढील कंपनीच्या समावेशासह Google LLC आणि त्याच्या सहाय्यक कंपनी: Google Ireland Limited, Google Commerce Limited आणि Google Dialer Inc.

अस्वीकृती

असे विधान जे एखाद्याच्या कायदेशीर जबाबदाऱ्या मर्यादित करते.

मूळ आशयाच्या (जसे की ब्लॉग पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ) निर्माणकर्त्याला तो मूळ आशय इतरांनी वापरावा की नाही आणि तो कसा वापरावा हे ठरवण्याची अनुमती देणारा कायदेशीर अधिकार. या आशयाचा वापर विशिष्ट मर्यादा व अपवादांच्या अधीन आहे (जसे की, “वाजवी वापर” आणि “न्याय्य वागणूक”).

ग्राहक

एखादा व्यक्ती जो त्याच्या व्यापार, व्यवसाय, हस्तकला किंवा पेशाबाहेर वैयक्तिक, अव्यावसायिक उद्देशांसाठी Google सेवा वापरतो. (व्यवसाय वापरकर्ता पाहा)

ट्रेडमार्क

व्यवहारात वापरलेली चिन्हे, नावे आणि इमेज जे एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या वस्तू किंवा सेवा दुसर्‍याच्या वस्तूंपेक्षा वेगळे करण्यास पुरेशा आहेत.

तुमचा आशय

आमच्या सेवा वापरून तुम्ही लिहिता, अपलोड करता, सबमिट करता, स्टोअर करता, पाठवता, मिळवता किंवा शेअर करता अशा गोष्टी जसे की:

  • तुम्ही तयार करता ते Docs, Sheets आणि Slides
  • तुम्ही Blogger वापरून अपलोड केलेल्या ब्लॉग पोस्ट
  • तुम्ही Maps वापरून सबमिट केलेली परीक्षणे
  • तुम्ही Drive मध्ये स्टोअर केलेले व्हिडिओ
  • Gmail वापरून तुम्ही पाठवलेले आणि मिळवलेले ईमेल
  • तुम्ही Photos वापरून मित्रमैत्रिणींशी शेअर करता ते फोटो
  • तुम्ही Google सह शेअर केलेल्या प्रवास योजना

दायित्व

कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर दाव्यामुळे झालेला तोटा, मग हा दावा करारावर आधारित असो किंवा नसो, अपकृत्य (निष्काळजीपणा याच्या समावेशासह) किंवा इतर कारणामुळे आणि त्या तोट्यांचे वाजवी अपेक्षेने किंवा आधीच अंदाज लावता आले असते.

देशानुसार आवृत्ती

तुमच्याकडे Google खाते असल्यास, आम्ही तुमचे खाते एखाद्या देशाशी (किंवा प्रदेशाशी) जोडू जेणेकरून आम्हाला पुढील गोष्टी निश्चित करता येतील:

  • तुम्हाला सेवा पुरवणारी आणि तुम्ही सेवा वापरत असताना तुमच्या माहितीवर प्रक्रिया करणारी Google ची संलग्न कंपनी
  • आपले संबंध ज्यावर आधारीत आहेत ती अटींची आवृत्ती

तुम्ही साइन आउट करता तेव्हा , तुम्ही ज्या स्थानावर Google सेवा वापरत आहेत त्यानुसार तुमच्या देशाची आवृत्ती निर्धारित होते. तुमच्याकडे खाते असल्यास, तुम्ही साइन इन करू शकता आणि त्याच्याशी संबंधित देश पाहाण्यासाठी अटी पाहू शकता.

बौद्धिक संपदा अधिकार (आयपी अधिकार)

लावलेले शोध (पेटंटचे अधिकार), साहित्यिक किंवा कलात्मक कामगिरी (कॉपीराइट), डिझाइन (डिझाइनचे अधिकार) आणि व्यवसायामध्ये वापरलेली चिन्हे, नावे आणि इमेज (ट्रेडमार्क) यांसारख्या लोकांच्या कल्पनाशक्तीमधून तयार केलेल्या गोष्टींवरील अधिकार. आयपी अधिकार कदाचित तुमच्याशी, दुसऱ्या व्यक्तीशी किंवा एखाद्या संस्थेशी संबंधित असू शकतात.

व्यवसाय वापरकर्ता

एखादी व्यक्ती किंवा संस्था जी ग्राहक नाही (ग्राहक पाहा).

संस्था

एखादी कायदेशीर संस्था (जसे की, महानगरपालिका, ना नफा तत्त्वावर चालणारी संस्था किंवा शाळा) आणि एखादा व्यक्ती नाही.

सेवा

या अटींच्या अधीन असलेल्या Google सेवा https://policies.google.com/terms/service-specific मध्ये सूचीबद्ध केलेली उत्पादने आणि सेवा आहेत ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • ॲप्स आणि साइट (जसे की, Search व Maps)
  • प्लॅटफॉर्म (जसे की, Google Shopping)
  • एकत्रित केलेल्या सेवा (जसे की, इतर कंपन्यांच्या ॲप्स आणि साइटमध्ये एम्बेड केलेले Maps)
  • डिव्हाइस आणि इतर वस्तू (जसे की, Google Nest)

तुम्ही स्ट्रीम करू शकता किंवा संवाद साधू शकता अशा आशयाचादेखील यांपैकी अनेक सेवांमध्ये समावेश आहे.

हमी

एखादे उत्पादन किंवा सेवा एका विशिष्ट मानकानुसार काम करेल याची हमी.

हानीरक्षित करा किंवा नुकसान भरपाई

खटल्यांसारख्या कायदेशीर कारवाईतून दुसर्‍या व्यक्तीचे किंवा संस्थेचे झालेल्या नुकसानीची भरपाई देणे एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे कंत्राटी कर्तव्य असते.

Google Apps
मुख्य मेनू