डेटा ट्रांसफरसाठी कायदेशीर फ्रेमवर्क

प्रभावी १ फेब्रुवारी, २०२०

डेटा संरक्षण कायदे देशांनुसार बदलू शकतात काही देश इतरांपेक्षा अधिक संरक्षण देतात. तुमच्या माहितीवर कुठेही प्रक्रिया केली असली तरीही, गोपनीयता धोरण मध्ये वर्णन केलेली संरक्षणे आम्ही लागू करतो. आम्ही खाली वर्णन केलेल्या युरोपियन फ्रेमवर्क सारख्या डेटा ट्रांसफरशी संबंधित कायदेशीर फ्रेमवर्कचे देखील पालन करतो.

युरोपियन कमिशनने हे ठरवले आहे की युरोपियन इकॉनॉमिक एरिया (EEA) बाहेरच्या काही देशांनी वैयक्तिक डेटा सुरक्षितपणे राखून ठेवला आहे. तुम्ही येथे युरोपियन कमिशनच्या वर्तमान पर्याप्त निर्णयांचे पुनरावलोकन करू शकता. EEA चा डेटा युनायटेस स्टेट्स सारख्या अन्य देशांमध्ये ट्रांसफर करण्यासाठी, आम्ही EU कायद्याच्या संरक्षणाइतके कायदेशीर फ्रेमवर्कचे पालन करतो.

EU-U.S. आणि Swiss-US गोपनीयता शील्ड फ्रेमवर्क

आमच्या Privacy Shield प्रमाणीकरण मध्ये वर्णन केल्याप्रमाणे, आम्ही यूएस वाणिज्य विभागाने नमूद केल्यानुसार युरोपियन युनियन सदस्य देश (EEA सदस्य देशांच्या समावेशासह), यूके आणि स्वित्झर्लंडमधील वैयक्तिक माहितीचे संकलन करणे, तिचा वापर करणे आणि ती राखून ठेवण्यासंबंधित EU-U.S. Privacy Shield (EU-US गोपनीयता शील्‍ड) आणि Swiss-U.S. Privacy Shield (Swiss-US गोपनीयता शील्ड) फ्रेमवर्क चे पालन करतो. Google LLC सह Google आणि त्याच्या पूर्णपणे स्वत:च्या मालकीच्या US सहाय्यकांनी (जोपर्यंत स्पष्टपणे वगळलेले नाही) निश्चित केले आहे की, ते Privacy Shield तत्त्वांचे पालन करतात. "तुमची माहिती शेअर करणे” या विभागामध्ये वर्णन केल्यानुसार, आमच्यावतीने बाह्य प्रक्रियेसाठी तृतीय पक्षांसोबत पुढील ट्रान्सफर तत्त्वांतर्गत शेअर केलेल्या तुमच्या कोणत्याही वैयक्तिक माहितीसाठी Google जबाबदार असेल. Privacy Shield प्रोग्रामबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि Google चे प्रमाणीकरण पाहण्यासाठी कृपया Privacy Shield वेबसाइटला भेट द्या.

आमच्या गोपनीयता रक्षक प्रमाणीकरणासंबंधित आमच्या गोपनीयता व्यवहाराबाबत आपल्याला चौकशी करावयाची असल्यास, आमच्याशी संपर्क करण्यासाठी आम्ही आपल्याला प्रेरित करतो. Google यूएस च्या फेडरल ट्रेड कमिशन (FTC) च्या तपास आणि अंमलबजावणी अधिकार यांच्या अधीन आहे. आपण आपल्या स्थानिक डेटा संरक्षण अधिकार्‍यांकडे तक्रार देखील पाठवू शकता आणि आपल्या प्रश्नाचे निराकरण करण्‍यासाठी आम्ही त्यांच्यासह कार्य करू. विशिष्ट परिस्थितीत, गोपनीयता रक्षक फ्रेमवर्क गोपनीयता रक्षक मूलत्त्वांच्या परिशिष्ट I मध्ये वर्णन केल्याप्रमाणे अन्य मार्गाने तक्रारींचे निराकरण न झाल्यास त्यांचे निराकरण करण्‍यासाठी प्रतिबद्ध लवादाची विनंती करण्‍याचा हक्क प्रदान करते.

मॉडेल करार कलम

EEA बाहेर डेटा ट्रांसफर करत असताना पुरेशा संरक्षणाचे माध्यम म्हणून युरोपियन कमिशनने मॉडेल करार कलमच्या वापराला मंजूरी दिली आहे. डेटा ट्रांसफर करणार्‍या पक्षांंदरम्यानच्या करारात मॉडेल करार कलम चा समावेश करून, वैयक्तिक डेटा पुरेसा संरक्षित करण्यासाठी युरोपियन कमिशनद्वारे न मानण्यात आलेल्या EEA बाहेरील देशांमध्ये ट्रांसफर केलेला असताना वैयक्तिक डेटा संरक्षित केला जाऊ शकतो.

Google त्याच्या व्यवसाय सेवांंच्या ग्राहकांसाठी मॉडेल करार कलम ऑफर करतो, ज्यामध्ये GSuite आणि Google Cloud Platform चा समावेश आहे. Google चा मॉडेल करार कलमच्या वापराचे तपशील privacy.google.com/businesses येथे मिळू शकतात.