Google चे भागीदार कोण आहेत?

Google व्यवसाय आणि संस्थांसोबत विविध प्रकारे काम करते. आम्ही या व्यवसाय आणि संस्थांना “भागीदार” म्हणून संबोधतो. उदाहणार्थ, २० लाखांपेक्षा जास्त Google नसलेल्या वेबसाइट आणि ॲप्स जाहिराती दाखवण्यासाठी Google सोबत भागीदारी करतात. लाखो डेव्हलपर भागीदार त्यांची ॲप्स Google Play वर प्रकाशित करतात. इतर भागीदार Google ला आमच्या सेवा सुरक्षित करण्यात मदत करतात; तुमच्या खात्याला धोका निर्माण झाला आहे असे आम्हाला वाटल्यास तुम्हाला सूचित करण्यात सुरक्षितता धोक्याबद्दलची माहिती आम्हाला मदत करू शकते (ज्या टप्प्यावर आम्ही तुम्हाला तुमच्या खात्याचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलण्यात मदत करू शकतो).

विश्वासू व्यवसाय आमचे भागीदार असण्यापेक्षा “डेटा प्रोसेसर” म्हणूनदेखील आम्ही त्यांच्यासोबत काम करतो याची नोंद घ्या, म्हणजेच ते आमच्या सेवांना सपोर्ट करण्यासाठी आमच्या वतीने, आमच्या सूचनांच्या आधारे आणि आमच्या गोपनीयता धोरणाचे आणि इतर उचित गोपनीयता आणि सुरक्षितता उपायांचे पालन करून डेटावर प्रक्रिया करतात. आम्ही डेटा प्रोसेसरचा कसा वापर करतो याबद्दल Google गोपनीयता धोरण मध्ये अधिक माहिती आहे.

तुमची वैयक्तिकरीत्या ओळख पटवणारी माहिती, जसे की तुमचे नाव किंवा ईमेल, तुम्ही आम्हाला शेअर करण्यास सांगितले नसल्यास, आम्ही आमच्या जाहिरात भागीदारांसोबत शेअर करत नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला जवळपासच्या फ्लॉवर शॉपची एखादी जाहिरात दिसल्यास आणि तुम्ही “कॉल करण्यासाठी टॅप करा” बटण निवडल्यास, आम्ही तुमचा कॉल कनेक्ट करू आणि कदाचित तुमचा फोन नंबर फ्लॉवर शॉपसोबत शेअर करू.

Google, भागीदारांकडील माहितीसह, गोळा करत असलेल्या माहितीबद्दल तुम्ही गोपनीयता धोरण मध्ये अधिक वाचू शकता.

Google Apps
मुख्य मेनू