जाहिरात करणे

जाहिराती Google आणि आपण वापरत असलेल्‍या अनेक वेबसाइट आणि सेवा विनामूल्‍य ठेवतात. जाहिराती सुरक्षित, व्यत्यय न आणणार्‍या आणि शक्‍य तितक्‍या सुसंबद्ध असतील हे सुनिश्‍चित करण्‍यासाठी आम्‍ही कठोर परिश्रम करतो. उदाहरणार्थ, आपल्याला Google वर पॉप-अप जाहिराती दिसणार नाहीत आणि आम्ही – मालवेयर असलेल्‍या जाहिराती, नकली वस्‍तूंच्‍या जाहिराती किंवा आपल्‍या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करण्‍याचा प्रयत्‍न करणार्‍या जाहिरातींच्‍या समावेशासह – दरवर्षी आमच्‍या धोरणांचे उल्‍लंघन करणार्‍या हजारो प्रकाशकांची आणि जाहिरातदारांची खाती आम्‍ही समाप्त करतो.

Google जाहिरातीमध्‍ये कुकीज कसे वापरते

कुकीज, जाहिरात अधिक प्रभावी बनविण्यात मदत करतात. कुकीज शिवाय, जाहिरातदारांना त्‍यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचणे किंवा किती जाहिराती दर्शवल्‍या गेल्‍या आणि किती क्‍लिक त्‍यांनी प्राप्त केले हे माहित करणे कठीण आहे.

अनेक वेबसाइट, जसे की बातम्‍यांच्‍या साइट आणि ब्‍लॉग, Google सह असलेले भागीदार त्‍यांच्‍या अभ्‍यागतांना जाहिराती दर्शवतात. आमच्‍या भागीदारंसह कार्य करताना, आम्‍ही आपल्‍याला एकच जाहिरात पुन्‍हा पुन्‍हा पाहण्‍यापासून थांबविणे, क्‍लिक घोटाळा शोधणे आणि थांबविणे आणि अधिक संबद्ध असण्‍याची शक्‍यता असलेल्‍या जाहिराती (जसे की आपण भेट दिलेल्‍या वेबसाइट वर आधारित जाहिराती) दर्शविणे यासारख्‍या अनेक हेतूंसाठी कुकीचा वापर करु शकतो.

आम्‍ही आमच्‍या लॉगवर पुरवतो त्‍या जाहिरातींचा रेकॉर्ड आम्‍ही संचयित करतो. हे सर्व्‍हर लॉग विशेषत: आपली वेब विनंती, IP पत्ता, ब्राउझर प्रकार, ब्राउझर भाषा, आपल्‍या विनंतीची तारीख आणि वेळ आणि आपल्‍या ब्राउझरला अनन्‍यपणे ओळखणार्‍या एक किंवा अनेक कुकींना समाविष्‍ट करते. आम्‍ही हा डेटा अनेक कारणांसाठी संचयित करतो, त्‍यापैकी सर्वात महत्त्‍वाची आमच्‍या सेवा सुधारणे आणि आमच्‍या सिस्‍टीमची सुरक्षितता राखणे ही आहेत. आम्‍ही IP पत्त्‍याचा भाग (9 महिन्‍यांनतर) आणि कुकी माहिती (18 महिन्‍यांनतर) काढून या लॉग डेटास निनावी करतो.

आमच्‍या जाहिरात कुकीज

आमच्‍या भागीदारांना त्‍यांच्‍या जाहिराती आणि वेबसाइट व्‍यवस्‍थापित करण्‍यात मदत करण्‍यासाठी, AdSense, AdWords, Google Analytics आणि DoubleClick-ब्रँडेड सेवांच्या श्रेण्यांसह आम्‍ही अनेक उत्‍पादने ऑफर करतो. आपण एखाद्या पृष्ठास भेट देता किंवा या उत्पादनांपैकी एक उत्पादन वापरणारी एखादी जाहिरात Google सेवा किंवा अन्य साइट आणि ॲप्सवर पाहता तेव्हा, विविध कुकीज आपल्या ब्राउझरवर पाठविल्या जाऊ शकतात.

या google.com, doubleclick.net, googlesyndication.com किंवा googleadservices.com यांसह काही वेगवेगळ्या डोमेनवरून किंवा आमच्या भागीदारांच्या साइटच्या डोमेनवरून सेट करता येतात. आमची काही जाहिरात उत्‍पादने आमच्‍या भागीदारांना आमच्‍या सेवांसोबत इतर सेवा वापरू देतात (जाहिरात मापन आणि अहवाल सेवा यांसारख्‍या) आणि या सेवा त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या कुकीज तुमच्या ब्राउझरला पाठवू शकतात. या कुकीज त्‍यांच्‍या डोमेनवरून सेट केल्‍या जातील.

Google द्वारे वापरल्या जाणार्‍या कुकीजचे प्रकार आणि आमचे भागीदार आणि आम्‍ही त्या कशा वापरतो याबद्दल अधिक तपशील पहा.

आपण जाहिरात कुकीज कशा नियंत्रित करू शकता

आपण जाहिरात सेटिंग्ज वापरून आपण पहात असलेल्या Google जाहिराती व्यवस्थापित करू शकता आणि जाहिरात वैयक्तीकरण मधून बाहेर पडू शकता. आपण जाहिराती वैयक्तीकरणाची निवड रद्द केली तरीही आपण आपल्‍या IP पत्त्‍यावरून मिळविलेले आपले सामान्‍य स्‍थान, आपला ब्राउझर प्रकार आणि आपल्‍या शोध संज्ञा यासारख्‍या घटकांवर आधारित जाहिराती पाहू शकता.

आपण अनेक देशांमधील जसे की, US-आधारित aboutads.info निवडी पृष्ठ किंवा EU-आधारित आपल्या ऑनलाइन निवडी यासारख्या स्वयं-नियमन प्रोग्राम अंतर्गत तयार केलेल्या ग्राहक निवड साधनांमधून ऑनलाइन जाहिरातींसाठी वापरलेल्या अनेक कंपन्यांच्या कुकीज देखील व्यवस्थापित करू शकता.

अखेरीस, आपण आपल्‍या वेब ब्राउझरमध्‍ये कुकीज व्‍यवस्‍थापित करू शकता.

जाहिरातीमध्‍ये वापरलेले इतर तंत्रज्ञान

Google ची जाहिरात सिस्‍टीम Flash आणि HTML5 च्‍या समावेशासह इतर तंत्रज्ञान परस्‍पर संवादी जाहिरात स्‍वरूपनाचे प्रदर्शनासारख्‍या कार्यांसाठी वापरू शकेल. आम्‍ही IP पत्ता वापरू शकतो उदा, आपले सामान्‍य स्‍थान ओळखण्‍यासाठी. आपला संगणक किंवा डिव्‍हाइस, जसे की आपले डिव्‍हाइस मॉडेल, ब्राउझर प्रकार किंवा आपल्‍या डिव्‍हाइसमधील एक्‍सलेरोमीटर सारखे सेन्‍सर याबद्दलच्‍या माहितीवर आधारित आम्‍ही जाहिराती निवडू शकतो.

स्थान

Google ची जाहिरात उत्पादने आपल्या स्थानाविषयी विविध स्रोतांकडून माहिती प्राप्त करु शकतात किंवा अनुमान काढू शकतात. उदाहरणार्थ, आम्ही आपले सामान्य स्थान ओळखण्यासाठी IP पत्त्याचा वापर करु शकतो; आम्ही आपल्या मोबाईल डिव्हाइसवरून अचूक स्थान मिळवू शकतो; आम्ही आपल्या शोध क्वेरीवरून आपल्या स्थानाचे अनुमान काढू शकतो आणि आपण वापरता त्या वेबसाइट किंवा अ‍ॅप आपल्या स्थानाविषयीची माहिती आम्हाला पाठवू शकतात. Google आमच्या जाहिरात उत्पादनांमधील स्थान माहितीचा वापर लोकसंख्याशास्त्रीय माहितीचे अनुमान काढण्यासाठी, आपण पाहता त्या जाहिरातींचा सुसंबद्धपणा सुधारण्यासाठी, जाहिरातीचे कार्यप्रदर्शन मोजण्यासाठी आणि जाहिरातदारांना एकूण आकडेवारीचा अहवाल देण्यासाठी करते.

मोबाइल ॲप्ससाठी जाहिरात ओळखकर्ते

कुकी तंत्रज्ञान उपलब्ध नसणाऱ्या सेवांमध्ये (उदाहरणार्थ, मोबाईल अनुप्रयोगांमध्ये) जाहिराती देण्यासाठी, आम्ही कुकी प्रमाणे कार्ये करणाऱ्या तंत्रज्ञानांचा वापर करू शकतो. Google काहीवेळा आपल्या मोबाईल ॲप्स आणि मोबाईल ब्राउझर वरून जाहिरातींशी समन्वय साधण्यासाठी मोबाईल अनुप्रयोगांवरील जाहिरातींसाठी वापरलेल्या अभिज्ञापकाचा त्याच डिव्हाइसवरील जाहिरात कुकीशी दुवा जोडते. उदाहरणार्थ, आपल्या मोबाईल ब्राउझरमध्ये वेब पृष्ठ लाँच करणारी ॲपमधील जाहिरात पाहता तेव्हा, हे घडू शकते. आम्ही आमच्या जाहिरातदारांना त्यांच्या मोहीमांच्या प्रभावीपणावर जो अहवाल देतो तो सुधारित करण्यात देखील हे आमची मदत करते.

आपल्या मोबाईल डिव्हाइसवरील वैयक्तीकृत जाहिरातींची निवड रद्द करण्यासाठी, खालील सूचनांचे अनुसरण करा.

Android

  1. या ठिकाणांपैकी एकामध्ये Google सेटिंग्ज सापडतील (आपल्या डिव्हाइसवर आधारित):
    1. Google सेटिंग्ज नावाचे एक वेगळे ॲप
    2. आपल्या मुख्य सेटिंग्ज ॲपमध्ये, खाली स्क्रोल करा आणि Google टॅप करा
  2. जाहिराती टॅप करा
  3. स्वारस्य-आधारित जाहिरातींची निवड रद्द करा चालू करा

iOS

iOS असणारी डिव्हाइस Apple चे जाहिरात अभिज्ञापक वापरतात. या अभिज्ञापकाच्या वापराविषयीच्या आपल्या पर्यायांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या डिव्हाइसवर सेटिंग्ज ॲपला भेट द्या.

मी पाहत असलेल्या Google कडील जाहिराती काय निर्धारीत करतात?

बरेच निर्णय आपण कोणती जाहिरात पाहता हे निर्धारीत करण्यासाठी घेतले जातात.

काहीवेळा आपण पाहता ती जाहिरात आपल्या वर्तमान किंवा पूर्वीच्या स्थानावर आधारित असेल. आपला IP पत्ता हे सहसा आपल्या अंदाजे स्थानाचे एक चांगले सूचक असते. त्यामुळे आपल्याला YouTube.com च्या मुख्यपृष्ठावर आपल्या देशातील आगामी चित्रपटाचा प्रचार करणारी जाहिरात दिसेल किंवा 'पिझ्झा' चा शोध घेतल्यास आपल्या शहरातील पिझ्झा ठिकाणांसाठी परिणाम दर्शवेल.

काहीवेळा आपल्याला दिसणारी जाहिरात पृष्ठाच्या संदर्भावर आधारित असते. आपण बागकामाच्या टिपांचे पृष्ठ पाहत असल्यास, आपल्याला बागकामाच्या साधनांच्या जाहिराती दिसू शकतात.

काहीवेळा आपल्याला वेबवर आपल्या ॲप किंवा Google सेवांवरील क्रियाकलापावर आधारित जाहिरात दिसू शकेल; आपल्या वेब क्रियाकलापावर आधारित ॲप-अंतर्गत जाहिरात दिसू शकेल किंवा दुसऱ्या डिव्हाइसवरील आपल्या क्रियाकलापावर आधारित जाहिरात दिसू शकेल.

काहीवेळा आपण पृष्ठावर पाहत असलेल्या जाहिराती Google द्वारे दिल्या जातात परंतु दुसर्‍या कंपनीद्वारे निवडलेल्या असतात. उदाहरणार्थ, आपण एखाद्या वृत्तपत्र वेबसाइटसह नोंदणीकृत असू शकता. आपण वृत्तपत्रास दिलेल्या माहितीवरुन, आपल्याला कोणत्या जाहिराती दर्शविल्या जातील या बद्दल ते निर्णय घेऊ शकतात आणि त्या जाहिराती वितरीत करण्यासाठी Google च्या जाहिरात देणार्‍या उत्पादनांचा ते वापर करु शकतात.

आपल्याला शोध, Gmail आणि YouTube यांसह Google उत्पादने आणि सेवांवर देखील आपण जाहिरातदारांना प्रदान केलेली आणि नंतर जाहिरातदारांनी Google शी शेअर केलेली माहिती जसे की, आपला ईमेल पत्ता, यांवर आधारित जाहिराती दिसू शकतील.

मी पाहिलेल्या उत्पादनांसाठी मला Google द्वारे जाहिराती का दिसत आहेत?

आपल्याला यापूर्वी पाहिलेल्या उत्पादनांसाठी जाहिराती दिसू शकतील. समजा, आपण गोल्फ क्लबची विक्री करणार्‍या एखाद्या वेबसाइटला भेट दिली, परंतु आपण प्रथम भेटीमध्ये ते क्लब खरेदी केले नाहीत. कदाचित वेबसाइट मालक आपल्याला परत येण्यास आणि आपली खरेदी पूर्ण करण्यास प्रोत्साहित करू इच्छितो. Google अशा सेवा देते ज्या वेबसाइट ऑपरेटरना त्यांच्या पृष्ठांना भेट दिलेल्या लोकांसाठी त्यांच्या जाहिराती लक्ष्यित करू देतात.

हे कार्य करावे यासाठी, Google एकतर आपल्या ब्राउझरमध्ये आधीपासून असलेली कुकी वाचते किंवा आपण गोल्फिंग साइटला भेट देता तेव्हा आपल्या ब्राउझरमध्ये कुकी ठेवते, (आपले ब्राउझर हे करू देते असे गृहित धरून).

जेव्हा आपण Google सह कार्य करणार्‍या दुसर्‍या साइटला भेट देता, ज्यात गोल्फिंगसंबंधी काहीही नसते, तेव्हा कदाचित आपण त्या गोल्फ क्लबसाठी एखादी जाहिरात पाहू शकता. कारण आपला ब्राउझर Google ला तीच कुकी पाठवितो. फलस्वरूप, ते गोल्फ क्लब खरेदी करण्यास आपल्याला प्रोत्साहित करु शकणारी जाहिरात आपणास देण्यासाठी आम्ही त्या कुकीचा वापर करु शकतो.

Google वर आपण नंतर गोल्‍फ क्‍लब शोधता तेव्‍हा आपल्‍याला वैयक्तीकृत जाहिराती दर्शविण्‍यासाठी Google देखील गोल्‍फिंग साइटला दिलेल्‍या आपल्‍या भेटीचा वापर करू शकतो.

या प्रकारच्या जाहिरातीसाठी आमच्याकडे निर्बंध आहेत. उदाहरणार्थ, आम्ही आरोग्य माहिती किंवा धार्मिक श्रद्धा यासारख्या संवेदनशील माहितीवर आधारित प्रेक्षक निवडण्यास जाहिरातदारांना प्रतिबंधित करतो.

Google जाहिराती बद्दल अधिक जाणून घ्या.

Google Apps
मुख्य मेनू