Google कुकीज कसे वापरते

कुकीज म्‍हणजे आपण भेट दिलेल्‍या वेबसाइटद्वारे आपल्‍या ब्राउझरला पाठवलेला मजकूराचा लहान भाग होय. हे वेबसाइटला आपल्‍या भेटीबद्दल माहिती स्मरणात ठेवण्‍यास मदत करते जसे की, आपली प्राधान्‍यकृत भाषा आणि इतर सेटिंग्‍ज. ते आपल्‍यासाठी आपली पुढील भेट सोपी आणि साइट अधिक उपयुक्त करू शकते. कुकीज महत्‍वाची भूमिका करतात. त्‍यांच्‍याशिवाय, वेब वापरणे आणखी निराशाजनक अनुभव असू शकेल.

आम्‍ही कुकीज अनेक उद्देशांसाठी वापरतो. उदाहरणार्थ, आम्ही त्या तुमची सुरक्षित शोध प्राधान्ये लक्षात ठेवण्यासाठी, तुम्ही पाहत असलेल्या जाहिराती तुमच्यासाठी आणखी सुसंगत बनवण्यासाठी, आमच्या पेजवर किती लोक भेटी देतात ते मोजण्यासाठी, तुम्हाला आमच्या सेवांसाठी साइन अप करण्यात मदत करण्यासाठी, तुमच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी किंवा तुमची जाहिरात सेटिंग्ज लक्षात ठेवण्यासाठी वापरतो.

आपण Google द्वारे वापरलेल्या कुकीजच्या प्रकारांची सूची पाहू शकता आणि Google आणि आमचे भागीदार जाहिरातींमध्ये कुकीजचा वापर कसा करतात हे देखील शोधू शकता. आमच्‍या कुकीजच्‍या वापरामध्‍ये आणि इतर माहितीमध्‍ये आम्‍ही आपल्‍या गोपनीयतेचे संरक्षण कसे करतो ते आमचे गोपनीयता धोरण स्‍पष्‍ट करते.