Google स्थान माहिती कशी वापरते

Google स्थान माहिती का वापरते?

तुम्ही स्थान माहितीसह Google ची उत्पादने आणि सेवा वापरता तेव्हा आम्ही माहिती कशी हाताळतो त्याचे Google गोपनीयता धोरण वर्णन करते. आम्ही गोळा करत असलेली स्थान माहिती आणि ती तुम्ही कशी नियंत्रित करू शकता त्याबद्दल हे पेज अतिरिक्त माहिती पुरवते.

Google जे करते त्याच्या केंद्रस्थानी उपयुक्त, अर्थपूर्ण अनुभव पुरवणे असते आणि स्थान माहिती अगदी हेच करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ड्रायव्हिंग दिशानिर्देशांपासून, तुमच्या शोध परिणामांमध्ये तुमच्या जवळच्या गोष्टी आहेत याची खात्री करणे आणि एखादे रेस्टॉरंट विशेषतः कधी व्यस्त असते ते तुम्हाला दाखवण्यापर्यंत, स्थान माहिती तुमचे Google वरील अनुभव आणखी सुसंगत आणि उपयुक्त बनवू शकते. त्याचप्रमाणे स्थान माहिती काही मूलभूत उत्पादन कार्यक्षमतेबाबत मदत करते, जसे की योग्य त्या भाषेत वेबसाइट पुरवणे किंवा Google च्या सेवा संरक्षित ठेवण्यात मदत करणे.

Google ला माझे स्थान कसे समजते?

तुम्ही वापरत असलेली उत्पादने आणि तुम्ही निवडलेल्या सेटिंग्जच्या आधारावर, काही सेवांनी काम करण्यासाठी आणि इतर सेवा तुमच्याकरिता आणखी उपयुक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली वेगवेगळ्या प्रकारची स्थानाशी संबंधित माहिती तुम्ही Google ला पुरवू शकता. संदर्भानुसार अनुभव तयार करण्यासाठी तुमचा आयपी अ‍ॅड्रेस किंवा डिव्हाइसचे स्थान यांसारख्या रिअल-टाइम सिग्नलवरून आणि Google साइट व सेवांवरील तुमच्या मागील अ‍ॅक्टिव्हिटीवरून स्थान मिळू शकते. आम्हाला तुमच्या स्थानाविषयी माहिती मिळवता येण्याचे प्राथमिक मार्ग खाली दिले आहेत.

तुमच्या इंटरनेट कनेक्शनच्या आयपी अ‍ॅड्रेस वरून

तुमच्या डिव्हाइसला तुमच्या इंटरनेट सेवा पुरवठादाराने आयपी अ‍ॅड्रेस (याला इंटरनेट अ‍ॅड्रेस असेदेखील म्हणतात) असाइन केलेला असतो आणि तो इंटरनेट वापरण्यासाठी आवश्यक असतो. तुमचे डिव्हाइस आणि तुम्ही वापरत असलेल्या वेबसाइट व सेवांमध्ये कनेक्शन तयार करण्यासाठी आयपी अ‍ॅड्रेस वापरले जातात. आयपी अ‍ॅड्रेस साधारणतः भौगोलिक क्षेत्रांवर आधारित असतात. याचा अर्थ असा की, google.com च्या समावेशासह, तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही वेबसाइटला तुमच्या सर्वसाधारण भागाविषयी काही माहिती मिळू शकते.

इतर अनेक इंटरनेट सेवांप्रमाणे, Google तुम्ही आहात त्या सर्वसाधारण भागाविषयीची माहिती काही मूलभूत सेवा पुरवण्यासाठी वापरू शकते. तुम्ही आहात त्या सर्वसाधारण भागाचा अंदाज लावण्याचा अर्थ असा होतो की, उदाहरणार्थ, Google तुम्हाला उपयुक्त परिणाम पुरवू शकते आणि नवीन शहरामधून साइन इन करणे यासारखी नेहमीपेक्षा वेगळी अ‍ॅक्टिव्हिटी डिटेक्ट केली गेल्यास, तुमचे खाते सुरक्षित ठेवू शकते.

तुमच्या पूर्वीच्या अ‍ॅक्टिव्हिटीवरून

तुम्ही आमच्या सेवा वापरताना, तुमचे डिव्हाइस तुम्ही नेमके कुठे आहात हे आम्हाला सांगत नसले तरीही, तुम्हाला एखाद्या ठिकाणामध्ये स्वारस्य आहे असे अनुमान आम्ही लावू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही “पॅरीसमधील कॅफे” शोधल्यास, तुम्हाला पॅरीसजवळची ठिकाणे पहायची आहेत असे आम्ही समजू शकतो आणि तुम्हाला तेथील कॅफेविषयी परिणाम दाखवू शकतो. तुमचे मागील शोध यांसारख्या तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीमधील काही आयटममध्येदेखील तुम्ही त्यावेळी होता त्या सर्वसाधारण भागाचा समावेश असू शकतो. तुमच्या सेटिंग्जच्या आधारावर, या प्रकारची माहिती तुमच्या खात्यामध्ये स्टोअर केली जाऊ शकते आणि तुम्ही नंतर कधीतरी आणखी शोध घेता तेव्हा तुम्ही अद्याप पॅरिसमध्येच आहात की नाही हे ठरवणे यांसारख्या गोष्टींसाठी इनपुट म्हणून ती वापरली जाऊ शकते.

तुम्ही लेबल केलेल्या ठिकाणांवरून

तुमचे घर किंवा तुमचे ऑफिस यांसारख्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार्‍या ठिकाणांबद्दल आम्हाला सांगणेदेखील तुम्ही निवडू शकता. तुमच्या घराचा आणि ऑफिसचा पत्ता आपोआप वर आणून आणखी जलद दिशानिर्देश मिळवण्यासारख्या गोष्टी करण्यात हे तुम्हाला मदत करू शकेल. ही माहिती आम्ही तुम्हाला पुरवत असलेल्या परिणामांवर प्रभाव टाकण्यासाठीदेखील वापरली जाऊ शकते. अधिक जाणून घ्या

तुमच्या डिव्हाइसवरून

फोन किंवा काँप्युटर यांसारखी अनेक डिव्हाइस त्यांचे अचूक स्थान शोधू शकतात. तुमचे डिव्हाइस कुठे आहे या आधारावर तुम्ही Google आणि इतर अ‍ॅप्सना तुम्हाला उपयुक्त वैशिष्ट्ये पुरवण्याची अनुमती देऊ शकता. उदाहरणार्थ, तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटायला जाण्यासाठी तुम्हाला उशीर होत असल्यास, तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचण्याचा सर्वात जलद मार्ग जाणून घेण्यासाठी तुम्हाला एखादे नेव्हिगेशन अ‍ॅप वापरायचे असू शकते. टर्न बाय टर्न दिशानिर्देश मिळवण्यासाठी, तुम्हाला कदाचित डिव्हाइसचे स्थान सुरू करावे लागेल आणि अ‍ॅपला ते अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी द्यावी लागेल. किंवा “कॉफी शॉप”, “बस थांबा” अथवा “ATM” यांसारख्या काही शोधांसाठी अचूक स्थान उपलब्ध असल्यास, त्यांचे परिणाम आणखी उपयुक्त असतील.

तुमच्या Android डिव्हाइसवर, तुम्ही तुमचे डिव्हाइस स्थान सुरू करणे निवडल्यास, तुम्ही नेव्हिगेशन, अ‍ॅपला तुमच्या सद्य स्थानाचा अ‍ॅक्सेस देणे किंवा तुमचा फोन शोधणे यांसारखी वैशिष्ट्ये वापरू शकता. तुम्हाला वेगवेगळ्या अ‍ॅप्ससाठी परवानग्या सुरू किंवा बंद करू देणार्‍या सोप्या नियंत्रणांनी कोणत्या अ‍ॅप्सना तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरण्याची परवानगी असावी हेदेखील तुम्ही निवडू शकता. Android वर, तुमच्या स्क्रीनच्या सर्वात वरच्या बाजूला स्थान दिसते तेव्हा तुम्ही एखादे अ‍ॅप तुमच्या फोनचे GPS आधारित स्थान वापरण्याची परवानगी मागत असल्याचे पाहू शकता. अधिक जाणून घ्या

Google स्थान सेवा

बहुतांश Android डिव्हाइसवर, Google हे नेटवर्क स्थान पुरवठादार म्हणून, Google स्थान सेवा (GLS) नावाची स्थान सेवा पुरवते, जी Android 9 आणि त्यापुढील आवृत्त्यांमध्ये Google स्थान अचूकता म्हणून ओळखली जाते. आणखी अचूक डिव्हाइस स्थान पुरवणे आणि सर्वसाधारणपणे स्थान अचूकतेमध्ये सुधारणा करणे हा या सेवेचा उद्देश आहे. बहुतांश मोबाइल फोनमध्ये डिव्हाइसचे स्थान निर्धारित करण्यासाठी उपग्रहांवरून येणारे सिग्नल वापरणारे GPS असते – पण Google स्थान सेवा च्या बाबतीत, तुमच्या डिव्हाइसचे स्थान निर्धारित करण्यासाठी जवळपासचे वाय-फाय, मोबाइल नेटवर्क आणि डिव्हाइस सेन्सरवरील अतिरिक्त माहिती गोळा केली जाऊ शकते. स्थान सेवेच्या अचूकतेमध्ये सुधारणा करण्यासाठी ते वेळोवेळी तुमच्या डिव्हाइसवरून स्थान डेटा गोळा करून आणि तो निनावी पद्धतीने वापरून असे करते.

तुमच्या डिव्हाइसच्या स्थान सेटिंग्जमध्ये तुम्ही Google स्थान सेवा कधीही बंद करू शकता. GLS बंद केले असले तरीही तुमच्या डिव्हाइसचे स्थान काम करत राहील, परंतु आवश्यक त्या परवानग्या असलेल्या अ‍ॅप्ससाठी डिव्हाइसच्या स्थानाचा अंदाज करण्याकरिता डिव्हाइस फक्त GPS वर अवलंबून राहील. Google स्थान सेवा तुमच्या डिव्हाइसच्या स्थान सेटिंगपेक्षा वेगळी आहे. अधिक जाणून घ्या

तुमचे स्थान आणि त्या स्थानाचा अ‍ॅक्सेस कोणत्या अ‍ॅप्सना आहे हे निर्धारित करण्यासाठी तुमची डिव्हाइस सेन्सर (जसे की GPS) किंवा नेटवर्कवर आधारित स्थान (जसे की GLS) वापरले जावे की नाही हे Android वरील सेटिंग्ज आणि परवानग्या नियंत्रित करतात. तुमचा आयपी अ‍ॅड्रेस यांसारख्या इतर कोणत्याही पद्धतींनी वेबसाइट आणि अ‍ॅप्स तुमच्या स्थानाचा अंदाज कसा लावू शकतात यावर त्याचा प्रभाव पडत नाही.

माझ्या Google खात्यात स्थान कसे सेव्ह केले जाते?

तुम्ही वापरत असलेली Google उत्पादने आणि सेवा तसेच तुमच्या सेटिंग्जच्या आधारावर, Google तुमच्या Google खात्यावर स्थान माहिती सेव्ह करत असू शकते. ही माहिती जेथे सेव्ह केली जाते ती दोन सर्वात सामान्य ठिकाणे म्हणजे स्थान इतिहास व वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी.

Google स्थान इतिहास

तुम्ही स्थान इतिहासाची निवड केल्यास आणि तुमचे डिव्हाइस स्थान अहवाल देत असल्यास, तुमच्या साइन इन केलेल्या डिव्हाइसचे नेमके स्थान गोळा आणि स्टोअर केले जाईल, तुम्ही अ‍ॅक्टिव्ह राहून Google सेवा किंवा उत्पादन वापरत नसलात तरीही. हे तुमची टाइमलाइन तयार करण्यात मदत करते, जेथे तुमचा डेटा स्टोअर केला जातो आणि Google वर भविष्यातील शिफारशी समर्थित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. तुमच्या टाइमलाइन मध्ये काय सेव्ह केले आहे त्याचे तुम्ही कधीही पुनरावलोकन करू शकता, ते संपादित करू शकता आणि हटवू शकता.

स्थान इतिहास सुरू केल्याने Google वर आणखी पर्सनलाइझ केलेले अनुभव मिळतात—तुम्ही भेट दिलेल्या डायनिंग स्पॉटच्या आधारे Google नकाशे वर सुचवलेली रेस्टॉरंट, रहदारी टाळण्यासाठी घरी किंवा ऑफिसला जाण्याच्या सर्वात चांगल्या वेळेबद्दल रिअल-टाइम माहिती आणि तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांवरून Google फोटो मध्ये आपोआप तयार केलेले अल्बम.

तुम्ही स्थान इतिहास सुरू केला आहे का ते निर्धारित करण्यासाठी, तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल ला भेट द्या. तुम्हाला साइन इन करण्यास सांगितले जाऊ शकते आणि तेथून तुम्ही हे नियंत्रण सुरू आहे का ते पाहू शकता. तुम्ही नवीन स्थान इतिहास डेटा गोळा करणे थांबवू शकत असलात तरीही, तुम्ही तुमचा मागील स्थान इतिहास डेटा हटवेपर्यंत तो स्टोअर केला जाणे सुरू राहील. अधिक जाणून घ्या

तुम्ही तुमचा स्थान इतिहास डेटा हटवल्यास, तुमचा इतर स्थान डेटा तरीही इतर कुठेतरी सेव्ह केला गेलेला असू शकतो—जसे की वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये.

वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी

वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केलेली असल्यास, तुमचे शोध आणि इतर अनेक Google सेवांवरील अ‍ॅक्टिव्हिटी तुमच्या Google खात्यावर सेव्ह केली जाते. वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी वर सेव्ह केलेल्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये स्थान माहितीदेखील असू शकते. उदाहरण म्हणून, तुम्ही शोध मध्ये “हवामान” टाइप केल्यास आणि तुम्ही कुठे आहात त्याच्या आधारावर हवामान परिणाम मिळवल्यास, ही अ‍ॅक्टिव्हिटी, हा परिणाम पुरवण्यासाठी वापरलेल्या स्थानासह, तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटीवर सेव्ह केली जाते. तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी वर वापरलेले आणि स्टोअर केलेले स्थान डिव्हाइसचा आयपी अ‍ॅड्रेस, तुमची मागील अ‍ॅक्टिव्हिटी किंवा, तुम्ही तुमच्या डिव्हाइसची स्थान सेटिंग्ज सुरू करणे निवडले असल्यास, तुमचे डिव्हाइस यांसारख्या सिग्नलवरून येऊ शकते.

तुमची वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केल्याने तुम्हाला आणखी उपयुक्त शोध परिणाम, आणखी सुसंगत जाहिराती आणि आणखी अनुकूल केलेल्या सूचना दाखवण्यात आम्हाला मदत होते-जसे की मागील शोधांच्या आधारावर तुम्हाला तुमचा शोध आपोआप सुचवलेला दिसतो तेव्हा. तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये काय आहे त्याचे तुम्ही पुनरावलोकन करू शकता, ते हटवू शकता किंवा तुमच्या Google खात्यासाठी थांबवू शकता. वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी थांबवल्याने तुमचे भविष्यातील शोध आणि इतर Google सेवांवरील अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह करणे बंद होईल. तुम्ही तुमचा वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी डेटा हटवला तरीदेखील, तुमचा स्थान डेटा तरीही इतर कुठेतरी सेव्ह केला गेलेला असू शकतो—जसे की स्थान इतिहासामध्ये.

तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केली आहे का ते निर्धारित करण्यासाठी, तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल ला भेट द्या. तुम्हाला साइन इन करण्यास सांगितले जाऊ शकते आणि तेथून तुम्ही हे नियंत्रण सुरू आहे का ते पाहू शकता. अधिक जाणून घ्या

जाहिराती दाखवण्यासाठी स्थान कसे वापरले जाते?

जाहिराती तुमच्या सर्वसाधारण स्थानाच्या आधारावर दाखवल्या जाऊ शकतात. यामध्ये डिव्हाइसच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून मिळवलेले स्थान असू शकते. तुमच्या जाहिरात पर्सनलायझेशन सेटिंग्जच्या आधारावर, तुम्हाला तुमच्या Google खात्यामधील अ‍ॅक्टिव्हिटीवर आधारित जाहिरातीदेखील दिसू शकतात. यामध्ये तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये स्टोअर केलेली अ‍ॅक्टिव्हिटी आहे, जी आणखी उपयुक्त जाहिरातींसाठी वापरली जाऊ शकते. दुसरे उदाहरण म्हणजे तुम्ही स्थान इतिहास सुरू केला असल्यास आणि स्की रिसॉर्टना नियमितपणे जात असल्यास, तुम्हाला नंतर YouTube वर एखादा व्हिडिओ पाहताना स्की उपकरणांची जाहिरात दिसू शकेल. प्रत्यक्ष स्टोअरमध्ये किंवा मालमत्तांवर रहदारी वळवण्यात ऑनलाइन जाहिरात मोहीम किती वेळा मदत करते त्याचे मापन करण्यात जाहिरातदारांना मदत करण्यासाठी, ज्या वापरकर्त्यांनी स्थान इतिहास ची निवड केलेली आहे त्यांच्यासाठी Google तोदेखील अ‍ॅनोनिमाइझ आणि एकत्रित केलेल्या पद्धतीने वापरते. स्थान इतिहास किंवा इतर कोणतीही ओळख पटवणारी माहिती आम्ही जाहिरातदारांसोबत शेअर करत नाही.

तुमच्या Google खात्यामध्ये स्टोअर केलेल्या डेटावर तुमचे नियंत्रण आहे आणि तुम्ही कधीही पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती बंद करू शकता. जाहिरात पर्सनलायझेशन बंद असताना, तुम्हाला आणखी उपयुक्त जाहिराती दाखवण्यासाठी Google तुमच्या Google खात्यामध्ये स्टोअर केलेला डेटा वापरत नाही.

Google Apps
मुख्य मेनू