गोपनीयता आणि अटी
गोपनीयता आणि अटी
आमच्या जनरेटिव्ह AI अतिरिक्त सेवा अटी याची ही संग्रहित केलेली आवृत्ती आहे. वर्तमान आवृत्ती किंवा सर्व मागील आवृत्त्या पहा.

जनरेटिव्ह AI संबंधित अतिरिक्त सेवा अटी

शेवटचे फेरबदल केले: १४ मार्च, २०२३

या अटींचा संदर्भ देणाऱ्या Google सेवा (“सेवा”) वापरण्यासाठी, तुम्ही (१) Google सेवा अटी आणि (२) जनरेटिव्ह AI संबंधित या अतिरिक्त सेवा अटी स्वीकारणे आवश्यक आहे.

कृपया हे दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा. एकत्रितपणे, हे दस्तऐवज “अटी” म्हणून ओळखले जातात. ते आमच्या सेवा वापरताना तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करू शकता आणि आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करतो हे निश्चित करतात.

आम्ही कोणती माहिती गोळा करतो आणि तुम्ही तुमची माहिती अपडेट करणे, ती व्यवस्थापित करणे, एक्सपोर्ट करणे व हटवणे हे कसे करू शकता ते अधिक चांगल्याप्रकारे समजण्यासाठी, तुम्ही आमचे गोपनीयता धोरण (आणि सेवेच्या संदर्भात सादर केलेल्या कोणत्याही गोपनीयता सूचना) वाचावे अशी आम्ही आवर्जून शिफारस करतो.

वयाची आवश्यकता

सेवा वापरण्यासाठी तुमचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

वापराशी संबंधित निर्बंध

तुम्ही मशीन लर्निंग मॉडेल किंवा संबंधित तंत्रज्ञान डेव्हलप करण्यासाठी सेवा वापरू शकत नाही.

Google सेवा अटी मधील "इतरांचा आदर करा" या विभागाव्यतिरिक्त, तुम्ही आमच्या प्रतिबंधित वापर धोरण याचे पालन केले पाहिजे, जे सेवा वापरताना योग्य वर्तनाबद्दल अतिरिक्त तपशील देते.

आमच्या प्रतिबंधित वापर धोरण याचे उल्लंघन करणारा आशय यासारखा हानिकारक आशय ब्लॉक करण्यासाठी सेवांमध्ये सुरक्षितता वैशिष्ट्यांचा समावेश आहे. Google सेवा अटी यामधील "इतरांचा आदर करा" या विभागामध्ये नमूद केल्याप्रमाणे, तुम्ही या संरक्षक उपायांना बायपास करण्याचा प्रयत्न करू शकत नाही किंवा या अटींचे उल्लंघन करणारा आशय वापरू शकत नाही.

तुम्ही नाव, फोन नंबर, पत्ते, ईमेल किंवा जन्मतारखांच्या समावेशासह कोणतीही वैयक्तिक किंवा संवेदनशील माहिती इनपुट करणार नाही.

अस्वीकृती

सेवा या प्रायोगिक तंत्रज्ञान वापरतात, त्यामुळे त्या कधीकधी Google च्या दृश्यांचे प्रतिनिधित्व न करणारा चुकीचा किंवा आक्षेपार्ह आशय देऊ शकतात.

सेवांद्वारे दिलेल्या आशयावर अवलंबून राहण्यापूर्वी, तो प्रकाशित करण्यापूर्वी अथवा वापरण्यापूर्वी विवेकबुद्धीचा वापर करा.

वैद्यकीय, कायदेशीर, वित्तीय किंवा इतर व्यावसायिक सल्ल्यासाठी सेवांवर अवलंबून राहू नका. त्या विषयांशी संबंधित कोणताही आशय हा फक्त माहितीच्या उद्देशाने दिला जातो आणि तो पात्र व्यावसायिकाकडून सल्ला मिळवण्यासाठीचा पर्याय नाही.

नवीन टॅबमध्ये उघडते(तळटीप उघडते)
  • Afrikaans
  • Bahasa Indonesia
  • Bahasa Melayu
  • Català
  • Čeština
  • Dansk
  • Deutsch
  • Eesti
  • English
  • English (India)
  • English (United Kingdom)
  • Español
  • Español (Latinoamérica)
  • Euskara
  • Filipino
  • Français
  • Français (Canada)
  • Gaeilge
  • Galego
  • Hrvatski
  • Isizulu
  • Íslenska
  • Italiano
  • Kiswahili
  • Latviešu
  • Lietuvių
  • Magyar
  • Malti
  • Nederlands
  • Norsk
  • Polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • Română
  • Slovenčina
  • Slovenščina
  • Srpski
  • Suomi
  • Svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • অসমীয়া
  • Ελληνικά
  • Български
  • ଓଡିଆ
  • Русский
  • Српски
  • Українська
  • ‫עברית‬
  • ‫اردو‬
  • ‫العربية‬
  • ‫فارسی‬
  • አማርኛ
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • ไทย
  • 한국어
  • 中文 (香港)
  • 中文(简体中文)
  • 中文(繁體中文)
  • 日本語
Google Apps
मुख्य मेनू