जनरेटिव्ह AI संबंधित अतिरिक्त सेवा अटी
शेवटचे फेरबदल केले: ९ ऑगस्ट, २०२३ | संग्रहित आवृत्त्या
या अटींचा संदर्भ देणाऱ्या Google सेवा (“सेवा”) वापरण्यासाठी, तुम्ही (१) Google सेवा अटी आणि (२) जनरेटिव्ह AI संबंधित या अतिरिक्त सेवा अटी स्वीकारणे आवश्यक आहे.
कृपया हे दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा. एकत्रितपणे, हे दस्तऐवज “अटी” म्हणून ओळखले जातात. ते आमच्या सेवा वापरताना तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करू शकता आणि आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करतो हे निश्चित करतात.
आम्ही कोणती माहिती गोळा करतो आणि तुम्ही तुमची माहिती अपडेट करणे, ती व्यवस्थापित करणे, एक्सपोर्ट करणे व हटवणे हे कसे करू शकता ते अधिक चांगल्याप्रकारे समजण्यासाठी, तुम्ही आमचे गोपनीयता धोरण (आणि सेवेच्या संदर्भात सादर केलेल्या कोणत्याही गोपनीयता सूचना) वाचावे अशी आम्ही आवर्जून शिफारस करतो.
वयाची आवश्यकता
Google सेवा अटी यामधील “आवश्यक वय” या विभागाच्या व्यतिरिक्त, सेवा हिच्या संदर्भातील कोणत्याही अतिरिक्त वयोमर्यादांचे तुम्ही पालन कराल.
वापराशी संबंधित निर्बंध
तुम्ही मशीन लर्निंग मॉडेल किंवा संबंधित तंत्रज्ञान डेव्हलप करण्यासाठी सेवा वापरू शकत नाही.
Google सेवा अटी मधील "इतरांचा आदर करा" या विभागाव्यतिरिक्त, तुम्ही आमच्या प्रतिबंधित वापर धोरण याचे पालन केले पाहिजे, जे सेवा वापरताना योग्य वर्तनाबद्दल अतिरिक्त तपशील देते.
आमच्या प्रतिबंधित वापर धोरण याचे उल्लंघन करणारा आशय यासारखा हानिकारक आशय ब्लॉक करण्यासाठी सेवांमध्ये सुरक्षितता वैशिष्ट्यांचा समावेश आहे. Google सेवा अटी यामधील "इतरांचा आदर करा" या विभागामध्ये नमूद केल्याप्रमाणे, तुम्ही या संरक्षक उपायांना बायपास करण्याचा प्रयत्न करू शकत नाही किंवा या अटींचे उल्लंघन करणारा आशय वापरू शकत नाही.
लागू असल्यास, संवेदनशील किंवा गोपनीय माहिती न देण्याच्या कोणत्याही चेतावण्यांसारख्या सेवा हिच्याशी संबंधित सूचनांचे तुम्ही पालन कराल.
अस्वीकृती
सेवा या कधीकधी Google च्या विचारांचे प्रतिनिधित्व न करणारा चुकीचा किंवा आक्षेपार्ह आशय देऊ करू शकतात.
सेवांद्वारे दिलेल्या आशयावर अवलंबून राहण्यापूर्वी, तो प्रकाशित करण्यापूर्वी अथवा वापरण्यापूर्वी विवेकबुद्धीचा वापर करा.
वैद्यकीय, कायदेशीर, वित्तीय किंवा इतर व्यावसायिक सल्ल्यासाठी सेवांवर अवलंबून राहू नका. त्या विषयांशी संबंधित कोणताही आशय हा फक्त माहितीच्या उद्देशाने दिला जातो आणि तो पात्र व्यावसायिकाकडून सल्ला मिळवण्यासाठीचा पर्याय नाही.
