सेवा आणि सेवेशी संबंधित अतिरिक्त अटी यांची सूची
Google च्या सेवा अटी आणि त्यांच्या सेवा विशिष्ट अतिरिक्त अटी आणि धोरणे वापरणार्या सेवा
Google च्या सेवा अटी खाली सूचीबद्ध केलेल्या सेवांवर लागू होतात. प्रत्येक सेवेच्याशेजारी, आम्ही त्या विशिष्ट सेवेवर लागू होणाऱ्या अतिरिक्त अटी आणि धोरणांची सूचीदेखील दिली आहे. तुम्ही या सेवा वापरता तेव्हा सेवा अटी, अतिरिक्त अटी आणि धोरणे आमचे संबंध आणि परस्पर अपेक्षा परिभाषित करतात.
या सूचीमध्ये फक्त Google च्या सामान्य सेवा अटींद्वारे संचालित असलेल्या सेवांचा समावेश आहे. ठरावीक प्रसिद्ध सेवा जसे की, YouTube च्या युनिक वैशिष्ट्यांमुळे त्याच्या स्वतःच्या अटी आहेत. आमच्या बहुतांश शुल्कावर आधारित एंटरप्राइज उत्पादनांच्या आणि डेव्हलपर API उत्पादनांच्यादेखील स्वतःच्या अटी आहेत.
आम्ही बर्याचदा नवीन सेवा लाँच करतो आणि काहीवेळा आमच्या अटी व धोरणे अपडेट करतो. हे पेज अपडेट ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि ते नियमितपणे रीफ्रेश करण्याचे आमचे ध्येय आहे.









































































































