Google माझ्या गोपनीयतेचे संरक्षण कसे करते आणि माझी माहिती कसे सुरक्षित ठेवते?

आम्‍हास माहित आहे की सुरक्षितता आणि गोपनीयता आपल्‍यासाठी महत्त्‍वाच्‍या आहेत – आणि त्‍या आमच्‍यासाठी देखील, महत्त्‍वाच्‍या आहेत. आपली माहिती सुरक्षित आहे आणि आपल्‍याला तिची आवश्‍यकता असेल तेव्‍हा ती प्रवेश करता येणारी असेल याचा आपल्याला आत्‍मविश्‍वास आणि मजबूत सुरक्षितता देण्‍यास आम्‍ही प्राधान्‍य देतो.

आम्ही मजबूत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, आपल्या गोपनीयतेस संरक्षण देण्यासाठी आणि आपल्यासाठी Google अधिक प्रभावी आणि कार्यक्षम बनविण्यासाठी सातत्याने कार्य करत आहोत. आम्ही सुरक्षिततेवर दर वर्षी लक्षावधी डॉलर खर्च करतो आणि आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डेटा सुरक्षिततेमध्ये जग-विख्यात तज्ञ नियुक्त करतो. आम्ही Google डॅशबोर्ड, द्वि-चरण सत्यापन आणि जाहिरात सेटिंग्ज यासारखी वापरण्यास-सोपी गोपनीयता आणि सुरक्षितता साधने देखील वापरतो. म्हणून आपण Google सह सामायिक करत असलेल्या माहितीच्या विषयात आपण नियंत्रणात असता.

आपण आपल्या स्वतःस आणि आपल्या कुटुंबास ऑनलाइन कसे सुरक्षित ठेवावे त्यासह ऑनलाइन सुरक्षितता आणि संरक्षणाविषयी, आमच्या Google सुरक्षितता केंद्रावर अधिक जाणून घेऊ शकता.

आम्ही आपली वैयक्तिक माहिती खाजगी आणि सुरक्षित कशी ठेवतो — आणि आपल्‍याला नियंत्रण कसे प्रदान करतो त्याविषयी अधिक जाणून घ्‍या.

माझे खाते एखाद्या देशाशी का संबंधित आहे?

तुमचे खाते सेवा अटींमधील देशाशी (किंवा प्रांत) संबंधित आहे जेणेकरून आम्हाला दोन गोष्टी निर्धारित करता येतील:

  1. Google ची अनुषंगिक कंपनी/संस्था जी सेवा पुरवते, तुमच्या माहितीवर प्रक्रिया करते आणि ते लागू असलेल्या गोपनीयता कायद्यांचे पालन करण्यास जबाबदार आहे. सामान्यत:, Google दोनपैकी एका कंपनीमार्फत ग्राहक सेवा पुरवते:
    1. Google Ireland Limited, तुम्ही युरोपिअन इकॉनॉमिक एरिया (EU देशांसह आईसलंड, लिक्टनस्टाइन आणि नॉर्वे) किंवा स्विर्त्झलंडमध्ये असल्यास
    2. उर्वरित जगासाठी, Google LLC, युनायटेड स्टेट्स मध्ये स्थित
  2. आमच्या संबंधांवर शासन करणाऱ्या अटींची आवृत्ती, जी स्थानिक कायद्यानुसार वेगळी असू शकते

लक्षात ठेवा की, सेवा पुरवत असलेली अनुषंगिक कंपनी/संस्था किंवा तुमचा संबंधित देश कोणताही असला तरीही, Google सेवा मूलतः समान असतात.

तुमच्या खात्याशी संबंधित देश निर्धारित करणे

तुम्ही नवीन खाते तयार करता तेव्हा तुम्ही तुमचे Google खाते कुठे तयार केले आहे याच्या आधारे आम्ही तुमचे खाते देशाशी संबंधित करतो. एका वर्षापेक्षा कमी काळापासून अस्तित्वात खात्यांसाठी, तुम्ही सामान्यतः ज्या देशातून Google सेवा अ‍ॅक्सेस करता तो देश आम्ही वापतो - साधारणपणे तुम्ही मागील वर्षात जिथे वर्षात सर्वाधिक वेळ घालवला आहे.

वारंवार प्रवासाचा तुमच्या खात्याशी संबंधित देशावर परिणाम होत नाही. तुम्ही नवीन देशात स्थलांतर केल्यास, तुमचा संबंधित देश अपडेट होण्यासाठी सुमारे एक वर्ष लागू शकते.

तुमच्या खात्याशी संबंधित देश तुमच्या रहिवासी देशाशी संबंधित नसल्यास, असे तुमच्या कामाचा आणि रहिवासी देशामधील फरकामुळे, तुम्ही तुमचा पत्ता लपवण्यासाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) इंस्टॉल केला असल्यामुळे किंवा तुम्ही प्रादेशिक सीमेच्या जवळ राहत असल्यामुळे असू शकते. तुमचा संबंधित देश चुकीचा आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, आमच्याशी संपर्क साधा.

मी Google च्या शोध परिणामांमधून माझ्या स्वतःविषयीची माहिती कशी काढू शकतो?

Google शोध परिणाम हे वेबवर सार्वजनिकरित्‍या उपलब्ध असलेल्‍या सामग्रीचे प्रतिबिंब आहेत. शोध इंजिन थेट वेबवरून सामग्री काढू शकत नाहीत, म्‍हणून Google वरून शोध परिणाम काढण्‍याने वेबवरील सामग्री काढली जाणार नाही. आपण वेबवरून काहीतरी काढू इच्‍छित असल्‍यास, आपण सामग्री पोस्‍ट केलेल्‍या साइटच्‍या वेबमास्‍टरशी संपर्क साधावा आणि त्याला किंवा तिला बदल करण्‍यास सांगा. एकदा सामग्री काढली गेली आणि Google ने अद्यतनाची टिप घेतल्‍यास, माहिती यापुढे Google च्‍या शोध परिणामांमध्‍ये दिसणार नाही. आपल्‍याकडे तातडीची काढण्‍याची विनंती असल्‍यास, आपण अधिक माहितीसाठी आमच्‍या मदत पृष्‍ठास भेट द्या.

मी Google शोध परिणामांवर क्लिक करतो तेव्हा माझ्या शोध क्वेरी वेबसाइटवर पाठविल्या जातात?

काही प्रकरणांमध्ये, होय. तुम्ही Google शोध मधील एका शोध परिणामावर क्लिक केल्यावर तुमचा वेब ब्राउझर रेफरर URL म्हणून गंतव्याकडे शोध परिणाम पृष्ठाचा इंटरनेट पत्ता किंवा URL देखील पाठवू शकतो. शोध परिणाम पृष्ठाच्या URL मध्ये काहीवेळा तुम्ही प्रविष्ट केलेली शोध क्वेरी असू शकते. तुम्ही SSL शोध वापरत असल्यास (Google ची एंक्रिप्ट केलेली शोध कार्यक्षमता), बऱ्याच वेळा, तुमच्या शोध संज्ञा रेफरर URL मध्ये URL चा भाग म्हणून पाठवल्या जाणार नाहीत. या वर्तनास काही अपवाद आहेत, जसे की जेव्हा तुम्ही एखादा कमी लोकप्रिय ब्राउझर वापरता. SSL शोध वरील अधिक माहिती येथे मिळू शकते. रेफरर URL मध्ये असलेल्या शोध क्वेरी किंवा माहिती Google Analytics द्वारे किंवा ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) द्वारे उपलब्ध होऊ शकते. यासह, जाहिरातदार जाहिरात क्लिक ट्रिगर केलेली अचूक कीवर्डशी संबंधित माहिती प्राप्त करू शकतात.

Google Apps
मुख्य मेनू