ही आमच्या गोपनीयता धोरणाची संग्रहित आवृत्ती आहे. वर्तमान आवृत्ती किंवा सर्व मागील आवृत्त्या पहा.

गोपनीयता धोरण

अखेरचे सुधारित: २० डिसेंबर २०१३ (संग्रहीत आवृत्त्या पहा)

आपण आमच्या सेवा विविध प्रकारे वापरू शकता – माहिती शोधणे आणि शेअर करणे, इतर लोकांशी संवाद साधणे किंवा नवीन सामग्री तयार करणे यासाठी. आमच्‍याबरोबर माहिती शेअर करताना, उदाहरणार्थ एक Google खातेतयार करून, आपल्‍याला अधिक संबंधित शोध परिणाम आणि जाहिराती दर्शविण्‍यासाठी, आपल्‍याला लोकांसह कनेक्‍ट करण्‍यात किंवा इतरांसह शेअर करणे जलद आणि सोपे बनविण्‍यात मदत करण्‍यासाठी – आम्‍ही त्‍या सेवा चांगल्‍या सुद्धा करू शकतो. जेव्हा आपण आमच्या सेवा वापरतात, तेव्हा आम्ही आपली माहिती कशी वापरत आहोत आणि आपण आपल्या गोपनीयतेचे संरक्षण कोणत्या प्रकारे करू शकता हे आपल्याला स्पष्ट करून देऊ इच्छितो.

आमचे गोपनीयता धोरण हे स्‍पष्‍ट करते:

  • आम्‍ही कोणती माहिती एकत्रित करतो आणि ती का एकत्रित करतो.
  • आम्ही ती माहिती कशी वापरतो.
  • माहिती कशी वापरावी आणि ती अद्यावत कशी करावी यासह आम्ही देत असलेले विकल्प.

आम्ही हे शक्य तितके सोपे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आपण कुकीज, IP पत्ते, पिक्सेल टॅग आणि ब्राउझर यासारख्या संज्ञांसह परिचित नसल्यास, प्रथम या प्रमुख संज्ञां विषयी वाचा. आपली गोपनीयता Google साठी महत्त्वाची असल्याने आपण Google साठी नवीन किंवा दीर्घ-काळ वापरकर्ता आहात तरीही कृपया आमच्या पद्धती जाणून घेण्यासाठी वेळ द्या – आणि आपल्याला कोणतेही प्रश्न असल्यास या पृष्ठाचा सल्ला घ्या.

आम्‍ही एकत्र करीत असलेली माहिती

आमच्‍या सर्व वापरकर्त्‍यांना चांगल्‍या प्रकारे सेवा प्रदान करता येण्‍यासाठी आम्‍ही माहिती एकत्रित करतो – आपण कोणती भाषा बोलता यासारख्‍या मुळ सामग्री पासून ते आपल्‍याला कोणत्‍या जाहिराती सर्वात जास्‍त उपयोगाच्‍या वाटतात किंवा ऑनलाइनवर कोणते लोक असणे महत्‍वाचे वाटते यासारख्‍या अधिक जटिल गोष्‍टींचे आकलन करणे

आम्‍ही दोन प्रकारे माहिती एकत्रित करतो:

  • आपण आम्हाला देत असलेली माहिती. उदाहरणार्थ, आमच्या पुष्कळ सेवांकरिता आपल्याला एक Google खाते उघडणे आवश्यक आहे. आपण असे करताना आम्‍ही आपले नाव, ईमेल पत्ता, टेलिफोन नंबर किंवा क्रेडिट कार्ड यासारखी वैयक्तिक माहितीविचारू. आम्ही देत असलेल्या शेअरींग वैशिष्‍ट्यांचा आपल्याला पूर्ण लाभ घेण्‍याची इच्छा असल्यास आम्ही आपणास जाहीरपणे दृश्‍यमान असलेले Google प्रोफाइल तयार करण्‍यास सांगू, ज्यामध्‍ये आपले नाव आणि छायाचित्र समाविष्‍ट असेल.

  • आपण आमच्या सेवा वापरल्यामुळे आम्हाला मिळणारी माहिती. आपण आमच्या जाहिरात सेवा वापरणार्‍या एखाद्या वेबसाइटला भेट देता किंवा आपण आमच्या जाहिराती आणि सामग्री पाहता आणि संवाद साधता त्यावेळी, आम्ही आपण वापरत असलेल्या सेवेबद्दल आणि आपण ती कशी वापरता याबद्दल माहिती संकलित करू शकतो. या माहितीत समाविष्‍ट आहे:

    • उपकरण (डिव्हाइस) माहिती

      आम्‍ही डिव्‍हाइस-विशिष्‍ट माहिती (जसे आपले हार्डवेअर मॉडेल, ऑपरेटिंग प्रणाली आवृत्ती, एकमेव डिव्‍हाइस अभिज्ञापक, आणि मोबाइल नेटवर्क फोननंबरसह माहिती) एकत्र करतो. Google आपला डिव्हाइस अभिज्ञापक किंवा फोन नंबर आपल्या Google खात्याशी संबंधित ठेवू शकता.

    • लॉग माहिती

      आपण आमच्‍या सेवांचा वापर करताना किंवा Google द्वारे प्रदान केलेल्‍या सामग्रीस पहाताना, आम्‍ही स्‍वयंचलितपणे काही माहिती सर्व्हर लॉग मध्‍ये एकत्रित आणि संग्रहित करतो. यामध्‍ये हे समाविष्‍ट होऊ शकते:

      • आपण आमची सेवा कशी वापरता त्याचे तपशील, जसे की आपल्या शोध करण्क्वेयाबाबत शंका, प्रश्न.
      • आपला फोन नंबर, कॉल केलेल्या पक्षाचा नंबर, अग्रेषित केलेले नंबर, कॉलचा वेळ आणि तारीख, कॉलचा कालावधी, SMS रुटींग माहिती आणि कॉलचे प्रकार यासारखी टेलिफोनविषयक लॉग माहिती.
      • इंटरनेट प्रोटोकॉल पत्ता.
      • डिव्हाइस इव्हेंट माहिती जसे की क्रॅश होणे, सिस्टम क्रिया, हार्डवेअर सेटिंग्ज, ब्राउझर प्रकार, ब्राउझर भाषा, आपल्या विनंतीची तारीख आणि वेळ आणि निर्दिष्ट URL.
      • आपल्या ब्राउझरला किंवा आपल्या Google खात्यास अनन्यपणे ओळखू शकणार्‍या कुकीज.
    • स्थान माहिती

      आपण जेव्‍हा स्‍थान-सक्षम Google सेवेचा वापर करता, तेव्‍हा आम्‍ही आपल्‍या वास्‍तविक स्‍थानाबद्दल, जसे मोबाइल डिव्‍हाइसद्वारे GPS सिग्‍नल पाठविले जातात त्‍याप्रमाणे माहिती एकत्रित करून प्रक्रिया करतो. आम्‍ही विविध तंत्रज्ञानांचा वापर स्‍थान निर्धारण करण्‍यासाठी करतो, जसे उदाहरणार्थ, आपल्‍या डिव्‍हाइसमधून सेन्‍सर डेटा, जवळील Wi-Fi प्रवेश बिंदू आणि सेल मनोर्‍यावरील माहिती प्रदान करू शकतो.

    • अनन्य अनुप्रयोग क्रमांक (युनिक अॅप्लिकेशन नंबर)

      काही सेवा एक वेगळा अनुप्रयोग नंबर समाविष्ट करतात. हा नंबर आणि आपल्या स्थापनेबद्दलची माहिती (उदाहरणार्थ ऑपरेटिंग सिस्टीम प्रकार आणि अनुप्रयोग आवृत्ती क्रमांक) आपण स्‍थापित किंवा विस्थापित केल्यानंतर किंवा त्या सेवेने कालावधीनुसार आमच्या स्वयंचलित अद्ययावत होण्सायाठी सर्व्हरशी संपर्क साधल्यानंतर Google कडे पाठविण्‍यात येऊ शकते.

    • स्थानिक संचयन

      आम्‍ही स्‍थानिकरित्‍या माहिती (वैयक्तिक माहिती समाविष्‍ट करून) आपल्‍या उपकरण (डिव्‍हाइसवर) ब्राउझर वेब संग्रह (HTML 5 सह) आणि अनुप्रयोग डेटा कॅशे यासारख्‍या प्रणाल्‍यांचा वापर करून एकत्र आणि संग्रहित करतो.

    • कुकीज आणि निनावी अभिज्ञापक (आयडेंटिफायर)

      आपण एका Google सेवेला भेट देता तेव्हा आम्‍ही विविध तंत्रज्ञानांचा वापर माहितीला एकत्र आणि संग्रहित करण्‍यासाठी करतो, आणि यात एक किंवा अधिक कुकीज किंवा निनावी अभिज्ञापक ला आपल्‍या डिव्‍हाइसवर पाठविण्‍याचा समावेश असू शकतो. आम्‍ही आमच्‍या भागीदारांना देऊ केलेल्‍या सेवांसह जसे की इतर साइटवर दिसणारे Google वैशिष्‍ट्‍ये किंवा जाहिरात सेवा यासारख्‍या सेवांसह आपण संवाद साधता तेव्‍हा आम्‍ही कुकीज आणि निनावी अभिज्ञापक देखील वापरतो.

आम्ही संकलित करत असलेली माहिती आम्ही कशी वापरतो

आमच्‍या सर्व सेवांमधून एकत्र केलेल्‍या माहितीचा वापर आम्‍ही प्रदान करणे, देखरेख करणे, संरक्षण करणे आणि त्‍यांना सुधारणे, नवीन विकसित करणे आणि Google आणि आमच्‍या वापरकर्त्‍यांचे संरक्षण करणे यासाठी करतो. आम्‍ही या माहितीचा वापर आपल्‍याला अधिक संबंद्धित शोध परिणाम आणि जाहिराती देणे – यासारखी नियोजित सामग्री देण्यासाठी देखील करतो.

आपल्‍या Google प्रोफाइलसाठी आपण प्रदान केलेले नाव आम्‍ही देऊ करीत असलेल्‍या सर्व सेवा ज्‍यांना एका Google खात्‍याची आवश्‍यकता असते त्‍या सेवांमध्‍ये वापरू. या ‍व्यतिरिक्त, आम्ही आपल्या Google खात्याशी संबंधित जुनी नावे बदलु शकतो जेणेकरुन सर्व सेवांमध्‍ये आपले प्रतिनिधित्व सातत्याने केले जाईल. आपले ईमेल इतर वापरकर्त्यांकडे आधीपासूनच असल्यास किंवा आपल्याला ओळखणारी अन्य माहिती असल्यास, आम्ही त्यांना आपली सार्वजनिकपणे दृश्यमान असलेली Google प्रोफाइल माहिती दर्शवू शकतो, जसे की आपले नाव आणि फोटो.

आपण Google शी संपर्क साधता तेव्‍हा, आपल्‍याला येणार्‍या कोणत्‍याही समस्‍यांचे निराकरण करण्‍यात मदत करण्‍यासाठी आम्‍ही आपल्‍या संप्रेषणाचे रेकॉर्ड ठेवतो. आम्‍ही आपला ईमेल पत्ता आपल्‍याला आमच्‍या सेवांबद्दल जसे की आगामी बदलांविषयी किंवा सुधारणांविषयी माहिती देण्‍यास वापरू.

आम्‍ही कुकीज आणि पिक्‍सेल टॅग सारख्‍या इतर तंत्रज्ञानांमधून एकत्रित केलेल्‍या माहितीचा वापर आपला वापरकर्ता अनुभव आणि एकंदर आमच्‍या सेवांची गुणवत्ता सुधारण्‍यासाठी करतो. उदाहरणार्थ, आपली भाषा प्राधान्ये जतन करून, आम्ही आमच्या सेवा आपण प्राधान्य देत असलेल्या भाषांमध्ये दिसून येण्यास सक्षम होऊ. आपल्‍याला नियोजित जाहिराती दाखविताना, आम्‍ही कुकी किंवा निनावी अभिज्ञापकास जात, धर्म, लैंगिक आवड किंवा आरोग्‍य यासारख्‍या संवेदनशील श्रेण्‍यांसह संबंद्ध करणार नाही.

आम्‍ही एका सेवेमधून वैयक्तिक माहिती Google च्‍या इतर सेवांच्‍या माहितीसह वैयक्तिक माहिती समाविष्‍ट करून एकत्रित करू शकतो – उदाहरणार्थ आपण ओळखत असलेल्‍या लोकांसह गोष्‍टी शेअर करणे. आमच्‍याकडे आपली निवड करण्‍याची संमती नसेपर्यंत आम्‍ही DoubleClick कुकी माहिती वैयक्तिकरित्या ओळखण्‍यायोग्‍य माहितीसह एकत्र करणार नाही.

या गोपनीयता धोरणामध्‍ये नमूद केलेल्‍या व्‍यतिरिक्त उद्दिष्‍टासाठी माहिती वापरण्‍यापूर्वी आम्‍ही आपली संमती मागू.

Google जगभरातील अनेक देशांमधील आमच्या सर्व्हरवरील वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करते. आम्‍ही आपली वैयक्तिक माहितीवर आपण रहात असलेल्‍या देशाबाहेरील सर्व्‍हरवर प्रक्रिया करू शकतो.

पारदर्शकता आणि निवड

लोकांच्या गोपनीयतेच्या धारणा भिन्न असतात. आम्ही कोणती माहिती संकलित करतो याबद्दल सुस्पष्‍ट रहाणे हे आमचे ध्येय आहे, जेणेकरुन आपल्‍याला हे कसे वापरले जाते त्य‍ाविषयी अर्थपूर्ण निवडी करता येतील. उदाहरणार्थ, आपण हे करू शकता:

  • Google डॅशबोर्ड वापरुन आपल्या Google खात्याशी जोडलेली विशिष्‍ट प्रकारच्या माहितीचे पुनरावलोकन आणि नियंत्रण करणे.
  • आपल्याला Google वर आणि वेबवर दर्शविलेल्या जाहिरातींविषयीची आपली प्राधान्ये पहा आणि संपादित करा, जसे की जाहिराती सेटिंग्ज वापरून, कोणत्या श्रेण्या आपल्या स्वारस्याच्या असू शकतात. आपण येथे विशिष्ट Google जाहिरात सेवांची निवड रद्द देखील करू शकता.
  • विशिष्‍ट व्यक्तिंना आपले Googleप्रोफाईल कसे दिसते ते पहाण्‍यासाठी आणि समायोजित करण्‍यासाठी आमचा संपादक वापरा.
  • आपली माहिती कोण शेअर करू शकते यावर नियंत्रण ठेवा.
  • आमच्या अनेक सेवांमधून माहिती घ्‍या .

आपण आपल्‍या ब्राउझरला आमच्‍या सेवांशी संबंधित असलेल्‍या कुकीजसह सर्व कुकीजना अवरोधित करण्‍यासाठी, किंवा आमच्‍याद्वारे कुकी सेट केली जात असताना ते सूचित करण्‍यासाठी सेट देखील करू शकता. तथापि, आपल्या कुकीज अक्षम झाल्या असल्यास आमच्या बर्‍याच सेवा योग्यरितीने कार्य करू शकत नाहीत हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, आम्ही कदाचित आपली भाषा प्राधान्ये लक्षात ठेवू शकत नाही.

आपण शेअर केलेली माहिती

आमच्या सेवांपैकी अनेक सेवा आपल्याला इतरांसोबत माहिती शेअर करण्‍यास वाव देतात. लक्षात ठेवा की आपण जा‍हीरपणे माहिती शेअर करता तेव्हा, Google सह ती शोध इंजिनांकडून अनुक्रमपात्र असेल. सामग्री शेअर करणे आणि हटविणे याबाद्दल आमच्या सेवा आपल्याला विभिन्न पर्याय देतात.

आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करणे आणि ती अद्ययावत करणे

आपण जेव्‍हा आमच्‍या सेवांचा वापर करता, तेव्‍हा आपल्‍या वैयक्तिक माहितीमध्‍ये प्रवेश प्रदान करण्‍याचे आमचे ध्‍येय असते. ती माहिती चुकीची असल्यास, जोपर्यंत आम्हाला ती माहिती कायदेशीर ठरवण्यात आलेल्या व्यवसायासाठी किंवा कायदेशीर हेतूंसाठी राहू द्यायची आहे तोपर्यंत – आम्ही आपल्याला ती त्वरित अद्ययावत करण्याचे किंवा ती हटवण्याचे मार्ग सांगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. आपली वैयक्तिक माहिती अद्ययावत करताना, आम्‍ही आपल्‍या विनंतीवर कृती करण्‍यापूर्वी आपल्‍याला आपली ओळख सत्‍यापित करण्‍यास सांगू शकतो.

आम्ही असंयुक्तिकरित्या पुनरावृत्ती करणार्‍या, असंतुलित तांत्रिक प्रयत्न आवश्यक असणार्‍या (उदाहरणार्थ, नवीन सिस्टीम विकसित करणे किंवा विद्यमान पद्धत मूलतः बदलणे), इतरांच्या गोपनीयतेची जोखीम किंवा अत्यधिक अव्यवहारी असणार्‍या (उदाहरणासाठी, बॅक अप सिस्टीमवर असणार्‍या माहितीशी संबंधित विनंत्या) विनंत्या नाकारू शकतो.

आम्‍ही माहिती प्रवेश आणि सुधारणा प्रदान करण्‍यासाठी जेथे त्‍यास विषमतोल प्रयत्‍नांची आवश्‍यकता असेल त्‍याव्‍यतिरिक्त आम्‍ही ते विनामूल्‍य प्रदान करू शकतो. आमच्‍या सेवांना माहितीचे चुकून किंवा दुर्भावनापूर्ण नाश होण्‍यापासून संरक्षण करता यावे अशा प्रकारे सेवांची देखरेख करण्‍याचे आमचे ध्‍येय आहे. केवळ यामुळेच, आपण आमच्या सेवांवरून माहिती हटवल्यानंतर, आम्ही आमच्या सक्रिय सर्व्हरवरून तातडीने अवशिष्ट कॉपी हटवू शकत नाही आणि आमच्या बॅक अप सिस्टमवरून माहिती काढूही शकत नाही.

आम्ही शेअर करीत असलेली माहिती

आम्‍ही खालील परिस्‍थितीपैकी एक लागू होईपर्यंत Google बाहेर कंपनी, संस्‍था, व्‍यक्तींसह वैयक्तिक माहिती सामायिक करत नाही:

  • आपल्‍या संमतीसह

    आम्‍ही कंपन्‍या, संस्‍था किंवा Google बाहेरील व्‍यक्तींसह वैयक्तिक माहिती शेअर करण्‍याची आपली संमती आमच्‍याजवळ असल्‍यानंतर ती सामायिक करू. आम्‍हाला कोणत्याही संवेदनशील वैयक्तिक माहिती ला शेअर करण्‍याकरता मान्यतादर्शक वडण्‍याची संमती आवश्‍यक आहे.

  • डोमेन प्रशासकांसह

    जर आपले Google खाते आपल्यासाठी डोमेन प्रशासकाकडून (उदाहरणार्थ Google अनुप्रयोग वापरकर्त्यांसाठी) व्यवस्थापित केले जात असेल तर आपला डोमेन प्रशासक आणि आपल्या संस्‍थेला वापरकर्ता समर्थन देणारे पुनर्विक्रेते यांना आपल्या Google खात्याच्या माहितीवर प्रवेश असेल (आपले ईमेल आणि इतर डेटासह). आपला डोमेन प्रशासक हे करण्‍यात कदाचित सक्षम असे की:

    • आपण स्थापित करणार्‍या अनुप्रयोगांशी संबंधित सांख्‍यिकीप्रमाणे आपल्या खात्याशी संबंधित सांख्‍यिकी पहाणे.
    • आपल्या खात्याचा संकेतशब्द बदलणे.
    • आपल्या खात्यावरील प्रवेश निलंबित किंवा निरस्‍त करणे.
    • आपल्या खात्याचा भाग म्हणून संचयित केलेल्या माहितीमध्ये प्रवेश करा किंवा ती आपल्याकडेच ठेवणे.
    • लागू कायद्याचे, अधिनियमाचे, कायदेविषयक प्रक्रियेचे किंवा ‍अमलबजावणीस पात्र शासकीय विनंतीचे पालन होण्‍यासाठी आपले खाते माहिती प्राप्त करणे.
    • माहिती किंवा गोपनीयता सेटिंग्ज हटविण्याच्या किंवा संपादित करण्‍याच्या आपली क्षमतेवर प्रतिबंध घालणे.

    कृपया अधिक माहितीसाठी आपल्या डोमेन प्रशासकाच्या गोपनीयता धोरणांचा संदर्भ घ्‍या.

  • बाह्य प्रक्रिया करण्यासाठी

    आम्‍ही आमच्‍या संबंधितांना किंवा इतर विश्‍वासू व्‍यवसायांना किंवा आमच्‍यासाठी तिची प्रक्रिया करणार्‍या व्‍यक्तींना, आमच्‍या सूचनांवर आधारित आणि आमच्‍या गोपनीयता धोरणांचे आणि इतर कोणत्‍याही योग्‍य गुप्ततेच्‍या आणि सुरक्षिततेच्‍या मापदंडांचे पालन करण्याच्या मुद्यावर वैयक्तिक माहिती प्रदान करतो.

  • कायदेशीर कारणांसाठी

    वैयक्तिक माहितीची उपलब्धता, वापर, रक्षण, किंवा तिला जाहीर करणे सर्वसामान्यपणे आवश्‍यक आहे याचा आम्‍हास विश्‍वास असेल तेव्‍हाच आम्‍ही वैयक्तिक माहिती कंपन्‍या, संस्‍था किंवा Google बाहेरील व्‍यक्तींसह शेअर करू जसे:

    • कोणताही लागू कायदा, अधिनियम, कायदेविषयक प्रक्रिया किंवा अंमलबजावणीस पात्र शासकिय विनंतीचे पालन करणे.
    • संभाव्य उल्लंघनांच्या तपासणीसह, लागू होणार्‍या सेवा अटींची अंमलबजावणी करणे.
    • शोध लावणे, प्रतिबंध करणे किंवा फसवणूक, सुरक्षितता किंवा तांत्रिक समस्या याबाबबत कृती करणे.
    • आवश्‍यक त्या प्रमाणे किंवा कायद्याने परवानगी असेल त्याप्रमाणे Google आमचे वापरकर्ते किंवा लोकांच्या अधिकार, मालमत्ता, सुरक्षेच्या नुकसानीविरोधात संरक्षण करणे.

आम्‍ही एकत्रित केलेली वैयक्तिकरित्‍या न ओळखता येण्यायोग्य माहिती, सार्वजनिकरित्‍या आणि आमचे भागीदार – जसे प्रकाशक, जाहिरातदार किंवा कनेक्‍ट केलेल्‍या साइट यांसह शेअर करू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही आमच्या सेवांच्या सामान्य वापराबद्दल ट्रेन्ड दर्शवण्यासाठी माहिती सार्वजनिकपणे शेअर करू शकतो.

जर Google विलीनीकरण, इतर व्यवसाय आपल्यात सामावून घेणे किंवा मालमत्ता विक्री यामधे गुंतलेली असल्यास, आम्ही कोणत्याही वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि वैयक्तिक माहितीचे हस्तांतरण केले जाण्यापूर्वी किंवा भिन्न गोपनीयता धोरणाच्या अधीन होण्यापूर्वी प्रभावित वापरकर्त्यांना सूचना देऊ.

माहिती सुरक्षा

आम्‍ही Google चे संरक्षण करण्‍यासाठी आणि आमच्‍या वापरकर्त्‍यांचे अनधिकृत वापरापासून किंवा आमच्‍याकडे असलेल्‍या माहितीचा अनधिकृत बदलांपासून, तिला जाहीर करण्‍यापासून किंवा नाश करण्‍यापासून संरक्षण करण्‍यासाठी कठोर परिश्रम करतो. विशेषत:

  • आम्‍ही आमच्‍या पुष्‍कळ सेवा SSL वापरून कूटबद्ध करतो.
  • आपण आपल्‍या Google खात्‍यामध्‍ये प्रवेश करताना आम्‍ही आपल्‍याला द्वि चरण दुहेरी सत्‍ंयापन आणि Google Chrome मध्‍ये सुरक्षित ब्राउझिंग वैशिष्ट्य देऊ करतो.
  • आम्‍ही आमच्‍या माहिती संकलनाचे, संग्रहाचे आणि प्रक्रिया पद्धतींचे, शारीरिक सुरक्षा उपायांसह सिस्‍टमचे अनधिकृत प्रवेशांपासून संरक्षण करण्‍यासाठी पुनरावलोकन करतो.
  • आम्‍ही Google कर्मचार्‍यांना, कंत्राटदारांना आणि एजंटांना ज्‍यांना आमच्‍यासाठी प्रक्रिया करण्‍यासाठी ती माहिती जाणून घेण्‍याची आवश्‍यकता असते त्‍यांना, आणि जे कराराच्‍या गुप्ततेच्या कठोर बांधिलकींच्‍या अधीन आहेत त्‍यांना वैयक्तिक माहितीमध्‍ये वापर प्रतिबंधित करतो आणि त्‍यांना शिस्‍तबद्ध ठेवतो किंवा या बांधिलक्‍यांना पूर्ण करण्‍यात अयशस्‍वी झाल्‍यास त्‍यांना निरस्‍त करतो.

अनुप्रयोग

Google Inc. व त्यांचे संबंधितकडून देण्‍यात येणार्‍या सर्व सेवा तसेच इतर साइटवर दिल्या जाणार्‍या सेवांसह त्यांचे संबंधित (जसे की आमच्या जाहिरात सेवा) यांच्यासह आमचे गोपनीयता धोरण सर्व सेवांना लागू होते, पण वेगळे गोपनीयता धोरण असलेल्या सेवा की ज्यामधे प्रस्तुत असलेल्या गोपनीयता धोरणांचा समावेश नाही अशा सेवा त्यात समाविष्‍ट होत नाहीत.

आमचे गोपनीयता धोरण इतर कंपन्यांकडून किंवा व्यक्तींकडून देण्यात येणार्‍या सेवांसह आपल्याला शोध परिणामात दाखविली जाणारी उत्पादने आणि साइट, Google सेवा समाविष्‍ट करु शकणार्‍या साइटस किंवा आमच्या सेवांमधून लिंक केलेल्या इतर साइटना लागू होत नाही. आमच्या गोपनीयता धोरणांमध्‍ये आमच्या सेवांची जाहिरात करणार्‍या आणि कुकीज, पिक्सल टॅग आणि इतर तंत्रज्ञान वापरु शकणार्‍या इतर कंपन्यांच्या आणि संस्‍थांच्या माहिती पद्धतींचा समावेश होत नाही.

अंमलबजावणी

आम्‍ही आमच्‍या गोपनीयता धोरणांच्या होणार्‍या पालनाचे नियमित पुनरावलोकन करतो. आम्‍ही अनेक स्‍वयं नियामक तरतुदिंच्या चौकटीतला ना धरून चालतो. जेव्हा आम्‍हाला व्‍यावहारिक लिखित तक्रारी प्राप्त होतील, तेव्‍हा आम्‍ही तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रार करणार्‍या व्‍यक्तीशी संपर्क साधू. आम्‍ही स्‍थानिक डेटा संरक्षण अधिकार्‍यांचा समावेश असलेल्‍या योग्‍य नियमन अधिकार्‍यांसह वैयक्तिक डेटाला हस्तांतरित करण्‍यासंबंधीच्‍या कोणत्याही तक्रारी ज्‍यांचे थेट आम्‍ही आमच्‍या वापरकर्त्यांसह निराकरण करू शकत नाही त्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी कार्य करतो.

बदल

आमचे गोपनीयता धोरण वेळोवेळी बदलू शकते. आपल्‍या स्‍पष्‍ट संमतीशिवाय आम्‍ही आपले अधिकार या गोपनीयता धोरणा अंतर्गत कमी करणार नाही. आम्‍ही या पृष्‍ठावरील कोणतेही गोपनीयता धोरण बदल पाठवू आणि बदल महत्वाचे असल्‍यास, आम्‍ही अधिक स्पष्टपणे सूचना प्रदान करू (काही सेवांसाठी, गोपनीयता धोरण बदलांच्‍या इमेल सूचना). आपल्‍या पुनरावलोकनासाठी आम्‍ही या गोपनीयता धोरणाच्‍या आधीच्‍या आवृत्‍या संग्रहामध्‍ये देखील ठेवू.

विशिष्‍ट उत्पादन पद्धती

खालील सूचनांमध्‍ये विशिष्‍ट Google उत्पादनांच्या बाबतीत विविक्षीत गोपनीयता पद्धतींचे विश्लेषण केले आहे जी उत्पादने आणि सेवा आपण वापरु शकता:

Google Apps
मुख्य मेनू